महाकुंभ 2025: प्रयागराजमध्ये पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या महाकुंभासाठी अतिशय भव्य आणि ऐतिहासिक आयोजन करण्याची तयारी सुरु आहे. या कुंभ मेळ्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मेळ्यात फक्त सदाचारी ‘चारित्र्यवान’ आणि मांसाहार व मद्यपान न करणाऱ्या पोलिस बंदोबस्तसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
डीजीपी मुख्यालयाने या संदर्भात सर्व कमिश्नरेट आणि रेंजला विशेष निर्देश दिले आहेत आणि प्रयागराजला पाठविण्यात येणाऱ्या पोलिस दलाची निवड काळजीपूर्वक करण्यास सांगितले आहे. एडीजी स्थापना संजय सिंघल यांनी आदेश दिला आहे की महाकुंभात तैनात होणाऱ्या पोलिसकर्म्यांचे सत्यनिष्ठा, सदाचरण, प्रतिमा आणि वर्तन चांगले असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांची वयोमर्यादा देखील विचारात घेतली जावी.
महाकुंभ स्पेशल: पोलिस कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादेबाबत निर्देश
डीजीपी मुख्यालयाने दिलेल्या आदेशानुसार, कुंभ मेळ्यात ज्यांना ड्यूटीवर पाठविण्यात येणार आहे त्यांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जावी. त्यानुसार, महाकुंभात तैनात होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा सामान्यतः 40 वर्षांपर्यंत असावी. मुख्य हवालदार वयोमर्यादा 50 वर्षे आणि उपनिरीक्षक व निरीक्षकांसाठी 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची कुंभ मेळ्यात ड्यूटी लावली जाणार नाही.
कुंभ मेळ्यात शाकाहारी, ऊर्जावान, धूम्रपान आणि मद्यपान न करणारे, तसेच मृदुभाषी पोलिस कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाईल,
जेणेकरून कुंभ मेळ्याची सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक मान्यतांचे पालन होईल.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या तैनातीसाठी पहिल्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपासून, दुसऱ्या टप्प्यात 10 नोव्हेंबरपासून
आणि तिसऱ्या टप्प्यात 10 डिसेंबरपासून अशा पोलिसकर्म्यांची यादी पाठविण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 17,2024 | 07:36 AM
WebTitle – Mahakumbh 2025: Only Virtuous, Vegetarian, and Teetotaler Cops Allowed—Others Need Not Apply