Viral Dance Video : Little girl danced to ‘Aaj Ki Raat’ on Teacher’s Day सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, परंतु फार कमी व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात, आणि त्यांचे निरागस खोडकर व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होतं. सध्या सोशल मीडियावर एका शाळेतील मुलांचा आज की रात या गाण्यावरील डान्स करतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकली डान्स करताना दिसते.
चिमुकलीचा डान्स खूप छान असला तरी, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात तिने ‘स्त्री 2’ चित्रपटातील तमन्ना भाटियाच्या प्रसिद्ध आयटम साँग ‘आज की रात’ वर परफॉर्म केला आहे. सध्या या डान्स रील्स सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत, त्यामुळेच कदाचित तिने या गाण्यावर डान्स केला असेल. मात्र, इंटरनेट यूजर्सनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि मुलांच्या पालकांवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.
नेटकऱ्यांनी विचारले आहे की, आपण मुलांना नेमके कोणते संस्कार करतोय? हा व्हिडिओ X वर @wokeflix_ या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘आम्ही पालकत्वात अपयशी ठरलो आहोत’ असे लिहिले आहे.
शाळेची माफी
या व्हिडिओवर एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ‘सुधारणा: इथे अपयश दोन्ही बाजूंनी आहे, शालेय शिक्षण आणि पालकत्व.’
दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘म्हणूनच परदेशी शाळांच्या पद्धतींची गरज नाही, गुरुकुलची गरज आहे.’
तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘हे पालक आणि शाळेचे संपूर्ण अपयश आहे.’
चौथ्या यूजरने विचारले आहे, ‘आपण मुलांचं काय करत आहोत?’
या पोस्टला आतापर्यंत साडेआठ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर हजारो कमेंट्स आल्या आहेत.
शाळेची माफी फेसबुक या सोशल मीडियावर Suvidya Sr Sec REM School, Dhemaji शाळेच्या पेजवर
या घटनेच्या संदर्भात पुढीलप्रमाणे पोस्ट करण्यात आली आहे:
“शेअर करण्यासाठी क्षमस्व. आमच्या शाळेतील एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात ती एका हिंदी गाण्यावर नाचताना दिसते.
हे गाणे तिच्या वयाला आणि तिने ज्या कार्यक्रमात भाग घेतला त्या कार्यक्रमाला योग्य नाही.तिचे कपडेही योग्य नव्हते.
सुविद्यान शाळेच्या समूहाला (कुटुंबाला) खूप वाईट वाटतं की आम्ही तिला या कृत्यासाठी विरोध केला नाही.
खरंतर आमचं एक प्रकारचं अज्ञान होतं कारण मुलगी इतकी लहान होती की तिच्याकडे नकारात्मक नजर येत नव्हती. त्याचीही आम्हाला खंत वाटते.
मुलगी थोडी मोठी असती तर नक्कीच आम्ही परवानगी दिली नसती.
वास्तविकता: विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने आमच्या शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आणि मुलीच्या आईने स्वतः मुलीला कपडे घातले आणि आधीच तिला गाणे शिकवले होते, ज्यामुळे तिने नंतर संघाचे नेतृत्व केले. आईने तीचा व्हिडिओ बनवला आणि तिच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला, जो वेगाने व्हायरल झाला (आईने यावर आधीच एक स्पष्टीकरण व्हिडिओ बनवला होता). आम्ही आईलाही दोष देणार नाही.
सर्वांच्या चुका झाल्या आहेत, कृपया आम्हाला आणि तिच्या आईला क्षमा करा.
कृपया आमच्यावर कृपा करा. आपली सुंदर भारतीय संस्कृती पुढील काळासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण खूप सतर्क राहू.
तीच चूक पुन्हा कधी होणार नाही.
मुलीचे भविष्य अंधकारमय होऊ देऊ नका. ती निर्दोष आहे. कृपया तिच्यावर अपमानास्पद टिप्पण्या करणे थांबवा.
नागरिकांसमोर आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करत आहोत.”
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 10,2024 | 20:08 PM
WebTitle – Little Girl’s ‘Aaj Ki Raat’ Dance on Teacher’s Day Sparks Outrage; School Issues Apology