चाणक्य नीती हा शब्द भारतीय राजकारणात इतका रूढ झाला आहे की चाणक्य म्हणजे हुशार, विद्वान, चलाख, मुत्सद्धी असे अर्थ ह्या शब्दाला प्राप्त झाले आहेत. चाण्यक नीतीला हे अर्थ खरोखर अभिप्रेत आहेत का ? तर नाही हे त्याचे उत्तर आहे. म्हणून चाणक्य नीती म्हणजे नेमके काय हे समजून घ्यायचे असेल तर आर्य चाणक्य ह्या व्यक्तीस समजून घ्यायला हवे. प्रबळ राज्य व राज्यव्यवस्था टिकविण्यासाठी काय करायला हवे या संदर्भातील त्याची मते समजून घ्यायला हवीत. या साठी प्रा. र.पं.कंगले भाषांतरित कौटिलीय अर्थशास्त्र (सटीप मराठी भाषांतर) हा ग्रंथ अभ्यासला तरी पुष्कळ प्रश्नांची उत्तरे मिळतात.
आर्य चाणक्य नावाची कुणी व्यक्ती होऊन गेली नाही असा एक मतप्रवाह आहे. तर आर्य चाणक्य ह्या प्रसिध्द व्यक्तीचा शोध घेतल्यास असे अढळते की ज्या व्यक्तीस चाणक्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे प्रत्यक्षात चाणक्य हे त्या व्यक्तीच्या पित्याचे नाव असून जन्मतः त्यांचे ठेवलेले नाव हे विष्णूगुप्त असून कौटिल्य हे गोत्रनाम आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या माते विष्णुगुप्त हा आर्य नसून अनार्य म्हणजे असूर असावा कारण ग्रंथाच्या सुरवातीस त्याने असूर गुरु बृहस्पती यास वंदन केले आहे शिवाय ब्राम्हणांनाही शिक्षेची तरदूत केलेली आहे. असो
चाणक्य नीती
कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथातील विचार, मते, तत्वज्ञान ?
हे चाणक्याचे म्हणजे विष्णूगुप्ताचे केवळ स्वतःचे नसून
विविध विषम समाजरचनेचे, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या ब्राम्हणी ग्रंथांचे विचार, मते या ग्रंथात संकलीत केले गेले आहेत.
त्यात आपस्तंम्ब धर्मसूत्र , बौध्दयान धर्मसूत्र, वसिष्ठ धर्मसूत्र, गौतम धर्मसूत्र, याज्ञवल्क्य स्मृती यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
या ग्रंथाचा मुख्य पाया वर्णाश्रमधर्म म्हणजेच चातुर्वर्ण्य व्यवस्था टिकविणे
व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनी त्यांची कर्तव्य पार पाडणे( त्यांच्या पायरी प्रमाणे राहणे) ही आहेत.
म्हणजे केवळ धर्मशास्रांनी ठरवून दिलेली आपली कर्मे करावी जसे ब्राम्हणांनी अध्ययन तर शुद्रांनी वरील तीन वर्णीयांची सेवा करावी.
क्षत्रियांनी युध्द करावे तर वैश्यांनी व्यापार. धर्मशास्रांना आग्रस्थानी ठेवून हा ग्रंथ लिहिल्यामुळे ओघाने हे सर्व त्यात आले आहे.
ह्या ग्रंथातील प्रत्येक अध्ययावर , प्रकरणावर स्वतंत्र ग्रंथ लिहिला जावू शकतो इतके मोठे विषय ते आहेत
पण विस्तार भया मुळे इथे संक्षिप्त पणे हा लेख लिहितो आहे.
केवळ काही ठळक मुद्दे राजनीती संदर्भातील नमुद करतो आहे.सर्व नमूद करणे शक्य नाही.
राजनीती संदर्भातील काही ठळक मुद्दे
१. कौटिल्य यांनी राजापेक्षा ‘ अमात्य’ याला येथे जास्त महत्व दिले आहे व तो उच्च कुळात जन्मलेला असावा असे नव्या अध्यायातील पाचव्या प्रकरणात म्हटले आहे. उच्च कुळ म्हणजे अर्थातच ब्राम्हण कुळात जन्मलेला असावा. ज्याच्या हातात सर्व प्रशासन असते . राजाच्या साक्षीने सर्व राज्य तो चालवीत असतो. प्रशासन त्याच्या हाती असते म्हणजे आजच्या भारताचा विचार करता पंतप्रधान, सचिव, कलेक्टर या सारख्या पदांवर उच्च कुलिन ब्राम्हण असावे. महाराष्ट्राचे राज्यपाल आपण अनुभवले आहेतच.
२. राजाने आपले राजेपद वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जावे.राजाला आपल्या पुत्रापासून जास्त धोका असतो. चाणक्य यांनी पुत्राला खेकड्याची उपमा यात दिली आहे. पित्याचे पुत्रासाठी प्रेम वाढण्यापूर्वीच पुत्राची हत्त्या करावी असा सल्ला चाणक्याने सतराव्या अध्यायात दिला आहे. तात्पर्य राजेपद टिकविण्यासाठी राजाने कोणत्याही थराला जावे पण आपले राजेपद टिकवावे.कुटुंब, नाते गोते, चांगले वाईट, नैतिक अनैतिक याचा कोणताही विचार न करता आपल्या राजेपदाच्या आड येणाऱ्या प्रतेकाला संपवावे असे म्हटले आहे. आजचे राजकारणी सर्वोच्च पद केवळ मिळावे म्हणून या मार्गांवर चालतांना दिसताहेत.
३. राजेपद मिळविण्यासाठी कपट कारस्थान ही नित्त्याची बाब झाली होती म्हणून राजाने कुणावरही विश्वास नठेवता एकाच शयनगृहात संपूर्ण रात्र झोपू नये तर वेगवेगळ्या प्रहरी आपले शयनगृह बदलावे .
४. रात्री राजाच्या संरक्षण करण्यासाठी बाहेरील कक्षात धनुर्धारी स्रिया ठेवाव्यात, त्यानंतरची फळी ही नपुंसक वर्गाची असावी तर त्यानंतर खुजे , कुबडे लोकांना संरक्षणासाठी नेमावे असे २१ व्या अध्यायात म्हटले आहे. इतका अविश्वास स्वतःच्या लढाऊ सैनिकां वर व्यक्त करण्यात आला आहे.
५. विशेष म्हणजे कौटिल्य ब्राह्मण सैनिकांवर अविश्वास व्यक्त करतात.
थोडाश्या लालचिला ब्राह्मण सैन्य बळी पडतात त्यामुळे ब्राह्मण सैन्यांपेक्षा इतर सैन्य चांगले असे कौटिल्य दुसऱ्या अध्यायात म्हणतात.
६. १४ वा अध्याय तर जारणमारण, जादूटोणा,मंत्रसिध्दी अशा कर्मकांडाने भरला आहे. तर तिसऱ्या अध्यायात अंधश्रद्धा, गुढविद्दा याचे समर्थन करण्यात आले आहे. मंत्रशक्तीला राजाचे बलस्थान मानण्यात आले आहे. शत्रू राजावर विजय मिळविण्यासाठी मंत्रशक्तीचा उपयोग करावा असे कौटिल्य म्हणतो. मंत्राने विजय मिळवता येतो यावर कौटिल्य म्हणजेच चाणक्याचा ठाम विश्वास आहे. यशस्वी होण्यासाठी कर्मकांड करावे असे चाणक्य म्हणतो ते स्वरूप आजही आपल्याला पहायला मिळते.
एकवीसाव्या शतकात ही अंधश्रद्धा व अनितिमान मार्गाने मार्गक्रमण
भारत वर्ल्डकप जिंकण्यासाठी, पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी, सॅटेलाईटच्या सुरक्षिततेसाठी,
पंतप्रधान, मुख्यमंत्री होण्यासाठी केले जाणारे यज्ञ ही चाणक्य नितीच आहे.
आजचा ब्राम्हण वर्ग एकवीसाव्या शतकात ही चाणक्याने सांगितलेल्या अंधश्रद्धा
व अनितिमान मार्गाने मार्गक्रमण करताना दिसतो आहे.अर्थात याला अपवाद असणारे ब्राम्हण ही आहेत.
६. राजाचा खजीना वाढविण्यासाठी कर्मकांडाचा उपयोग करावा. राजाच्या विश्वासाच्या माणसाने जमिनीत देवाची मुर्ती लपवून ठेवावी व मला देवाने द्रुष्टांत दिला आहे असे सांगावे. प्रजेच्या समोर तेथे खोदकाम करावे व देवाची मुर्ती बाहेर काढावी. त्याची प्रतिष्ठापणा करावी व प्रजेकडून भरपूर धन, सुवर्ण मिळवावे. त्यासाठी अंधश्रद्धा वाढवावी, प्रजेला शक्य तेवढे अडाणी ठेवावे. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन राजाने राजकोष भरावा. लोकांच्या अज्ञानातच राजाचे सिंहासन सुरक्षीत असते म्हणून त्यांना शहाने होऊ देवू नये. ही चाणक्य निती आपले सर्वच राज्यकर्ते वापरीत आले आहेत. मठ मंदिरांना राजश्रय व त्याचे राजकारण हा त्याचाच भाग आहे. आजचे केंद्रातील सरकार त्याबातीत तर अघाडीवर आहे. खऱ्या अर्थाने चाणक्य नितीची अमलबजावणी करीत आहेत.
७. शत्रूला संपविण्यासाठी कपटकारस्थान करावे, शक्यतितक्या अनैतिक मार्गाचा अवलंब करावा. छळ, कपट, अनैतिक मार्ग, विश्वासघात, फसवणूक, धुर्तपणा, स्वार्थांदवृती या सर्व बाबींचा अवलंब करून शत्रूला संपवावे हाच प्रयोग स्वकीयांवर करून राज्य अबाधित ठेवावे . या बाबींचा वापर सर्रास केला जातोय हे सर्वज्ञात आहेच.
मौर्य राज्यपासून ते सातवाहन राज्य घराण्या पर्यंत कपट करस्थानाचा उपयोग करून राज्य संपविण्यात आले.
मगधचा सेनापती पुष्यमित्राने इ.स.पूर्व १८५ मध्ये कपटकारस्थान करून शेवटचा बौद्ध राजा व आपला बालमित्र राजा बृहद्रथ यांचा खून करून बौद्ध राज्य संपवून शुंग या ब्राम्हणी राज्याची स्थापना केली होती. शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती अत्यंत व्यसनी व नीच निघाला . त्याचा ब्राम्हण मंत्री वसुदेव कण्व यानेही देवभूतीचा खून करून इ.स.पूर्व ७२ मध्ये मगधावर दुसऱ्या ब्राम्हणी घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. तर शेवटचा कण्व राजा सुशीम यास सातवाहन रांजाने ठार मारले.म्हणजे मौर्य राज्यपासून ते सातवाहन राज्य घराण्या पर्यंत कपट करस्थानाचा उपयोग करून राज्य संपविण्यात आले. हा सर्व प्रकार चाणक्य नीती मध्ये मोडतो.
आजच्या भारतातही सर्व अनैतिक मार्गाचा अवलंब करून कर्नाटक, गोवा, छत्तीसगड
आणि बहुजन आघाडीचे आजचे सरकार येण्याआधी महाराष्ट्रात ही काही तसांचे नवे सरकार आले होते
त्या वेळी ही चाणक्य नीतीचा मार्ग चोखाळलेला गेलेला होता.
८. चाणक्य या शब्दाचा खरा अर्थ विद्वान, हुशार, चलाख, मुत्सध्दी असा नसून
विश्वासघात, धुर्तपणा, छळ, कपटकारस्थान, फसवणूक करणारा असा आहे.
तर मग आजचा चाणक्य कोण ? हे सर्वांनी सदसद्विवेकबुद्धी ला स्मरून ठरवावे.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बुडवली;शाळेला दीड लाखांची नोटीस !
माणसाचा नेक-विवेक जागवणारा चित्रपट : ‘जयंती’
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 30, 2021 17:37 PM
WebTitle – Chanakya policies and today’s politicians