जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले : जात कुठे राहिली? आम्ही जात पाळत नाही,आता कुठे जात राहिली? आता कुणीही जातीयवाद करत नाही,जात आधारित आरक्षण बंद करा,आर्थिक निकषावर द्या.असं म्हणणारे सर्वात जास्त जातीयवादी असतात. कारण समाजात असणारी जात व्यवस्था त्यांना माहित असते,हे वास्तव ते स्विकारत नाहीत, अडचण होते मग ते दडपून टाकायचं.कुठे राहिली जात म्हणायचं मात्र अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात.
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले
आताही पाचोरा तालुक्यातील निपाणे गावात जातीय द्वेषाने एका वृद्ध महिलेच्या मृतदेहावर सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यापासून रोखण्यात आल्याची अमानवी घटना समोर आलीय. गावातील जातीयवादी समाजकंटकांनी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यापासून रोखलं इतकच नाहीतर भरपावसात हा प्रकार घडल्याचे समजते.
भरपावसात माऊलीचा मृतदेह 3,4 तास स्मशान भूमी बाहेर पडून राहिला,या देशात माणूस मेल्यानंतरही जात पाठ सोडत नाही.मृतदेहाची विटंबना झाली मात्र लोकांना माणुसकी आठवली नाही,हे एवढ्यावरच थांबलं नाही,तर जातीयवादी गांव गुंडांनी आईचा अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या तीच्या मुलाला आणि इतरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यामुळे हतबल मुलाने आपल्या आईचा अंत्यविधी स्मशान भूमी बाहेरच केला असे समजते.
स्मशानभुमीतून प्रेत उचलून घेउन जा, नाहीतर तुमचेही या मुडद्यासोबत मुडदे पाडू
देशदूतने दिलेल्या वृत्तानुसार,सरकारच्यावतीने म्हणजेच जिल्हा परिषदेच्या खर्चाने बांधून देण्यात आलेल्या सार्वजनिक स्मशान भूमीत वृद्धपकाळाने निधन झालेल्या दिवंगत निलाबाई वामन धनुर्धर (67) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
जिल्हा परिषदेच्या खर्चाने बांधून देण्यात आलेल्या सार्वजनिक स्मशान भूमीत रात्री अंत्यवीधीसाठी सर्व आप्त नातेवाईक दु:खद वातावरणात शेवटच्या अंत्यविधीसाठी सरण रचत असतांना माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटिल, रोशन पाटिल, राजेंद्र पाटिल, त्र्यंबक पाटील, भैय्या पाटील यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला.
इतकच नाहीतर रोशन पाटिल या इसमाने ही स्मशानभुमी महारांची नसुन मराठ्यांची आहे असे म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर मनोहर पाटिल नामक इसमाने ही स्मशानभुमी जिल्हा परिषदेने मराठा समाजासाठी बांधलेली आहे.
तुम्ही नेहमी प्रमाणे गावकुसाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत तुमच्या आईला जाळा.
इकडे आम्ही प्रेत जाळु देणार नाही. विनाकारण वाद घालु नका असे असा दम दिल्याचा आरोप आहे.
मनोहर पाटिल यांच्यासोबत आलेल्या राजेंद्र पाटिल, ञ्यंबक पाटिल, रोशन पाटिल, मयुर पाटिल, गोकुळ पाटिल, निलेश पाटिल, शांताराम पाटिल यांनी त्यावेळी थेट मुडदे पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आमच्या मराठा समाजाच्या स्मशानभुमीतून प्रेत उचलून घेउन जा, नाहीतर तुमचेही या मुडद्यासोबत मुडदे पाडू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह 11 जणांवर एट्रोसिटीचा गुन्हा
याप्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील सह इतर 11 जणांवर एट्रोसिटी एक्ट
म्हणजेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातीवाचक शिवीगाळ झाली नाही – शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
मात्र आपल्यावरील आरोप फेटाळत जातीवाचक शिवीगाळ झाली नसल्याचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील म्हणाले आहेत.
तसेच गावात प्रत्येकासाठी वेगळी स्मशानभूमी असून याला राजकीय रंग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले,
तसेच निधन झालेल्या महिलेचा मृतदेह सुरतवरून मुळगावी आणण्यासाठी मी स्वत: एम्ब्युलन्स पाठवली असेही म्हटलं आहे.
लखीमपुर खीरी : आईसमोर दोन्ही बहिणींचे अपहरण;बलात्कार,खून करून झाडाला लटकवले
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 15,2022, 20:00 PM
WebTitle – after died of Dalit woman Prevented her cremation on a caste basis The last ritual had to be done outside