पुण्यातील मुळशी भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ड्रोन उडताना दिसत आहेत. एकाच वेळी तीन ते चार ड्रोन आकाशात घिरट्या घालताना पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे स्थानिकांची झोप उडाली आहे. हे ड्रोन लाल आणि हिरव्या लाइट्ससह रात्रीच्या काळोखात फिरतात, ज्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे ड्रोन कोणाचे आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे, याबद्दल नागरिकांमध्ये मोठी चिंता आहे.
ड्रोन ची दहशत मुळशी तालुक्यात पसरली
मुळशी तालुक्यातील भूगाव ते पौड आणि हिंजवडी आयटी पार्कपर्यंतच्या संपूर्ण परिसरात ड्रोनच्या हालचालींनी दहशत पसरली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे ड्रोन काही घरांच्या जवळ आले होते, त्यापैकी एक ड्रोन घरावर कोसळल्याची घटना घडली होती, ज्याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. या घटनेनंतर काही काळ ड्रोन उडणं थांबलं होतं, पण आता पुन्हा एकदा ते रात्रीच्या वेळी दिसू लागले आहेत.
गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की या भागात किमान दोन डझन ड्रोन उडत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच ड्रोन थांबवण्यासाठी दोन विशेष यंत्रणा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर काही कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. हे ड्रोन चोरी किंवा रेकीसाठी वापरले जात आहेत का, याबद्दल गावकऱ्यांमध्ये शंका आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिक रात्रभर पहारा देत आहेत.
ड्रोन उडवणाऱ्यांचा शोध सुरू
पुणे जिल्ह्यातील मुळशीच नव्हे तर सातारा, बीड, अहमदनगर, जालना यांसारख्या अनेक भागांमध्ये ड्रोनने लोकांची झोप उडवली आहे.
गावकरी ड्रोन उडवणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनपर्यंत कोणालाही पकडण्यात यश आलेले नाही.
स्थानिक प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, नागरिकांना शांत राहण्याची विनंती केली आहे.
ड्रोनच्या या हालचालींमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01,2024 | 06:32 AM
WebTitle – Mystery Drones Terrorize Mulshi at Night, Alarming Locals