लंडन (प्रतिनिधी) : लंडन,युनायटेड किंग्डम अर्थात युकेच्या लेस्टर शहरामध्ये मुस्लिम बहुल भागात शनिवारी (17 नोव्हेंबर) हिंदू-मुस्लिम धर्मियांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
लंडन येथील लेस्टर शहरातील हिंदू मुस्लिम तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुढील काही दिवस पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आलं आहे.
हंगामी चीफ कॉन्स्टेबल रॉब निक्सन म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहोत,असंख्य अधिकारी आणि पुरेशी संसाधने घटनास्थळावर उपलब्ध आहेत,आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत.
लंडन येथील लेस्टर शहरात हिंदू मुस्लिम तणाव का झाला?
द गार्डीयन या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,लेस्टर हे लंडन , युकेमधलं एक शहर असून राजधानी लंडनपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेस्टर येथे शनिवारी (17 नोव्हेंबर) अचानक दोन्ही धर्माच्या नागरिकांनी एकमेकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. यानंतर संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
या तणावाला भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच ची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यानंतर शहराच्या पूर्वेकडील अशांततेच्या भर पडली असं स्थानिक नागरिक सांगतात.ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ग्रीन लेन रोडमध्ये, त्या परिसरात मुस्लिमांच्या मालकीचे अनेक व्यवसाय आहेत आणि जवळच एक हिंदू मंदिर आहे, शनिवारी हिंदू पुरुषांचा एक गट या परिसरातून फिरताना त्याचे चित्रिकरण करण्यात आले.रुखसाना हुसैन, 42, या स्थानिक समुदायाच्या नेत्या म्हणाल्या जमाव मोठ्यासंख्येने होता आणि तो “जय श्री राम” चे मोठ्याने नारे देत होता. ज्याचे हिंदीतून भाषांतर “भगवान रामाचा जयजयकार” किंवा “भगवान रामाचा विजय” असा होतो.हा एक मंत्र आहे जो अलीकडे भारतातील मुस्लिम विरोधी हिंसाचाराचा समानार्थी बनला आहे,
माजिद फ्रीमन, 34, एक स्थानिक कार्यकर्ता, यांनी शनिवारी संध्याकाळी बेलग्रेव्ह रोडमधील हिंसक घटनेचे चित्रीकरण केले.
ट्विटरवर व्हायरल झालेल्या फ्रीमनच्या एका व्हिडिओमध्ये, काचेच्या बाटल्या फोडल्याचा आवाज ऐकू येतो आणि पोलीस फ्रीमनला दूर जाण्यासाठी ओरडतात.
“ते बाटल्या आणि सर्व प्रकारच्या वस्तू फेकत होते,” फ्रीमन म्हणाला. त्याने पुढे असं म्हटलं की,
“ते आमच्या मशिदींजवळून जात होते, त्यांच्याकडून समाजाला टोमणे मारले जात होते आणि लोकांना मारहाण केली जात होती ,”
लेस्टर शहराचे महापौर सर पीटर सोल्सबी म्हणाले की,
“शनिवारी असं काही होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. पोलिस लोकांना शांततेचं आवाहन करत आहेत.”
“शनिवारी रात्री घटनास्थळी तणाव निर्माण होऊन परिस्थिती चिघळली होती मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले,हे सोपे काम नव्हते.”
“या घटनेत सहभागी झालेल्यां मध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून आला ज्यांचं वय साधारण वीस वर्षांच्या आसपास होतं.हे लोक इथं तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते,जे शहराच्या बाहेरून आले असल्याचं मी ऐकलं. ज्या भागात ही घटना झाली, तिथल्या लोकांसाठी ही काळजीची परिस्थिती आहे.
लंडन लेस्टर येथील हिंदू मुस्लिम तणाव , दोन्ही बाजूने आरोप
लेस्टर येथील हिंदू समुदायातही अनिश्चितता आहे.असं दृष्टी मे, 31, स्थानिक लेस्टर रहिवासी ज्या एका राष्ट्रीय हिंदू संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहेत ,म्हणाल्या की , अलीकडील अशांतता ती शहरात राहिल्याच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या तुलनेत अभूतपूर्व अशी होती.
यावेळी त्यांनी शहरातील काही मुस्लिमांकडून हिंदू कुटुंबांचा छळ होत असल्याचा आरोप केला आला,मे म्हणाल्या, “ पहिल्या पिढीतील स्थलांतरित समुदायाकडून,हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे, .”त्यांना असुरक्षित वाटतं आणि त्यानंतर हा हल्ला झाला,” त्या पुढे म्हणाल्या की पोलिस मालमत्ता, लोक आणि प्रार्थनास्थळांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत. “आम्हाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे,”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांनी या प्रकरणी एका व्यक्तीला कारस्थान रचण्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं आहे.
याच प्रकरणात आणखी एका व्यक्तीला धारदार शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.
सध्या या दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
आम्ही पांडे आहोत,आमचा कुत्रा ही पांडे आहे, थोडा खोडकर आहे, म्हणून त्याने चावा घेतला
मच्छर आपल्यालाच जास्त का चावतो? ही चार कारणे असू शकतात
गांजा तस्करीत तरुणाला फसवून लाच घेणाऱ्या पोलिसांवर पोलिस आयुक्तांची कारवाई
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 19,2022, 14:10 PM
WebTitle – Hindu-Muslim tension in London’s Leicester city, two arrested