नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची आकडेवारी आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती आपल्याकडे नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अशा स्थितीत आर्थिक मदत म्हणजेच नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत हे लेखी उत्तर दिले आहे.
आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची आकडेवारी सरकारकडे आहे का आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा विचार सरकार करत आहे का, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कृषिमंत्र्यांचे हे उत्तर आले आहे. केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांशी चर्चेच्या 11 फेऱ्या केल्या, पण बात बनू शकली नाही, असेही मंत्र्यांनी या सभागृहात सांगितले.
दुसरीकडे, आंदोलनादरम्यान 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा शेतकरी संघटनांचा दावा आहे. 11 दिवसांपूर्वी प्रधानमंत्र्यांनी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती आणि त्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागितली होती.
19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान म्हणाले होते, “देशाची माफी मागताना, मी प्रामाणिक आणि शुद्ध अंतःकरणाने सांगू इच्छितो की
कदाचित आमच्या तपश्चर्येमध्ये (शरणागती) अशी काही कमतरता होती की
आम्ही आमच्या काही लोकांना सत्य समजावून सांगू शकलो नाही.
शेतकरी बांधवांनो.” त्यानंतर त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले होते.
उद्योजकांनी आत्महत्या केल्याची माहिती
दरम्यान,देशातील शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध नसणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने देशातील उद्योजकांची मात्र व्यवस्थित आकडेवारी ठेवल्याचे समोर आले आहे.कोरोना काळात ११ हजार ७१५ उद्योजकांची आत्महत्या केल्याची माहिती केंद्रसरकारने दिली. करोना संकट आणि लॉकडाउन यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान २०२० मध्ये एकूण ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारडून संसदेत देण्यात आली आहे. २०१९ च्या तुलनेत म्हणजेच करोना संकट येण्यापूर्वीच्या काळात तुलना करता ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढली आहे.गृह मंत्रालयाने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) डेटाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये ९०५२ उद्योजकांनी आत्महत्या केली. तर २०२० मध्ये ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या करत जीवन संपवलं.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 01 , 2021 15:56 PM
WebTitle – There are no statistics on the deaths of farmers, so there is no compensation