मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत,त्यांनी यासाठी उपोषणे देखील केली,मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 15 जातींना ओबीसी (इतर मागासवर्गीय) यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयावर मनोज जरांगे पाटील संतापले असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी सरकारला शेवटचा इशारा दिला आहे.
जरांगे पाटील काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 15 जातींना ओबीसी (इतर मागासवर्गीय) यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मनोज जरांगे पाटील संतापले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली की,“हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच शिफारस केली होती, हे आम्हाला माहीत होतं. आम्हाला आशा होती की मराठ्यांनाही ओबीसीमध्ये सामाविष्ट केले जाईल, मात्र तसे झाले नाही. आम्हाला त्यांच्यासाठी दु:ख नाही, पण मराठ्यांना ओबीसीमध्ये का घेतले जात नाही? ह्या इतर जातींना आत घेत आहात, ही कोणती खुन्नस आहे? आम्ही वर्षभरापासून आंदोलन करतोय, तुम्हाला याची लाज वाटत नाही का? तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही त्यांना ओबीसीमध्ये सामील करत आहात. हे जाणूनबुजून आम्हाला लक्ष्य केले जात आहे,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “आचारसंहिता लागण्यापूर्वी जर मराठ्यांसाठी निर्णय घेतला नाही, तर मी तुमच्या सर्व जागा उधळून लावेन. तुम्ही मराठ्यांचा इतका तिरस्कार का करता? मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही त्या जातींना आरक्षण देत आहात, ज्यांना खरे तर यासाठी पात्रताच नाही. हे सर्व मराठा समाजाच्या छाताडावर होत आहे, आणि आम्ही तुमचा खेळ संपवू. तुम्ही आचारसंहिता लागू केली, तर 55% मराठा समाज आहे, आणि एकही जागा तुमच्या हातात येऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
खालील जातींचा समावेश
बडगुजर
सूर्यवंशी गुजर
लेवे गुजर
रेवे गुजर
रेवा गुजर
पोवार, भोयार, पवार
कपेवार
मुन्नार कपेवार
मुन्नार कापू
तेलंगा
तेलंगी
पेंताररेड्डी
रुकेकरी
लोध लोधा लोधी
डांगरी
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 09,2024 | 22:04 PM
WebTitle – Manoj Jarange Patil Furious: 15 Castes in Maharashtra Included in OBC, But Not Marathas