औषध कंपन्यांचा खेळ: निकृष्ट औषधं आणि निवडणुकीत देणगी! पाहा, कोणी किती दिली देणगीदेशातील मोठ्या फार्मा कंपन्यांच्या 53 औषधं प्रयोगशाळेतील क्वालिटी चेकमध्ये अपयशी ठरली आहेत. यामध्ये तीन औषधं विषारी आढळली आहेत. फार्मा मार्केटमध्ये अग्रणी असलेल्या या कंपन्यांनी निवडणूक बॉन्डद्वारे राजकीय पक्षांना भरभरून देणगी दिली आहे. जाणून घ्या, कोणी किती देणगी दिली आहे?
औषध कंपन्यांचा खेळ: निकृष्ट औषधं आणि निवडणुकीत देणगी! पाहा, कोणी किती दिली देणगी
हिंदुस्तान टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार,टॉरेंट फार्मास्युटिकल्स (Torrent Pharmaceuticals) या कंपनीची दोन औषधं क्वालिटी टेस्टमध्ये अपयशी ठरली आहेत. शेलकाल (Shelcal) आणि मॉन्टायर एलसी (Montair LC Kid) या औषधांचा क्वालिटी चेक फेल झाला आहे. या फार्मा कंपनीने 77 कोटी 50 लाख रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेतले. यापैकी 61 कोटी रुपये भाजपला दिले, तर काँग्रेसला 5 कोटींचा इलेक्टोरल बॉन्ड. समाजवादी पक्षाला 3 कोटी आणि आम आदमी पक्षाला 1 कोटी रुपयांची देणगी दिली.
अल्केम हेल्थ सायन्स (Alchem Health Science) यांची पॅन-डी (Pan-D) ही औषध विषारी आढळली आहे.
या कंपनीने भाजपसाठी 15 कोटी रुपयांचे बॉन्ड विकत घेतले होते.
हेटरो लॅब्स लिमिटेड (Hetero Labs Limited) या कंपनीने 25 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेतले होते.
यापैकी 20 कोटी रुपये बीआरएसला दिले, तर 5 कोटी रुपयांचे निवडणूक बॉन्ड भाजपला दिले.
सन फार्मा (Sun Pharma Laboratories) ने भाजपला 31 कोटी रुपयांचे निवडणूक बॉन्ड खरेदी करून देणगी दिली होती.
53 औषधं क्वालिटी चेकमध्ये फेल
केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण संघटनेच्या (CDASCO) एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, पॅरासिटामोल, मधुमेहाच्या म्हणजेच डायबिटीजच्या औषधं, रक्तदाबाच्या म्हणजेच ब्लड प्रेशरच्या औषधं आणि व्हिटॅमिन यांसारखी सामान्यतः वापरली जाणारी औषधं या 53 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये अपयशी ठरली आहेत. यामधील काही औषधं विषारीही आढळली आहेत. औषधं क्वालिटी टेस्ट करणाऱ्या संघटनेने या औषधांच्या खराब स्थितीनंतर लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
इतर वेदनाशामक औषधे
रिपोर्टनुसार, CDSCO ने पॅरासिटामोलसह पॅन्टोसिड टॅब्लेटलाही गुणवत्ता चाचणीत नापास घोषित केले आहे, ज्याचा वापर अॅसिड रिफ्लक्सच्या उपचारासाठी केला जातो. याशिवाय मल्टीविटामिनमध्ये समाविष्ट असलेल्या कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांच्या औषधांनाही क्वालिटी चेकमध्ये पास केलेले नाही. या संदर्भात CDSCO ने आपल्या अहवालात खरेदी, भेसळयुक्त आणि चुकीच्या ब्रँडिंग असलेल्या औषधांची, वैद्यकीय उपकरणांची, लसींची आणि सौंदर्य प्रसाधनांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पॅरासिटामोलसह पल्मोसिल (सिल्डेनाफिल इंजेक्शन), पॅन्टोसिड (पॅन्टोप्राझोल टॅब्लेट आयपी), उर्सोकोल 300 (अर्सोडिऑक्सिकॉलिक अॅसिड टॅब्लेट्स इंडियन फार्माकोपिया) या औषधांचा समावेश करण्यात आला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 28,2024 | 14:22 PM
WebTitle – Inferior drugs paracetamol and election donations! See how much they donated via electoral bonds to the political parties