मुंबई, दि 16 : काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद समोर आला आहे.मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्यकी यांनी पत्र लिहून तक्रार केली आहे. (Controversy erupts in Mumbai Congress, Congress MLA complaint against Mumbai Congress President in Delhi) माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्यकी यांनी भाई जगताप यांच्या विरोधात पत्रात केला आहे.
झिशान सिद्यका यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कार्यक्रम घेतला, मात्र स्थानिक आमदार असून त्यांना बोलवलं नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत झिशान सिद्यकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असं नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.
काही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस स्थानकात मुंबई काँग्रेसने पोलिसांना कोरोनासाठी आवश्यक साधन सामुग्री वाटप केले. त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.पण स्थानिक आमदार असून झिशान सिद्यकी याना बोलवण्यात आले नाही, प्रोटोकॉल पाळले जात नाहीत अशीही पत्रात तक्रार केली आहे.
पक्षात माझ्या विरुद्ध काम करणार्यांना ताकद दिली जाते अशी तक्रार झिशान सिद्यकी याने पत्रात केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लिहिलेलं पत्र झिशान याने
महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील,के सी वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांना देखील पाठवले आहे.
भाई जगताप यांची प्रतिक्रिया
नेमकं प्रकरण काय हे त्यालाच विचारा. प्रत्येकाला काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचा अधिकार आहे.
आमच्या पक्षात लोकशाही आहे.सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो त्यांच्याकडे आपले म्हणने मांडण्याचा अधिकार आहे.
मुंबईत आमचे चार आमदार आहेत, त्यापैकी तो सर्वात तरुण आमदार आहे.
त्याचा उत्साह मी समजू शकतो, त्याचं जेवढं वय आहे, त्यापेक्षा जास्त कालावधीत मी राजकारणात आहेत आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये.
त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक मी अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कोणाला देत नाही.
ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात, प्रोटोकॉल असेल तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो.
मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असं भाई जगताप म्हणाले.यावरून काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 16 2021 at 9:43 AM
WebTitle – internal-dispute-in-mumbai-congress-mlas-complaint-against-mumbai-congress-president-in-delhi-2021-06-16