शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 17 लाख कोटी रुपये बुडाले : शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात आणि सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजार जोरदार घसरणीसह बंद झाला आहे. संपूर्ण दिवस बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. सकाळी बाजार घसरणीसह उघडला, पण दिवसभरात सेन्सेक्स 870 आणि निफ्टी 235 अंकांनी वधारले. मात्र, व्यवहार संपण्याआधी बाजारात पुन्हा नफा वसुली झाली आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून 1835 आणि निफ्टी 520 अंकांनी खाली घसरला. FMCG, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे बाजारात ही घसरण झाली आहे. व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 808 अंकांच्या घसरणीसह 81,688 वर तर निफ्टी 200 अंकांनी घसरून 25049 अंकांवर बंद झाला आहे.
सर्वात जास्त वाढ-घसरण झालेली शेअर्स
BSE सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 9 शेअर्स हिरव्या चिन्हात बंद झाले. यामध्ये इंफोसिस (Infosys) शेअरमध्ये 1.39 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली. त्यानंतर टाटा मोटर्स (Tata Motors), टेक महिंद्रा (Tech Mahindra), अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हे शेअर्स 0.42 टक्क्यांपासून 0.94 टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह बंद झाले. तर, सेन्सेक्समधील उर्वरित 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) शेअर 3.65 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर ठरला. त्याचबरोबर बजाज फायनान्स (Bajaj Finance), एशियन पेंट्स (Asian Paints), नेस्ले इंडिया (Nestle India) आणि भारती एअरटेल (Bharti Airtel) शेअर्समध्ये 2.02 टक्क्यांपासून 2.83 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक होती. एक्सचेंजवर एकूण 4,054 शेअर्समध्ये आज व्यवहार पाहायला मिळाले.
त्यापैकी 1,579 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 2,370 शेअर्समध्ये घसरण झाली, तर 105 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय सपाट बंद झाले.
याशिवाय 190 शेअर्सनी व्यवहारादरम्यान आपला नवीन 52-आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 66 शेअर्सनी आपला 52-आठवड्यांचा नवा निचांक गाठला.
गुंतवणूकदारांचे 4.19 लाख कोटी रुपये बुडाले
IT शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत.
बँकिंग, ऑटो, FMCG, फार्मा, मेटल्स, ऊर्जा, हेल्थकेअर, मीडिया, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आजही घसरण पाहायला मिळाली.
BSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप घटून 461.06 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या मागील व्यापार दिवशी म्हणजेच मंगळवारी 3 ऑक्टोबरला 465.25 लाख कोटी रुपये होते. या प्रकारे BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 4.19 लाख कोटी रुपये कमी झाले आहे. याचबरोबर संपूर्ण आठवड्यात BSE कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 16.87 लाख कोटी रुपये कमी झाले आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 04,2024 | 21:44 PM
WebTitle – share market closes with a big fall