स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्रेंड करत आहेत, आणि यामागचं कारण लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत जोडलेलं आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस १७’ च्या विजेत्या मुनव्वर फारुकी वर हिंदू देवतांवर टिप्पणी केल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘हिटलिस्ट’ वर आहे.
दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुनव्वरचा दोन बिश्नोई गँगच्या सदस्यांनी पाठलाग केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुनव्वरला तातडीने कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आणि त्याला मुंबईत पोलीस संरक्षणात पुरवण्यात आलं. मुंबई पोलिसांनीही या घटनेनंतर त्याची सुरक्षा वाढवल्याचं सांगितलं जातं आहे.
पंजाबमधील गँगस्टर लारेंस बिश्नोई याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. बिश्नोईने माजी महाराष्ट्र मंत्री आणि NCP नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं देखील सांगितलं जातं. बाबा सिद्दिकी यांचे सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड कलाकारांशी चांगले संबंध होते. बिश्नोई गँगने याआधी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारीही घेतली होती.
दिल्ली पोलिसांना मिळाली होती माहिती
दिल्लीच्या IGI इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेलमध्ये मोठा गोंधळ झाला
जेव्हा अचानक दिल्ली पोलिसांना स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी यांच्या जीवाला धोका असल्याची गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाली.
त्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन फारुकी मुंबईला रवाना झाला.
सूत्रांनी असेही सूचित केले होते की आता फारुकीच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.
बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहेत?
सलमान खान: सलमान खान हा बिश्नोई गँगचा प्रमुख टार्गेट आहे, कारण त्याच्या नावावर काळवीट शिकार प्रकरण आहे, ज्यात बिश्नोई समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे बोलले जाते. बिश्नोईने आपल्या एका साथीदाराला सलमानवर पाळत ठेवण्यासाठी पाठवलं होतं, परंतु त्याला अटक करण्यात आली होती. एप्रिल २०२४ मध्ये सलमानवर झालेल्या गोळीबाराचाही प्रयत्न झाला होता मात्र तो फसला होता.
झीशान सिद्दिकी: बाबा सिद्दिकींचा मुलगा झीशान सिद्दिकी हा देखील गँगच्या टार्गेटवर आहे, कारण सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “जो सलमान खान और दाऊद गँग की मदद करेगा अपना हिसाब-किताब लगाके रखना” अशी धमकी दिली गेली होती.
शगनप्रीत सिंह: सिद्धू मूसवालाचा मॅनेजर शगनप्रीत सिंह हा देखील बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहे.
बिश्नोईचा विश्वास आहे की शगनप्रीतने त्याच्या साथीदार विक्की मिड्डुखेरा याच्या मारेकऱ्यांना आश्रय दिला होता.
कौशल चौधरी: बिश्नोई गँगचा प्रतिस्पर्धी आणि बंबीहा गँगचा सदस्य कौशल चौधरी हा देखील हिटलिस्टवर आहे.
अमित डागर: कौशल चौधरीचा साथीदार अमित डागर देखील विक्की मिड्डुखेरा हत्येच्या कटात सामील होता.
दुसरीकडे,कॅनडाच्या पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार, भारतीय सरकारने लॉरेन्स बिश्नोई ला ‘एजंट्स’ बनवले आहे.
भारत सरकार लारेंस बिश्नोई गँगसोबत मिळून कॅनडात दहशत पसरवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 15,2024 | 16:00 PM
WebTitle – Munawar Farooqui on Lawrence Bishnoi’s hit list