आजघडीला इंटरनेट व स्मार्टफोन असल्याने आपल्याकडे जगभरातील सर्व काही माहिती सहजपणे उपलब्ध होते, म्हणून आपण जगातील सर्व प्रकारच्या प्रसिद्ध लोकांशी परिचित होत आहोत. त्यांच्याशी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व यूट्यूबच्या मार्फत जुळवूनही घेत आहोत. यावरुन एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे मूल्यमापन व प्रशंसा आजघडीला केली जाते. ‘रिच पियाना’ नामक व्यक्तीमत्व बॉडीबिल्डींग विश्वात प्रचंड गाजले, त्याचे महाकाय शरीरच व इंप्रेसिव्ह बॉडी कटींगस त्याच्या लोकप्रियतेचे साधन झाले होते. त्याचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोवर झाले होते, ही त्याच्यासाठी खूप मोठी कमाई होती. परंतु २५ ऑगस्ट २०१७ रोजी या अनेकांच्या आवडत्या बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला, बॉडीबिल्डींग क्षेत्र हादरून गेले आणि क्षेत्रात मोठी शोककळा पसरली..
अनेकांच्या मते तो एक बॉडीबिल्डींग इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट असलेला व्यक्ती होता.
रिच पियाना ला बॉडीबिल्डींगची आवड निर्माण होण्याचे कारण, त्याला याकडे सहजपणे जुळण्याचे कारण त्याची आई होती, त्याची आई स्वतः बॉडीबिल्डर होती, म्हणूनच त्यानेही बॉडीबिल्डींग फिल्ड निवडली. वयाच्या १२ व्या वर्षात त्याने वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. आणि काही काळातच तो बॉडीबिल्डींग क्षेत्रातही प्रसिद्ध व्हायला लागला सुरुवातीला अपयशाच्या झळा बसल्या जरी असल्या, त्याने माघार मात्र घेतली नाही अन पुढ्यात त्याच्या यशाची मालिकाच जणू निर्माण झाली त्यात १८व्या वर्षी मिळालेला मिस्टर कॅलिफोर्निया सुद्धा सन्मान आहेच, २० वर्षात अनेक मोठाले सन्मान त्याने मिळविल्यानंतर त्याची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली. अनेकांच्या मते तो एक बॉडीबिल्डींग इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट असलेला व्यक्ती होता. तसे त्यानी स्वतःला वेगळे असल्याचे त्याच्या हार्डकोर वृत्तीने स्पष्ट दाखवून दिले होते.
गेल्या २५ वर्षापासून तो स्वतः स्टेरॉईड घेत आहे
त्याने २०१६ला यूट्यूबवर एका विडीओत स्पष्ट म्हटले आहे कि “गेल्या २५ वर्षापासून तो स्वतः स्टेरॉईड घेत आहे”, त्याला फॉलो करणाऱ्या वर्गाला व या क्षेत्रातील प्रत्येकाला तो आश्चर्याचा धक्काच होता. तो पुढे असेही म्हणाला “मला माहिती आहे कि स्टेरॉईड घेऊन आपण आपल्या शरीराला काही नाही ईजाच देउ शकतो, मी हे सर्व काही स्वतःच्या जबाबदारीवरच घेत आहे. म्हणून मी स्टेरॉईडचा वापर ऑन आणि ऑफ सिजनमध्ये किती करावा याबद्दल जाणून आहे व तशी काळजीही घेत असतो.” त्याचा महिन्याचा खर्च ग्रोथ हॉरोमॉन्स आणि स्टेरॉईडवर जवळजवळ ३५००$ डॉलर इतका असे. प्रत्येकाने स्टेरॉईडपासून दूर रहावे असे त्यांनी २०१६च्या एका यूट्यूब विडीओमध्ये म्हटले त्याने साधारण जीवन आणि स्टेरॉईड जीवनाच्या तुलनेत साधारण जीवन जगावे असे स्पष्ट म्हटले, त्याच्या शेवटच्या काळात त्याने बॉडीबिल्डींग स्पर्धा बंद केली होती व त्याच्या सप्लिमेंटल ब्रॅंडकडे 5% Nutirianवर त्याने अधिक भर दिली होती.
२०१७चा काळ त्याच्यासाठी खालावलेला ठरला पियानाने स्टेरॉईड, ग्रोथ होरोमॉन्स आणि इंसुलिनचे डोसेज अतिरिक्त प्रमाणात वाढविले होते त्यामुळे तो स्वतःच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होता, दोन हफ्त्यापर्यंतचा काळ त्याने कोमात काढला, शरीर साथ देत नव्हते, शेवटी २५ ऑगस्ट २०१७ला त्याने वयाच्या ४६व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला या बातमीने बॉडीबिल्डींग विश्वात मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली होती. त्याची गर्लफ्रेंड चॅनलने मात्र त्याच्या स्टेरॉईड घेण्याबद्दलच्या गोष्टीस नकार दिला होता, परंतु जेथे पियानाचा अस्वस्थ होऊन कोमात जाण्यापूर्वी खाली पडला होता, तेथे पोलिसांना २० बॉटल स्टेरॉईड व क्रशड सफेद पावडर सापडली होती.
रिच पियाना च्या मृत्यूचे गूढ कायम
काही दिवसांतच पियाना ची Autopsy Report जाहीर झाली त्यात त्याचे मृत्यूचे पहिले कारण ह्रदय हे सामान्य माणसाच्या तुलनेत दोन पटीने वजनदार झाले होते, सामान्य माणसाचे ह्रदय ३०० ग्राम इतके असते तर पियानाचे ह्रदय ६७० ग्राम होते. याचे मुख्य कारम ह्युमन ग्रोथ होरोमॉन्स होते, ग्रोथ होरोमॉंसच्या, स्टेरॉईडच्या, इंसुलिनच्या अतिरेकामुळे शरीरातील मसल्स सोबत अनेक गोष्टी वाढायला लागतात व त्यात ह्रदयही होते. एकदा ह्रदय मोठे झाले कि माणसाची आयुमर्यादा कमी होते जाते. असेच त्याच हफ्त्यात मृत्यू झालेल्या Dallas McCarver या २७ वर्षाच्या Giant बॉडीबिल्डर सोबतही झाले होते त्याच्या ह्रदयाचे वजन तर ८३३ग्राम झाले होते. एकाच हफ्त्यात दोन जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर मृत्यू पावल्याने तो बॉडीबिल्डींग क्षेत्रातील दुखी सप्ताह ठरला. एकूण १० कारणे होती रिच पियाना च्या मृत्यूला जबाबदार व त्यांचे मूळ हे स्टेऱॉईड, ग्रोथ होरोमॉन्स आणि इंसूलिनचे अतिसेवनच आहे असे स्पष्ट होते, तरी मात्र Autopsy Report ने रिच पियाना च्या मृत्यूचे गूढ कायम ठेवत त्याचे कारण अस्पष्ट ठेवले तेथे ‘Undetermine’ असे लिहिण्यात आले आहे.
पियानाचा मृत्यूला रिपोर्टद्वारे स्पष्ट त्याचे स्टेरॉईड, ग्रोथ हॉरोमॉन्स आणि इंसुलिन सेवन जरी जबाबदार म्हटले गेले नसले तरी त्याच्या मरणाची जी १० कारणे आहेत ती स्टेरॉईडच्या अतिसेवनाकडेच घेऊन जातात. याच कारणाने वयाच्या ४६ व्या वर्षी रिच पियानाचा मृत्यू झाला तर वयाच्या २७व्या वर्षी डल्लास मॅककारवर या जगप्रसिद्ध तरुण बॉडीबिल्डरचाही झाला. यावरून Steroids, ह्युमन ग्रोथ होरोमॉन्स (HGH) आणि Insuline हे शरिराला किती घातक आहे हे कळून येईल.
उत्साहीपणा हा जीवावर बेतू शकतो
आजची तरुणाई ही तात्काळ रिजल्टच्या आशेत असते, त्यांना फारशी मेहनत करु वाटत नाही. जरी मेहनत केली तरी यशाची चव लगेच हवी असतात व त्यात काही अर्धवट प्रशिक्षण देणारे ट्रेनरही तयारच असतात त्यांना मार्गी लावायला. म्हणून हा विषय खूप महत्वाचा वाटतो आजघडीला Growth Horomons व Insuline वापरण्याची सवय बॉडीबिल्डर्सला लागली आहे त्याचे काही मर्यादित प्रमाण आहे व कोणत्या प्रकारच्या डाईटला नेमके काय सुट होईल ते सुध्दा पाहणे गरजेचे असते. अश्या अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या आहे कि अनेकांनी Low Carb डाईट करताना रात्री Insuline घेतली व शरीरातील Sugar लेवल कमी असल्यामुळे त्यांना सकाळी जागच नाही आली किंबहुना ती झोपच शेवटची ठरली. तसेच WWE सुपरस्टार ‘The Rock’ बनण्याच्या नादात स्टेरॉईड घेऊन Andrew Gajdos या १७ वर्षाच्या तरुणाचाही मृत्यू झाला होता. म्हणून HGH & Insuline यांचे प्रमाण काय असावे ?, कोणत्या शरीरासाठी काय योग्य ठरेल ? हे योग्य मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे अन्यथा घेऊ नये. उत्साहीपणा हा जीवावर बेतू शकतो याचे भान असणे गरजेचे असते..!
त्याच्या Autopsy Report ची १० कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत.
1) an enlarged heart (and “significant heart disease”)
mild coronary
2) atherosclerosis (plaque buildup on the artery walls)
3) fatty liver
4)congested thyroid
5)congested kidneys
6)discolored kidneys
7)ischemic brain tissue (i.e. brain tissue that had lost blood supply)
8 )necrotic brain tissue (i.e. dead cells)
9)brain edema (swelling)
10)ascites (accumulation of protein-containing fluid in the abdomen)
by Rakesh Adhangle
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)