नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा जिल्ह्यात पुन्हा एकदा वर्दीला लाजवणारी घटना समोर आली आहे.. गांजा तस्करीत तरुणाला फसवून लाच घेणाऱ्या पोलिसांवर पोलिस आयुक्तांची कारवाई करण्यात आलीय.वर्दीचा धाक दाखवून काही पोलिस लोकांची पिळवणूक करताना दिसत असतात. नोएडामध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे तीन पोलिसांवर एका तरुणाला गांजाच्या तस्करीच्या प्रकरणात गोवल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर एक पोलिस कर्मचारी या तरुणाकडून पैसे घेताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी कोतवाली सेक्टर 57 च्या चौकीच्या प्रभारीसह तीन पोलिसांना निलंबित केले आहे.
गांजा चरस च्या प्रकरणात अडकवून पोलिस उकळतात पैसे
बिसनपुरा गावातील रहिवासी नारायण तिवारी यांनी डीसीपीकडे तक्रार केली होती की 14 सप्टेंबर रोजी पोलिस जिप्सीमध्ये तीन पोलिस त्यांच्याकडे आले होते. यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचे नाव अंकित बल्यान होते. तरुणाचा आरोप आहे की, तीन पोलीस त्याला कोतवाली सेक्टर 58 च्या चौकी 57 मध्ये घेऊन गेले. त्याला चौकीवर घेऊन गेल्यानंतर हवालदाराने नारायण तिवारी यांना गांजा आणि चरसच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. नारायण तिवारी यांनी आरोप केला की, कोतवाली सेक्टर 57 च्या चौकीच्या प्रभारीनेही आपल्याला धमकावले आणि मारहाण केली की गांजा-चरसचे प्रकरण खूप मोठे आहे. हे प्रकरण टाळण्यासाठी 50 हजार रुपये आणा नाहीतर तुम्हाला 5 वर्षांची शिक्षा होईल.अशी धमकी देण्यात आली होती.
चौकीच्या प्रभारीसह तीन पोलिस निलंबित
यानंतर कोतवाली सेक्टर-58 पोलीस ठाण्यात नेऊन तेथेही पीडित तरुण नारायण तिवारीला मारहाण करण्यात आली. या प्रकरणानंतर पीडित तरुणाने कसेतरी पोलीस कर्मचाऱ्याला 20 हजार रुपये आणून दिले. पैसे देताना कोणीतरी या प्रकरणाचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. व्हायरल व्हिडिओच्या आधारे कारवाई करत सेक्टर 57 चौकीचे प्रभारी लोकेश शर्मा, हेड कॉन्स्टेबल राजकुमार त्यागी, कॉन्स्टेबल अंकित बल्यान आणि सोनू कुमार यांना निलंबित करण्यात आले. पोलिसांच्या गणवेशात पैसे घेतल्याप्रकरणी कॉन्स्टेबल सोनू कुमारवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी म्हणाले की, तपासात पीडित तरुणाला सोडण्यासाठी २० हजार रुपये घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 17,2022, 12:53 PM
WebTitle – Police Commissioner’s action against the police who cheated the young man in ganja smuggling and took bribe