भारतीय चित्रपट सृष्टीत जे महान लोक आहेत त्यातील एक म्हणजे दिलीप कुमार.दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तान येथील पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता.त्यांचे वडील फळांचा व्यापार करायचे. १९३० दिलीप कुमार यांचे कुटुंब मुंबईत दाखल झाले.
देविकाराणींच्या पारखी नजरेला मोहम्मद युसूफ खान नावाचा हिरा गवसला.
मुंबईत पण त्यांनी फळांचा व्यापार सुरू केला.पण वडिलांसोबत मतभेदांमुळे दिलीपकुमार यांनी पुणे गाठले. पुण्यात एका मित्राच्या मदतीने आर्मी क्लब येथे सँडविचचा स्टॉल लावला. याच ठिकाणी तत्कालीन सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉम्बे टॉकीजची मालकीण देविकाराणी भेटल्या.देविकाराणींच्या पारखी नजरेला मोहम्मद युसूफ खान नावाचा हिरा गवसला.देविकाराणींनी मोहम्मद युसूफ खान म्हणजेच दिलीपकुमार यांना सिनेमात काम करण्याचा सल्ला दिला आणि दिलीपकुमार यांना त्यांनीच चित्रपट सृष्टीत आणले.
दिलीपकुमार यांचा पहिला चित्रपट होता १९४४ चा ‘ज्वारभाटा’. हा चित्रपट फार काही चालला नाही.
त्यांचा पहिला हिट चित्रपट होता जूगनू. त्यानंतर त्यांनी राजकपूर यांच्यासोबत ‘अंदाज ‘ या चित्रपटात काम केले.
वयाच्या २५ व्या वर्षी ते एक सफल भारतीय अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोहिनूर, राम और शाम
दिलीप कुमार यांनी त्यावेळी अनेक असे चित्रपट केले ज्यात हिरो मरतो, दुःखी असतो, रडतो.
अशा चित्रपटात काम केल्यामुळे त्यांना “ट्रॅजेडी किंग” संबोधले जाऊ लागले. त्यांनी सुरवातीच्या काळात असे अनेक चित्रपट केले.
भुमिकेशी समरस होऊन काम करण्याची त्यांच्या सवयीमुळे ते खूप प्रसिद्ध झाले.
कुंदनलाल सहगल यांच्या देवदासनंतर दिलीपकुमार यांचा देवदास चित्रपट १९५५ ला आला.
या चित्रपटातील अनेक दृष्ये खूप गाजली, अनेक डायलॉग गाजले. पण या सिनेमातही शेवट दुःखी होता.अशा सिनेमांमुळे दिलीपकुमार डिप्रेशनमध्ये गेले. ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणार्या दिलीपकुमार यांच्या जीवनात एक वेगळी ट्रॅजेडी सुरु झाली. डिप्रेशनमधुन बाहेर येण्यासाठी राजकपूर यांनी त्यांना इलाज करण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा सल्ला दिला. दिलीपकुमार इंग्लंडला सल्ला घेण्यासाठी आणि औषधोपचार घेण्यासाठी गेल्यावर तेथील डॉक्टरांनी हलकेफुलके सिनेमे करण्याचा सल्ला दिला. इंग्लंडहुन परत आल्यावर दिलीपकुमार यांनी ‘कोहिनूर, राम और शाम ‘ यासारखे हलकेफुलके आणि विनोदी सिनेमे केले.
मधुबाला आणि दिलीपकुमार यांचे संबंध बिघडले.
त्याकाळी तत्कालीन मुली दिलीप कुमार यांच्यावर प्रचंड प्रेम करायच्या.दिलीपकुमार यांच्या जीवनात सुरवातीला कामिनी कौशल आल्या पण हे नाते जास्त काळ टिकले नाही.त्यानंतर दिलीपकुमार यांच्या जीवनात मधुबाला आली.आरसपाणी सौंदर्य लाभलेली मधुबाला आणि रुबाबदार दिलीपकुमार यांचे प्रेम ७/८ वर्ष चालले. ते दोघे लग्नही करणार होते पण मधुबालाच्या वडिलांना हे मान्य नव्हते आणि दिलीपकुमार हे मधुबालाच्या वडिलांचा तिरस्कार करत.वडिलांच्या इच्छेविरुद्ध मधुबाला जाऊ शकत नव्हती.त्यामुळे हे प्रेम अधुरे राहिले.
१९५७ साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या नया दौर या सिनेमाचे बाह्यचित्रीकरण करायचे होते पण या चित्रीकरणाला मधुबालाच्या वडिलांचा नकार होता. ते मधुबाला यांना बाह्य चित्रीकरणासाठी पाठवत नसत. पुणे आणि भोपाळ येथे चित्रीकरण करायचे होते. पण मधुबालाच्या वडिलांनी यासाठी नकार दिला. बी. आर. चोप्रा हे वकील होते. त्यांनी मधुबाला यांना कोर्टात खेचले. त्यावेळी दिलीपकुमार यांनी कोर्टात आपले मधुबालावर प्रेम असल्याचे कबूल केले पण साक्ष मात्र बी. आर. चोप्रा यांच्याबाजूने दिली. त्यानंतर मधुबाला आणि दिलीपकुमार यांचे संबंध बिघडले.
फिल्म करियर
त्याकाळची नवी हिरोईन सायराबानो दिलीपकुमार यांच्यावर खूप प्रेम करत होती.
वयाच्या १२ वर्षापासून सायराबानो दिलीपकुमार यांच्यावर प्रेम करत होत्या.
दिलीपकुमार आणि सायराबानो यांनी १९६६ ला निकाह केला.आजही ते एकत्र आहेत.
दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्या लग्नात देवआनंद आणि राजकपूर नाचले होते.
आपल्या फिल्म करियरमध्ये दिलीपकुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्यांची संवादफेक, त्यांचे बोलके डोळे, रुबाबदार व्यक्तीमत्व, भुमिका निवडण्याचे कसब या सर्व गोष्टीमुळे ते खूप गाजले. त्यांच्या संवादात उर्दूचा टोन दिसतो. उर्दू भाषा ही संवादफेकीसाठी उत्तम मानली जाते. दिलीपकुमार यांनी याच भाषेत संवाद उच्चारल्याचे त्यांच्या सिनेमात आपल्याला पाहायला मिळते. ‘मुघल-ऐ-आझम’ हा चित्रपट त्यांच्या अभिनयाची छाप सोडणारा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे असे म्हणावे लागेल. याच बरोबर त्यांनी जुगनू, बैराग,अंदाज, आरजू, आन, दुनिया, शक्ती, कर्मा, विधाता, राम और शाम, मधुमती, कोहिनूर, देवदास, नया दौर ,दास्तान, मजदूर, आझाद, गंगा जमना, दिवार, सौदागर, क्रांती, लिडर, मशाल ,यहुदी, इज्जतदार, बाबुल,शबनम,गोपी, दाग यासारखे अनेक क्लासिक हिट सिनेमे केले आहेत.
फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
दिलीपकुमार यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे.1968 राम और श्याम,1965 लीडर,1961 कोहिनूर,1958 नया दौर,1957 देवदास,1956 आज़ाद,1954 दाग,1983 शक्ति या चित्रपटांसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
2014 किशोर कुमार सन्मान पण देण्यात आला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण प्रदान केला आहे तसेच पाकिस्तान सरकारने त्यांना पाकिस्तानचा सर्वात मोठा पुरस्कार ‘निशाने- इम्तियाज’ दिला आहे.अनेक अभिनेत्यांचे अभिनयातील श्रद्धास्थान,अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून दिलीपकुमार यांच्याकडे पाहिले जाते.
प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.हिंदी सिनेजगतातील या महान अभिनेत्याचं आज बुधवारी 07-07-2021 निधन झालं.सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
(Legendary actor Dilip Kumar breathed his last early on Wednesday (July 7) after a long and protracted illness. Legendary actor Dilip Kumar died early on Wednesday after a long and protracted illness in Mumbai. He was 98. Dilip Kumar breathed his last at 7.30 am in Mumbai’s Khar Hinduja Hospital.)
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
हे ही वाचा सत्यजीत रे कहते थे दिलीप कुमार को सबसे बड़ा ‘मेथड अभिनेता’
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08 , 2020 07 : 04 AM
Updated on July 07,2021
WebTitle – history-of-indian-film-industry-bollywood-cinema-movies-dilip-kumar