मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान, किरणकुमार बकाले यांचे वादग्रस्त वक्तव्य असणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किरणकुमार बकाले यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, यासाठी मराठा समाज आणि राजकीय संघटना आक्रमक झाल्या असल्याचे पहायला मिळत आहे. या गंभीर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ( Controversial statements about the Maratha community; Kiran Kumar Bakale suspended audio clip Jalgaon has gone viral)
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर बोलतांनाची मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य असणारी संभाषणाची ऑडीओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाली.यामुळे एकच खळबळ उडाली होती, सदर ऑडीयो क्लिपमध्ये किरणकुमार बकाले हे आरोपी विषयी बोलत असल्याचे दिसते. त्यानंतर ते पुढे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत.या ऑडीओ क्लिपबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले. डॉ प्रवीण मुंढे यांनी किरणकुमार बकाले यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली. तसेच याप्रकरणी योग्य ती चौकशी करून किरणकुमार बकाले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी म्हटलंय
संभाजीराजे भोसले यांनी कारवाईची मागणी केली
मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले याला तात्काळ निलंबित करावे.
एखाद्या पोलीसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी.अशा शब्दात संभाजीराजे भोसले यांनी कारवाईची मागणी केली आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस अधिक्षक जबाबदार – चव्हाण
याविषयी बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, “स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मराठा समाजाविषयी वादग्रस्त व संभाषणाची ऑडिओ क्लिप मला संध्याकाळी प्राप्त झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या समाजाविषयीची भावना व वापरलेली भाषा पाहता अश्या जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचंतत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी मी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती.”
“मात्र मला प्राप्त माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले याला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.
मात्र ही थातूर मातुर कारवाई करून एकप्रकारे सदर अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न
जिल्हा पोलीस अधिक्षक करीत आहेत की काय अशी शंका निर्माण होते.
सदर ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात राहणे म्हणजे जातीयवादाला खतपाणी घालणे आहे.”
“लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही दोन समाजात सामंजस्य राखणे माझी जबाबदारी आहे. सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ठेवावी व सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तात्काळ निलंबन बाबत कारवाई करावी तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी पुन्हा मागणी यामाध्यमातून मी करतो. अन्यथा येणाऱ्या काळात मराठा समाजात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिक्षक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.”
अनुसूचित जमाती बाबत मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 12 जातींचा एसटी मध्ये समावेश
दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार देऊन गौरव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 15,2022, 11:46 AM
WebTitle – Controversial statements about the Maratha community; Kiran Kumar Bakale suspended