आज कोविड 19 ने जगात उच्छाद मांडलेला आहे. लाखो लोक या संसर्गाच्या कचाट्यात सापडले असून हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अजूनही भारतासह जगभरातील देश या संसर्गापासून स्वत:च्या नागरिकांचे सरांक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. फेस मास्क व हँड सॅनीटायझर हेच या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्याच सर्वात महत्वाचा मार्ग असल्याचे प्रतिपादन जागतिक आरोग्य संगठनेने केले आहे. लोक देखील त्याचा वापर करत आहेत. वैयक्तिक स्वछतेचे महत्व लोकांना आता नव्याने पटत आहे. चे बळी डॉ.सेमेलवेझ ठरले. पण आज मात्र जग त्यांना निर्जंतुकशास्त्राचे प्रणेते म्हणून ओळखते.
विषाणू म्हणजे काय?
विषाणू म्हणजे काय? ते कसे काम करतात या बाबत जगभर एकमत आहे.
शाळा, कॉलेज मध्ये या विषयावर शिकवले जाते त्यामुळे फेस मास्क का वापरावा,
हाथ पुन्हा पुन्हा निर्जंतुक का करावेत याची लोकांना जाणीव आहे.
पण 19 व्या शतकात केवळ भारत नाही तर युरोप सुद्धा याबाबत अनभिज्ञ होते.
ही गोष्ट 19व्या शतकातल्या युरोप मधील आहे. वैद्यकशास्त्र त्यावेळेस जास्त प्रगत नव्हतं.जर्म थिअरीचा शोध अजून लागायचा होता. त्यावेळेस महिलांसाठी बाळंतपण हा जीवन मरणाचा प्रश्न असायचा. रुग्णालयात प्रसूती पश्चातजवळपास 30% माता बाळंतपणा नंतर येणार्या तापाला बळी पडत असतं. हा ताप कशामुळे येतो याचे नेमके निदान होत नव्हते. दूषित हवा, पोट साफ नसणे ईत्यादि कारणांमुळे हा ताप येतो असे निदान केले गेले पण या तापला बळी पडणार्या मातांच्या संख्येत मात्र घट होत नव्हती.
हॉस्पिटल मधे मातांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते.
व्हिएन्ना शहरात एक मेडिकल कॉलेज होते. या कॉलेजशी संलग्न हॉस्पिटल मधे प्रसूती केंद्र होते. तसेच ईथे पोस्ट मार्टेम विभाग सुद्धा होता. मेडिकल स्टुडंट्स या हॉस्पिटल मधे शिक्षण, प्रशिक्षण घेत. त्यांना इथे औषध, प्रसुतीशास्त्र व पोस्ट मार्टेमचे प्रशिक्षण दिले जात असे. शहरातील गरीब घरातील स्त्रिया व वैश्या याच हॉस्पिटल मधे गर्भपातासाठी, प्रसुतीसाठी येत असत. पण हे हॉस्पिटल मात्र फारच बदनाम होते. या रुग्णालयात प्रसुती पश्चात, गर्भपातानंतर मातांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असत.त्यामुळे शहरातील स्त्रिया या हॉस्पिटल मधे दाखल होण्याऐवजी घरीच बाळाला जन्म देत असत किंवा आपल्याला शहरातील एका दुसऱ्या हॉस्पिटल मधे दाखल करण्याचा आग्रह धरत कारण या हॉस्पिटल मधे मातांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते.
अश्यात पण 1847 साली व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल मधे काम करणार्या इग्नाज समेलवेझ
या प्रसूती व बालरोग तज्ञ व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल मधे रुजू झाला.
त्याने प्रसुतीपश्चात होणाऱ्या मातांच्या मृत्यूचा नेमका शोध घेण्याचा प्रयत्न केला.
हॉस्पिटल मधील कामकाज,नर्स व डॉक्टर्सच्या कामाच्या सवयींचे तो निरीक्षण करू लागला.
त्याने व्हिएन्नातील दोन्ही हॉस्पिटल्सचा तुलनात्मक अभ्यास केला.
प्रो.जेकब यांच्या मृत्यूचा डॉ.समेलवेझ यांना जबर धक्का बसला
दुसऱ्या हॉस्पिटल मधे मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने त्या हॉस्पिटलचा अभ्यास करून
पहिल्या हॉस्पिटलमधे अनेक बदल केले पण पहिल्या हॉस्पिटल मध्ये मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात मात्र घट होत नव्हती.
मृत्यूंच्या वाढती संख्या रोखण्यात यश मिळत नसल्याने निराश झालेले डॉ.समेलवेझ काही दिवस सुट्टीवर सुदधा गेले.
पण मृत्यूंच्या कारणाचे नेमके निदान करण्याची तळमळ त्यांना पुन्हा एकदा व्हिएन्ना हॉस्पिटल मधे आली.
एक दिवस एक अघटित घडले. व्हिएन्नाच्या त्याच हॉस्पिटल मधे प्रो. जेकब कोलेस्का फॉरेन्सिक मेडिसिन शिकवायचे. ते विद्यार्थ्यांना पोस्टमार्टेम सुद्धा शिकवायचे. एक दिवस विद्यार्थ्यांना पोस्टमार्टेम शिकवत असताना एका मृतदेहाची चिरफाड करण्यासाठी वापरलेला धारदार वस्तऱ्याने एका विद्यार्थ्याकडून प्रा. जेकब यांना जखम झाली. काही दिवसातच प्रा. जेकब यांना ताप येऊन ते आजारी पडले. पुढे त्यात त्यांचा मृत्यू झाला. आपले मित्र प्रो.जेकब यांच्या मृत्यूचा डॉ.समेलवेझ यांना जबर धक्का बसला. प्रो. जेकब यांना आलेला ताप आणि शारीरिक लक्षणे ही स्त्रियांना बाळंतपणानंतर येणाऱ्या तापासारखीच होती.
रुग्णालयातील मातांच्या मृत्यूचा दर कमालीचा कमी झाला
डॉ.सेमेलवेझ यांना तेव्हा जाणीव झाली की प्रा.जेकब यांच्या मृत्यूचा आणि प्रसूती पश्चात मातांचे होणारे मृत्यू यामागे एकच कारण असावे.
पोस्टमार्टेम केल्यानंतर डॉक्टर, विद्यार्थी प्रसुती पश्चात कक्षात फेरी मारतात.तिथे दाखल असलेल्या मातांची तपासणी करतात.
या तपासणी दरम्यान अनेकदा त्यांचा या मातांना स्पर्श होत असतो ही बाब डॉ.सेमेलवेझ यांच्या नजरेतून सुटली नाही.
पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्या हाताला लागलेले मृतदेहातावरील सूक्ष्म कण
हे गर्भाशयाच्या संसर्गाचे कारण असल्याचा सिद्धांत त्यांनी मांडला.
या सिद्धांताला अनुसरून त्यांनी व्हिएन्ना हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर,नर्स पोस्टमार्टेम नंतर
व रुग्णांना तपासण्या आधी कॅल्शियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने हात स्वच्छ करण्याचा नियम बनवला.
हा नियम लागू केल्याच्या काही काळानंतर व्हिएन्नाच्या त्या रुग्णालयातील मातांच्या मृत्यूचा दर कमालीचा कमी झाला.
आपला हा शोध त्यांनी Etiology, Concept and Prophylaxis of Childbed Fever या पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला.
प्रसिद्धीने दुखावलेल्या जेष्ठ प्रतिस्पर्धी मंडळींनी सेमेलवेझ यांचा छळ करण्यास सुरुवात केली.
या कामगिरी नंतर डॉ.सेमेलवेझ यांचा खुप नावलौकिक झाला. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी युरोप मधील विविध हॉस्पिटल्सना पत्र लिहून या शोधाची माहिती दिली. तत्कालीन ऑस्ट्रिया मधील नामांकित जर्नल मधे हा शोध प्रसिद्ध झाला. खरे तर या शोधाचे वैद्यकीय क्षेत्रातकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होईल अशी अपेक्षा असताना नेमकं उलटं घडलं. अनेक नामांकित डॉक्टर्सनी या शोधाकडे दुर्लक्ष केले. काहींनी यात काहीही नव संशोधन नाही असा शेरा मारला. खरं तर त्या काळात जर्म थियरीचा शोध लागला नसल्यामुळे मृतदेहावरील सूक्ष्म कणांमुळे नवजात मातांच्या गर्भाशयाचा ताप येतो हा सिद्धांत मान्य करण्यास प्रतिष्ठित डॉक्टर मंडळींनी नकार दिला एवढंच नव्हे तर डॉ.सेमेलवेझ यांच्या प्रसिद्धीने दुखावलेल्या जेष्ठ प्रतिस्पर्धी मंडळींनी सेमेलवेझ यांचा छळ करण्यास सुरुवात केली.
पण एवढया वरच त्यांचा छळ थांबला नाही. १८८४ चा तो काळ युरोप मधे प्रचंड राजकीय घडामोडींचा काळ होता. लोकशाहीवादी सुधारणावादी युरोपियन तरुण राजेशाही बरखास्त करून लोकशाही राज्य निर्माण करण्यासाठी युरोपभर प्रदर्शनं करत होता. अशाच एका प्रदर्शनात व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल मधील अनेक विद्यार्थी सामील झाले. व्हिएन्ना हॉस्पिटलच्या प्रसुती विभागाचे प्रमुख होते प्रो.जॉन क्लेन. ते हंगेरी मधील राजेशाहीचे समर्थक होते व लोकशाहीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांचा विरोध होता.जरी डॉ.सेमेलवेझ यांचा या आंदोलनशी काही संबंध नव्हता तरी त्यांच्या काही भावांना अशा आंदोलनात अटक झाली होती त्यामुळे त्यांच्या मनात डॉ.सेमेलवेझ यांच्याबद्दल अढी होती.
पोस्टमार्टेम रूम मधे जाण्यास बंदी
डो. सेमेलवेझ यांचा हॉस्पिटल सोबत असलेला सेवा करार लवकरच संपुष्टात येणार होता. त्यामुळे डो. सेमेलवेझ यांनी सेवा करार वाढवण्यसाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता. रुग्णालयातील अनेक जेष्ठ डॉक्टर मंडळींनी सुद्धा डो. सेमेलवेझ यांच्या नावाची शिफारस केली होती. पण जॉन क्लेन यांनी ही शिफारस धुडकाउन लावली व त्या जागेवर प्रा. कार्ल ब्राऊन यांची नेमणूक करण्यात आली.
20 मार्च 1849 मध्ये डॉक्टर सेमेलवेझ यांचा हॉस्पिटल सोबत झालेला सेवा करार संपुष्टात आला. या अपमानामुळे दुखवलेल्या डॉ.सेमेलवेझ यांनी तात्पुरत्या सेवा बढतीसाठी केलेला अर्ज पहिल्यांदा फेटाळण्यात आला. त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला. ते पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शिकऊ शकणार होते तसेच त्यांना हॉस्पिटल मधील काही सुविधांचा लाभ घेण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र त्यांना पोस्टमार्टेम रूम मधे जाण्यास बंदी घालण्यात आली. त्या ऐवजी त्यांनी मानवी देहाच्या प्रतीकृतीवर विद्यार्थ्यांना पोस्ट शिकवावे अशी शिफरस करण्यात आली.या अपमानास्पद निर्बंधामुळे डॉ.सेमेलवेझ यांनी पुन्हा रुजू झालयांतर काही दिवसातच राजीनामा देऊन बुडापेस्ट गाठले.
कॅल्शियम हायपोक्लोराइट ने हात स्वच्छ करणायची पद्धत सुरू केली.
मे 1851 मधे त्यांनी बुडापेस्ट मधील एका लहानश्या हॉस्पिटल मधे प्रसूतिविभाग प्रमुख म्हणून काम करण्यास सुरवात केली पण या कामाचा त्यांना काहीही मोबदला मिळणार नव्हता. या हॉस्पिटल मधे रुजू झाल्यानंतर त्यांनी तिथे सुद्धा कॅल्शियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाने हात स्वछ करणे अनिवार्य केले. त्यांच्या कारकिर्दीत त्या हॉस्पिटल मधील प्रसूतीपश्चात मृत्युचे प्रमाणे १ टक्क्यांपेक्षा खाली आले. पण एवढे चांगले परिणाम मिळून सुद्धा बुडापेस्ट मधील इतर डॉक्टर डॉ. सेमेलवेझ यांनी सुचवलेले स्वछतेचे नियम पाळण्यास उत्सुक नव्हते.
१८५४ मधे बुडापेस्ट युनिवर्सिटी मधील प्रसूतीशास्त्राचे प्रमुख प्रो. एड बर्ली यांच्या निधंनांनंतर डो. सेमेलवेझ यांनी त्या पदासाठी अर्ज दाखल केला. त्या बरोबर व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल मधे डो. सेमेलवेझ यांना डावलून ज्या डो. कार्ल ब्राऊन यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळेस बुडापेस्ट युनिवेसिटी प्रशासनाने सुद्धा डो. सेमेलवेझ यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत डो. कार्ल ब्राऊन यांची प्रसूतीविभाग प्रमुखदी निवड केली. परंतु पुढे डो. ब्राऊन यांना हंगेरीयन भाषा अवगत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण होऊ लागली व शेवटी १८८५ मधे डो.सेमेलवेझ यांनाच पाचारण करण्यात आले. त्यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर लगेच कॅल्शियम हायपोक्लोराइट ने हात स्वच्छ करणायची पद्धत सुरू केली. ज्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले.
त्याच हॉस्पिटल मधे मृत्यू
१८५७ डॉ. सेमेलवेझ यांचे लग्न झाले.पण प्रसूतिपश्चात मातांचे होणारे मृत्यू कमी करण्याच्या त्यांच्या कामगिरीची दखल तत्कालीन वैद्यकीय संस्थांनी न घेतल्यामुळे ते दिवसेंदिवस निराश होऊ लागले होते. त्यांचे मानसिक संतुलन हरवत चालले होते. त्यांना विस्मरणाचा त्रास होऊ लागला. कोणत्याही विषयांवरील त्यांच्या गप्पा शेवटी शवागार, तिथली अस्वच्छता याकडे जाऊ लागल्या. दिवसेंदिवस त्यांच्या वागण्यात नकारात्मक बदल होऊ लागला. ते मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करू लागले. त्यांच्यात झालेल्या या बदलामुळे पुढे अनेक लोक त्यांना टाळू लागले.
पुढे ते अधिकच विक्षिप्तपणे वागू लागले. ३० जुलै १८६५ रोजी एक नवे हॉस्पिटल दाखविण्याच्या बहाण्याने त्यांच्या एका मित्राने त्यांना विएन्न मधील वेड्यांच्या हॉस्पिटल मधे भरती केले. या हॉस्पिटल मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांना सिक्युरिटी गार्ड कडून जबर मारहाण करण्यात आली. त्यांचे हातपाय बांधून त्यांना पुर्णपणे जायबंदी करण्यात आले. उपचाराच्या नावाखाली त्यांचा जबरदस्त शारीरिक छळ करण्यात आला. हा छळ असह्य होऊन शेवटी १३ ऑगस्ट १८६५ रोजी त्यांचा त्याच हॉस्पिटल मधे मृत्यू झाला.
निर्जंतुकशास्त्राचे प्रणेते
शेकडो मातांचे प्राण वाचवणार्या डॉ.सेमेलवेझ यांच्या आयुष्याचा शेवट अतिशय वेदनायक होता. डो. सेमेलवेझ यांच्या जीवनाच्या अखेरच्या काही वर्षात डो. लुई पाशचार यांचे प्रसूतिपश्चात तापावर संशोधन सुरू होते. प्रसूतीपश्चात येणारा ताप हा विषाणूंच्या संसर्गातून येतो हे त्यांनी पुढे सिद्ध केले व तो टाळण्यासाठी बोरिक एसिडचा निर्जंतुकीकरणासाठी वापर करण्याचे सुचवले. त्यांनी एकप्रकारे डो. सेमेलवेझ यांच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले. लुई पाश्चर यांनी केलेल्या विविध प्रयोगातून पुढे विषाणूशास्त्र, लसीकरण विकसित झाले.
प्रस्थापित वैद्यकीय संस्था, तेथील प्रस्थापितांचे आडमुठे धोरण व प्रचलित वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादेचे बळी डॉ.सेमेलवेझ ठरले.
पण आज मात्र जग त्यांना निर्जंतुकशास्त्राचे प्रणेते म्हणून ओळखते.
लेखन – नितीन दिवेकर
( लेखक इतिहास अभ्यासक आहेत )
हेही वाचा.. रिच पियाना एक जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि त्याचा रहस्यमयी मृत्यू
हेही वाचा.. दातांच्या समस्या आणि त्यावर ऑइल पुलिंगचा घरगुती उपचार
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)