
सांगली: शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला, परंतु गणपती आणि नवरात्र उत्सव आता फक्त इव्हेंट झाले आहेत, असे संभाजी भिडे यांनी वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळताना हिंदू समाज आपल्या संस्कृतीचा अनादर करत आहे आणि अशाप्रकारे हिंदूंना मूर्ख बनवले जात आहे. संभाजी भिडे यांनी आवाहन केले की या उत्सवांचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही आणि 5 वर्षांची पोरगी दुर्गामाता दौड मध्ये चालणार नाही. महिलांनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढून नवरात्र उत्सव चं महत्त्व राखावे.धारकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी जी वक्तव्य केली आहेत त्यामुळे आता नवा वाद उभा राहाण्याची शक्यता आहे.
सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सुरुवात उत्साहात झाली. यावेळी भिडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि नवरात्र उत्सवातील मनोरंजनाच्या स्वरूपावर तीव्र टीका केली. त्यांनी पोलिसांनाही आवाहन केले की, या प्रकारांना आळा घालावा.
नारीशक्तीचा अपमान? महिलांना दुर्गामाता दौडमध्ये प्रवेश नाकारला
नवरात्र उत्सवातील महिलांच्या सहभागाबद्दल भिडे यांनी वक्तव्य केले की, नवरात्र उत्सवाचा सन्मान राखण्यासाठी महिलांनी आपला स्वतंत्र सहभाग दाखवावा.
त्यांनी नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होण्यापासून संरक्षण करण्याचे आवाहन केले.
हिंदू समाजावर टीका: शत्रू ओळखण्याची गरज
संभाजी भिडे यांनी हिंदू समाजावर टीका करत म्हटले की, हिंदूंना आपल्या शत्रू आणि मित्र यांच्यात फरक ओळखता येत नाही. “महामूर्ख जमात म्हणजे हिंदू समाज,” असे म्हणत त्यांनी सांगितले की, राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण या गोष्टींवर जास्त लक्ष दिले जात आहे, पण त्याचा परिणाम संस्कृतीवर होत आहे.
देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे. हिंदी-चिनी आणि हिंदी मुस्लिम भाई म्हणाऱ्या हिंदूना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण,चांगलं कोण,हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सव चा दांडिया हिंदू समाजाला XXडू बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असे ही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 03,2024 | 16:15 PM
WebTitle – Shameless Society is Hindustan, Ganpati Festival and Navratri Have Become Events: Sambhaji Bhide