एवढे प्रश्न असताना मोदीच का जिंकतात? हा प्रश्न मोदी विरोधकांना, पुरोगामींना पडू शकतो.काही लोक EVM मिशनला दोष देत आहेत.खरच EVM कारणीभूत आहे का? आपण पाहूया…. नोटबंदी होते. तयारी न करता जीएसटी लागू होते, याने अनेक लघू, गृह उद्योग बंद होतात तर बरेचशे तोट्यात जातात. उरी, पुलवामा हल्ला होतो. आपलेच सैनिक शहीद होतात. पण भाजपच विजयी होतो. पुढे कोरोना येतो. एक दिवस रात्री मोदीजी अचानक टीव्हीवर येवून लॉकडाऊन लावतात. लोक हजारो किलोमीटर पायी गावी पोहोचतात. लोकांचे प्रचंड हाल होतात. कोरोनात अनेक लोक मरतात. अनेकांची नोकरी जाते, धंदे बुडतात. कोरोनाची दुसरी लाट येते. ऑक्सिजन, वैद्यकीय सोयी सुविधेचा तुटवडा होतो. ऑक्सिजन मिळावा म्हणून लोक पिंपळ, वडाच्या झाडाखाली थांबतात. पहिल्या लाटेपेक्षाही दुप्पट तिप्पट वेगाने लोक मरतात. हा आकडा इतका भीषण असतो की लोकांना अंतीम संस्कारासाठी जागा नसते. कोविडने मेलेले पेशन्ट नदी किनारी उघड्यावर टाकले जातात. कुणी पुलावरूनच मृतदेह फेकतात.
मोदी जिंकतात,त्यास EVM कारणीभूत आहे?
सरकारने अच्छे दिनचा वादा केला. पण ते आलेच नाही. आज प्रचंड महागाई वाढली आहे. आधीच्या सरकारपेक्षाही अधिक… पेट्रोलचा दर गगनाला भीडलाये, ट्रान्सपोर्टचा खर्च वाढलाये, त्यामुळे सर्वच गोष्टीचे दर वाढले. बेरोजगार अद्यापही तसेच आहे. जागा भरती जवळपास बंद झाल्या आहेत. पण तरीही मोदीच निवडून येतात. तर का? कधी काळी हाच प्रश्न भाजपला पडायचा. काँग्रेसचे करप्शन, नेत्यांचा-कार्यकर्त्यांचा माज, विकासकामे खोळंबली तरीही काँग्रेसच निवडून यायची. तेव्हा भाजपलाही हाच प्रश्न पडायचा.
याचे उत्तर अगदी सोप्पे आहे. ईव्हीएम.. पण नाही. याचे उत्तर इतके बालिश राहू शकत नाही. ईव्हीएमने व्होटींग सुरू झाल्यावर काँग्रेसच्या विरोधात जनमत असतानाही लोकांनी काँग्रेसलाच कौल दिला होता. तेव्हा ईव्हीएममुळे काँग्रेसचा विजय झाल्याचा आरोप भाजपने केला होता. काल ईव्हीएमचा आरोप भाजप करत होता आज काँग्रेस किंवा इतर पक्ष करीत आहे.
ईव्हीएमबाबत प्रत्यक्षात संपर्क येणा-या व्यक्तीशी बोलल्यावर असे लक्षात आले की ईव्हीएमची प्रोसेस ही अतिशय किचकट आहे. आधी आलेले रिझल्टसह मशिन प्रशासनाकडे दाखल होते. तिथे सर्वांसमोर तो डेटा डिलिट केला जातो. तिथे नवीन डेटा भरला जातो. त्याचे अनेक प्रात्यक्षीक होतात. शिवाय कोणत्या उमेदवाराला कोणता क्रमांक मिळणार हे देखील माहिती नसते. पुढे आक्षेप मागवले जाते. मतदानाची प्रक्रिया ही सर्वासमोर होते. तिथे असणारे कर्मचारीही वेगवेगळ्या विचारसरणीचे असतात. त्यामुळे मतदानाच्या आधी किंवा मतदानाच्या वेळी ती टेम्पर्ड करणे अशक्य वाटते.
वायरलेस सिस्टिमने ती टेम्पर्ड करण्याचा एक पर्याय असतो. पण प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांचा क्रमांक वेगळा असतो.
ईव्हीएम मशिन काही पेगासस नाही की जे फक्त एकाच कडे राहिल.इतरांनाही टेम्पर्ड करण्याचा पर्याय असतोच.
असे कित्येक तांत्रिक कारणं आहेत. शिवाय ईव्हीएमची चर्चा केवळ निकालाच्या महिनाभरच चालते.
त्यानंतर पाच वर्ष त्यावर कोणताही विरोधी पक्ष काहीच करत नाही.
पराभव झाला की पुन्हा तोच विषय महिनाभर चालतो. त्यामुळे ईव्हीएमचा विषयही बाद होताना दिसतो.
भाजपची सर्व तयारी आधीच झालेली असते
गुजरातमध्ये गेल्या विधानसभेच्या वेळी भाजपने अगदी थोड्या फरकाने बहुमत मिळवले. तिथे काँग्रेसने भाजपला जबरदस्त फाईट दिली. यावेळी ऍन्टी इन्कम्बन्सीचा फटका बसला तर सरकारही जाऊ शकते. पंजाबचा निकाल लागल्यानंतर आपने यापुढेच लक्ष्य हे गुजरात असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच गुजरातमध्ये मोदींनी दौरा काढलाये. म्हणजे भाजप दुस-याच दिवसापासून कामाला लागलीये.
असे म्हणतात की विधानसभेची भाजपची सर्व तयारी आधीच झालेली असते. फक्त ते निवडणुकीची वाट बघत असतात.
मात्र अनेक ठिकाणी इतर पक्ष त्यांच्यापेक्ष वरचढ असतात. तिथे ते थोडा वेळ घेतात.
नवीन स्ट्रॅटेजी आखतात. अनेक कुटाने करतात. पण अनेकदा भाजपला पराभव पत्करावा लागतो.
ज्या दिवशी पंजाबमध्ये आपने 20 जागा जिंकल्या होत्या. त्याच्या दुस-या दिवसापासूनच संपूर्ण राज्यात आपने विधानसभेच्या तयारीला लागली. तर तर दुसरीकड़े सत्ताधारी काँग्रेसकडे प्रतिस्पर्ध्यांसाठी कुठलेही ध्येय धोरण, स्ट्रॅटेजी नव्हती. काँग्रेस पूर्व वेळ सैन्यदलाचा माजी कॅप्टन आणि बिनडोक सिद्धूच्या वादात अडकून होता. तेव्हा आप तिथे सर्व तयारी करीत होता. पंजाब मधली जनता कॅप्टन पासून प्रचंड त्रस्त झाली होती. (पंजाब दौ-यात लोकांनी ही नाराजी बोलून दाखवली होती.) लोकांना पर्याय हवा होता. तो त्यांना आपच्या रुपात मिळाला. त्यामुळे लोकांना आपला कौल दिला. असा पर्याय इतर ठिकाणी भाजपला होता का? तर माझ्या मते नाही.
सायलेंट व्होटरचा मोठा फायदा भाजपला
यूपीमध्ये अखिलेश यादव ऐन चार सहा महिने आधी ऍक्टिव्ह होऊन आपली दावेदारी दाखल करतो.
पण तोपर्यंत भाजपने सर्व मीडिया, ई कमिशन सर्व आपल्या खिशात घेऊन ठेवले होते.
यूपी इलेक्शनच्या प्रचारात मोदी अमित शहा यांच्या अनेक सभा, रोड शो फेल गेले.
तर दुसरीकडे अखिलेश यादवच्या सभांना प्रचंड गर्दी. मीडियावर अखिलेशची प्रचंड फटकेबाजी,
पण तरीही भाजपच. मला वाटते यात सायलेंट व्होटरचा मोठा फायदा भाजपला झाला.
यूपीत सत्ता बदलवण्याची ताकत असलेले दलित आणि गरीबांचे मत, याशिवाय अनेक सायलेंट व्होटरला भाजपने टार्गेट केले होते. दलित, गरीबांना त्यांनी फुकट धान्य वाटून किंवा इतर काही गोष्टी देऊन अशांना आपल्या जवळ केले. खाल्या मीठाला जागणार अशी एक दलित महिला सांगत असतानाचा व्हिडीओ पाहण्यात आला होता. त्यामुळे तिने मायावतीला पर्याय शोधला होता हे लक्षात आले. वास्तविक पाहता फुकट अन्यधान्य ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती. मात्र खाल्ला मीठाला जागावेही लागते याची जाणीव करून देण्याची स्ट्रॅटेजी भाजपकडे होती. कुणाला फुकट काही देऊन तर कुणासाठी हिंदुत्ववादी कार्ड खेळून तर कुणासाठी काही वेगळे काही देऊन विरोधातील व सायलेंट व्होटर भाजपने आपल्याकडे वळवले.
महागाई, बेरोजगारीही एन्जॉय करणारे भक्त
इतर पक्ष जिथे 6 महिने तयारीला लागतो. तिथे भाजप तीन वर्षाआधीपासूनच कामाला लागतो.
2015 ची निवडणूक झाल्यानंतर अवघ्या एका वर्षातच माझ्या गावात (वणी, यवतमाळ)
बुथ बांधणीच्या कॅम्पनेला त्यांनी सुरवात केली होती. एक्सपर्ट येऊन कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देऊन गेले.
बुथ शिवाय सोशल मीडिया, मीडिया मॅनेजमेंट इत्यादींसाठीही कार्यक्रम त्यांचे सुरू होते.
हे निवडणूक होऊन अवघ्या एका वर्षातच सुरु झाले होते.
मीडिया, कार्यकर्त्यांचे जाळे, सोशल मीडिया, बुथ बांधणी, मीडिया विकत घेणे, लेखक, कॉलम रायटर, कन्टेन्ट रायटर, युट्यूब चॅनल, पोर्टल इत्यादींशी भाजपने आधीच सेटिंग केलेली असते. यावेळी इलेक्शन यूपीत होते पण सोशल मीडियातून प्रचार करणारे माझ्या गावातही होते. त्यामुळे माझ्या गाातील यूपीतील जे लोक मतदानाला गेले तिथे फक्त योगींचाच पर्याय आहे हे डोक्यात घेऊनच ते मतदानाला गेले. इतका जबरदस्त वापर सोशल मीडियाचा भाजप करते. महागाई, बेरोजगारीही एन्जॉय करणारे भक्त भाजपने सोशल मीडियातूनच तयार केले यापेक्षा मोठे यश दुसरे राहू शकते का?
कुणी कितीही मोठा नेता असो त्याला कायम जमिनीवर भाजप ठेवतो. सध्या राज्यव्यापी आंदोलनाचा ट्रेन्ड सुरू झाला आहे. कार्यकर्ते, नेत्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन पुकारले जाते. एकाच दिवशी सर्व नेते रस्त्यावर उतरतात. माझ्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. रस्यावरच्या छोट्या आंदोलनातही आमदार पक्षाचा आदेश म्हणून चौकात निषेध करण्यासाठी उतरतो. असेच राज्यव्यापी आंदोलन इतर पक्षही करतो. (नाना पटोलेंनी जबाबदारी घेतल्यानंतर राज्यव्यापी आंदोलन काँग्रेसने सुरू केले. त्याआधी दिसत नव्हते.) आमच्या भागात आमदाराला प्रतिस्पर्धी असलेल्या विरोधी पक्षाचे किती नेते रस्त्यावर उतरतात? तर याचे उत्तर नाही.
सर्व विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, नेते फेल गेले
एकीकडे थेट आमदार असलेला माणूसही रस्त्यावर उतरतो तर दुसरीकडे त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या इतर विरोधी पक्षाचा नेता शहर अध्यक्षावर आंदोलन ढकलून मोकळा होतो. लोकांच्या साध्या प्रश्नावरही इतर पक्षांचे नेते हातचे राखून काम करतात. अधिकाधिक नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा इत्यादी ठिकाणी भाजपची सत्ता आहे. त्याला एक विरोधी पक्ष म्हणून इतर पक्षांनी काय केले याचा हिशेब बघा. यात सर्व विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, नेते फेल गेले आहे. साधी भाजपच्या हातची नगरपालिका खेचण्यासाठीही इतर विरोधी पक्षाला पदाधिका-यांना साडे चार वर्ष जावे लागतात. त्यानंतर ते झोपेतून उठतात व फक्त आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी वैयक्तिक मुद्दे उचलतात.
एकीकडे कायम संपर्कात राहणारे तर दुसरीकडे निवडणुकीच्या चार सहा महिने ऍक्टिव्ह होणारे नेते.
चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यांचा पक्ष बसपा आज अवघ्या एका सिटवर का आला याचे उत्तरही यात आहे.
अमित शाह, मोदी हे भाजपचे दिग्गज नेते साध्या मनपा इलेक्शनच्या प्रचारालाही जातात. यात सर्व समान असतात.
प्रचारासाठी मोदी सारखा पंतप्रधान असलेला माणूस चित्रविचित्र कपडे घालून दुर्गम भागातील लोकांमध्ये जातो.
विरोधकांना तो जोकर वाटतो. लोक खिल्ली उडवतात. हे भाजपच्या वरिष्ठ लोकांना कळत नसेल का?
निवडणूक आली की असे प्रकार राहुल गांधी करतात.पण ती एक भ्रष्ट कॉपी असते.त्याला इतर गोष्टींची जोड मिळत नाही.
मोदी, शहा मनपाच्या निवडणुकीत प्रचाराला गेल्यानंतर आता फक्त ग्रामपंचायतीची निवडणूक बाकी आहे असे सांगत त्यांची खिल्ली उडवली जाते. मात्र त्याचा फायदा निवडणुकीत दिसून येतो. तर दुसरीकडे इतर पक्षांचे वरिष्ठ नेते हे घरी बसून आराम करीत असतात. (विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असतानाही मोदी प्रचारात व्यस्त का होते याचे उत्तर कदाचित यात मिळेल.) सर्व पद्धतीने भाजप प्रचारात उतरतो. अलीकडे ChatBot ही अत्याधुनिक पद्धतीही भाजप वापरतोय हे देखील कळतये. याचा यूपीच्या निवडणुकीत सर्वाधिक वापर केल्याचे नुकतेच वाचले.
घनघोर परिश्रम,सोबत साम, दाम दंड भेद
भाजप घनघोर परिश्रम, साम, दाम दंड भेद इत्यादी निती वापरून भाजप कायम आघाडीवर राहतो.
भाजपला पर्याय नाही का.. तर आहे. अनेकांना पर्याय हवा आहे. मात्र पाहिजे तसा पर्याय अद्याप भेटत नाही.
काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष सध्या भाजपची डोकेदुखी ठरत आहेत.मात्र असे क्वचित ठिकाणीच होत आहे.इतर ठिकाणी भाजपला रान मोकळे आहे.
भाजप आणखी किती वर्ष राज्य करणार हे सांगता येत नाही. जर असेच सुरू राहिले तर बसपा जसा संपल्यात जमा आहे तेच काँग्रेसचे होणार व कदाचित इतर पक्षांचेही होणार. दमदार विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन… हा त्यांच्या प्रचंड मेहनत, जिद्द, जिंकण्याची भूक याचा विजय आहे. तर याच सोबत भाजपने जात धर्म यापेक्षा विकासाचे राजकारण करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. इतर विरोधी पक्षानेही सततच्या चुका व भाजपकडून काहीतरी शिकावे, मरगळ झटकावी व कामाला लागावे. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा..
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 12, 2022 16: 05 PM
WebTitle – Why does Modi win? Is EVM an issue? Will the opposition learn anything from up election?