नवी दिल्ली (तिरुपती मंदिर प्रसाद) – Tirupati Temple Prasad तिरुपती मंदिराच्या प्रसादात फिश ऑईल असल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून पाठवलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेतील चाचणी रिपोर्टमध्ये गुरुवारी असे म्हटले आहे की तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑईल मिसळले होते. लाडवांच्या नमुन्यांना गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
जगप्रसिद्ध तिरुपती लाडवांच्या तयारीत निकृष्ट सामग्री आणि जनावरांच्या चरबीचा कथित वापर यावर वादंग सुरू असताना, सत्ताधारी तेलुगु देशम पार्टीने गुरुवारी असा दावा केला की गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेने सदर भेसळ प्रमाणित केली आहे.
लॅब रिपोर्टमध्ये केलेला दावा
टीडीपी प्रवक्ते अनम वेंकट रमना रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत कथित लैब रिपोर्ट सादर केला, ज्यामध्ये दिलेल्या तुपाच्या नमुन्यामध्ये “बीफ टॅलो” (गाय-म्हशीच्या चरबी) च्या उपस्थितीची पुष्टी करण्यात आली आहे. कथित लॅब रिपोर्टमध्ये नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि माशांच्या तेलाच्या उपस्थितीचाही दावा करण्यात आला आहे. नमुने प्राप्तीची तारीख 9 जुलै 2024 होती आणि लॅब रिपोर्ट 16 जुलैची होती.

तिरुपती मंदिर प्रसाद – तुपाच्या तयारीत गोमांस चरबीचा वापर
टीडीपी प्रवक्ते अनम वेंकट रमणा रेड्डी यांनी सांगितले की,
प्रयोगशाळेतील रिपोर्टने प्रमाणित केले आहे की तिरुमलाला पुरवठा करण्यात आलेल्या तुपाच्या तयारीत
गोमांस चरबी, जनावरांची चरबी – लार्ड (डुकराच्या चरबीशी संबंधित ) आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आला होता.
सीबीआय तपासाची मागणी
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या तुपात जनावरांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता.
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या आरोपानंतर या प्रकरणाला ताण आला
आणि विश्व हिंदू परिषद (VHP) ने गुरुवारी या प्रकरणात सामील असलेल्या लोकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तसेच, वायएसआरसीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण,
राज्य काँग्रेस प्रमुख वायएस शर्मिला यांनी नायडू यांच्या दाव्याला बळकटी देण्यासाठी सीबीआय तपासाची मागणी केली आहे.
तिरुपती लाडू वादावर भाजपा नेते आणि टीटीडी बोर्डाचे माजी सदस्य भानुप्रकाश रेड्डी म्हणाले, “आम्ही खूप दु:खी आहोत आणि आम्ही या प्रकरणाची निंदा करतो. आम्ही जगन मोहन रेड्डी, टीटीडी चे चेअरमन भूमना करुणाकर रेड्डी, वायव्ही सुब्बा रेड्डी आणि तत्कालीन कार्यकारी अधिकारी धर्म रेड्डी यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत. सध्या आम्ही लाडवांचा प्रसाद तयार करण्यासाठी शुद्ध गायीच्या तुपाचा वापर करत आहोत.”
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 19,2024 | 21:24 PM
WebTitle – Tirupati Temple Prasad: Animal Fat Found in Prasad, Lab Report Reveals