#आज #Jaaglya_Top_10 मध्ये
महत्वाच्या बातम्या वर एक नजर…
#जागल्या_top_10
1 *गेल्या 24 तासांत तब्बल 87 हजार लोकांना झाला कोरोना, मृत्यूचीही धक्कादायक आकडेवारी समोर*
देशात कोरोनाचा धोका कमी होण्याचं काही नाव घेत नाही. रोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांची भर होत आहे. गेल्या 24 तासातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात 86961 नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर 1130 लोकांचा मृत्यू झाला आहे.आता समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोनाची आतापर्यंतची एकूण सकारात्मक प्रकरणे 5,487,580 इतकी आहेत तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4396399 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 87882 मृत्यू झाले आहेत.
2 *शेतकरी हिताच्या चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत नव्हते; *चंद्रकांत पाटलांचा आरोप*
शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा असताना ‘जाणता राजा’ म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेला उपस्थित राहत नाहीत, शिवसेना लोकसभेत पाठिंबा देते आणि राज्यसभेत त्याला विरोध करते. हा सगळा सावळा गोंधळ आहे, यांना स्वार्थ महत्त्वाचा वाटतो, शेतकऱ्यांचे हित नाही,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे.
3 *शिवसेना-राष्ट्रवादीने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला? याचा खुलासा करावा* – *प्रकाश आंबेडकर यांचा रोखठोक सवाल*
‘राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयक बिलाला राज्यसभेत आज मंजुरी मिळवून देण्यात अखेर केंद्रातील बीजेपी आरएसएसच्या नरेंद्र मोदी सरकारला यश आले. शेतकऱ्यांचे सुगीचे-दिवाळीचे दिवस संपले असून आता त्यांना हमीभाव मिळणार नाही. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा का दिला ? याचा जाहीर खुलासा त्यांनी करावा,’ असं थेट आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
4 *कर्मचाऱ्यांच्या संप पुकरण्यावर येणार बंधनं*
केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे अधिकार मर्यादित करणारे विधेयक संसदेत मांडले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांच्या संप करण्याचा अधिकारावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.यासोबतच 300 हून कमी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना नवीन भरती किंवा कर्मचारी कपात करताना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.नवीन बदलांसह ‘दि इंडस्ट्रिअल रिलेशन्स कोडबिल 2020’ शनिवारी (19 सप्टेंबर) संसदेत सादर करण्यात आले. श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी हे विधेयक मांडले.औद्योगिक कंपनीतील कर्मचारी 60 दिवसआधी नोटीस दिल्याशिवाय संप करू शकणार नाहीत. सार्वजनिक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही संप करण्यापूर्वी नोटीस देण्याचा कालावधी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी करणारे विधेयक म्हणून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
5 *भाजपला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली*
मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपनं उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.उच्च न्यायालयाने भाजपने केलेली याचिका फेटाळून लावल्यामुळे विरोधी पक्षनेता पद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. काँग्रेसचे रवी राजा हे सध्या विरोधी पक्षनेता पदावर आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका भाजपने मागे घेतली होती. त्याच्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानुसार मुंबई महानगरपालिकेत विरोध पक्षनेता पदासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
6 *योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कफील खान ‘संयुक्त राष्ट्रा’त
गोरखपूरचे डॉ. कफील खान यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारविरुद्धची आपली लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलीय. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या कफील खान यांची अटक ‘बेकायदेशीर’ असल्याचं नुकतंच अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हणत त्यांच्या तत्काळ सुटकेचे आदेश दिले होते. यानंतर राज्य सरकारच्या भीतीने कफील खान यांनी आपल्या कुटुंबीयांसह जयपूरमध्ये आसरा घेतलाय. खान यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाला (UNSRC) एक पत्र लिहून ‘भारतात आंतरराष्ट्रीय मानव सुरक्षा नियमांचं व्यापक उल्लंघन आणि असहमतीचा आवाज दाबण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) तसेच यूएपीए यांसारख्या कायद्याचा दुरुपयोग’ होत असल्याचं म्हटलंय.
7 *मराठा समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, सरकारला दिला गंभीर इशारा*
मराठा आरक्षणा पाठोपाठ धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही धनगर समाजानेही मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आज औरंगाबाद धनगर समाजाच्या कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारला गंभीर इशारा देण्यात आला आहे.औरंगाबाद धनगर आरक्षण विभागीय बैठकीत आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. धनगर आरक्षण प्रश्न तात्काळ सोडावा अन्यथा मंत्रालयामध्ये आणि मंत्र्यांच्या घरात मेंढर घुसणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा आता पेटताना दिसत आहे.
8 *पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याकडून अलर्ट जारी*, *रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापुरात भागांत मुसळधार पावसाची शक्यता*
पुढच्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाची शक्यता तर मुंबईसह ठाणे व इतर भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. उद्या मुंबई ठाणे सातारा कोल्हापूर रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
9 *कंगनाची जीभ पुन्हा घसरली; आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली!*
बेधडक आचरट वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली नटी कंगना राणावत हिने आता नवा वाद ओढवून घेतला आहे. कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला असताना व हे आंदोलन चिघळत चालले असतानाच कंगनाने या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याने ती चांगलीच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं आहे. मात्र, हे ट्विट – रीट्विट करत कंगना राणावतने मतप्रदर्शन केले असून कंगनाचं ट्विट नव्या वादाला तोंड फोडणारं ठरलं आहे.जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA ला विरोध केला होता.असं वादग्रस्त ट्विट करून कंगणाने नवा वाद ओढवून घेतला आहे.
10 *चीनमध्ये कोरोना नंतर नव्या आजाराचा कहर वाढला,3245 जणं पॉझिटिव्ह*
आता कुठे चीनमधून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात तेथील सरकारला यश आलं असतानाच चीनवर आता नवं संकट कोसळलं आहे. चीनमध्ये नवीन आजाराचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या आजारामुळे 3245 जणं पॉझिटिव्ह आले असून 21 हजारांहून जास्त नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे.उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती. या आजाराचे नाव ब्रुसेलोसिस (Brucellosis) असल्याचे समजते आहे.या आजाराचा संसर्ग बॅक्टेरियल इंफेक्शन (Bacterial Infection)मुळे झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ब्रुसेलोसिस या आजाराचा संसर्ग पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे होत आहे. परंतु आतापर्यंत कोणाचाही या आजारामुळे मृत्यू झालेला नाही.ही सध्यातरी दिलासादायक बाब आहे.
#Jaaglya #jaglya #Jaaglya_Top_10 #News
21 -SEP-2020
Jaaglya.com brought to you worldwide news updates
anchoring by Shweta Pagare Mairale
News produce by Team Jaaglya
#jaglya
#jaaglya
#जागल्या
jaaglya.com
===========================================
#Jaaglya_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी
जागल्या.कॉम हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 21 -SEP-2020
Thanks Team Jaaglya
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)