नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित बहुचर्चित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट उद्या शुक्रवारी म्हणजेच 4 मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.दरम्यान,सेलिब्रेटींसाठी स्पेशल स्क्रीनिंग खास शोचे आयोजन करत हा चित्रपट दाखवला गेला.चित्रपट पाहिल्यावर कालच अभिनेता आमिर खान ने या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.आम्हाला जे २०-३० वर्षात जमलं नाही ते नागराज यांनी करून दाखवलं असं आमिर म्हणाला,त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार कर्णन फेम धनुष नेही (Dhanush) ‘झुंड’ सिनेमा वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट पाहून मी निःशब्द झालोय अशा शब्दातच त्याने प्रतिक्रिया दिली आहे.चाहते आता म्हणत आहेत की नागराज आणि धनुष डेडली कॉम्बिनेशन होऊ शकतं.
झुंड सिनेमा पाहून काय म्हणाला धनुष?
“कुठून सुरुवात करू ते समजत नाहीये. अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे.मी या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींबद्दल हजार शब्द बोलू शकतो, हे अप्रतिम आहे, खूप छान आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जाते. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. हा चित्रपट म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हा चित्रपट पाहिल्याचा, ती जादू अनुभवल्या मला खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं धनुष म्हणाला.
सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं.असे या चित्रपटाचे कथानक आहे.हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असून नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराज यांनी ही स्क्रीप्ट लिहिली असल्याचे समजते.ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.
झुंड चित्रपट कलाकार
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan as Vijay Barse) , आकाश ठोसर (Akash Thosar as Sambhya), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), विकी कदीयन (Vicky Kadian as Abhijeet Barse, Vijay’s son) आणि गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 03, 2022 11:450 AM
WebTitle – Jhund Cinema: Superstar Dhanush Says “I’m speechless”