तामिळनाडू:तामिळनाडूमध्ये एका दलित महिलेला मंदिरात पूजा करण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंदिराच्या 20 ब्राह्मण पुजारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटना तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम शहरातील नटराज मंदिरातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीला जयशीला नावाची हिंदू-दलित महिला प्रार्थना करण्यासाठी स्थानिक नटराज मंदिरात पोहोचली. या हिंदू-दलित महिलेने मंदिरातील विशेष स्थान असलेल्या कनगसाबाई मेदाई येथे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मंदिरात उपस्थित असलेल्या 20 ब्राह्मण पुजारी नी कोरोनाचे कारण देत त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सांगितले की, ब्राह्मण पुजार्यांनी तिच्या जातीचे नाव वापरून तिला शिवीगाळ केली.महिला ऐकत नसल्याने पुजाऱ्यांनी तिला बळजबरीने रोखले. जयशीला (36) पुन्हा तिथे जाण्यासाठी शिडी चढू लागली. पुजाऱ्यांनी महिलेवर आरडाओरडा सुरू केला. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. पुजारी जयशिलाचा हात धरून तिला मागे ढकलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.विशेष म्हणजे कोरोनाचे कारण देणाऱ्या एकाही पुजाऱ्याने मास्क लावल्याचे व्हिडिओत दिसत नाही.
नटराज मंदिरात घडलेली ही दुसरी घटना
गोंधळ वाढल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. जयशीलाने पुजाऱ्यांविरुद्ध तिला धमकावणे आणि भांडी चोरल्याचा खोटा आरोप केल्याची तक्रार दाखल केली. जयशीला यांच्या तक्रारीवरून सर्व 20 पुरोहितांवर एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हिडीओ मध्ये जयशीला याना अडवताना मंदिरात इतर महिला मात्र शांतपणे पूजा करताना,फेऱ्या मारताना दिसत आहेत.शिवाय कुणीही मास्क लावल्याचे दिसत नाही.
तामिळनाडूतील नटराज मंदिरात घडलेली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गणेश नावाच्या व्यक्तीलाही कनगसाबाई स्टेजवरून हाकलून देण्यात आले होते.कनगसाबाई च्या मंचावरून भाविकांना प्रार्थना करू न देणे चुकीचे असल्याचे जयशीला येथे आलेल्या व्यक्तीने सांगितले. हे मंदिराच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. चिदंबरम नटराजन मंदिरात यापूर्वीही अशा प्रकारची अनियमितता होत असल्याचे त्यांनी सांगितले. नटराज मंदिर यापूर्वी तामिळनाडू सरकारच्या धार्मिक विभागामार्फत चालवले जात होते. या अगोदरच्या AIADMK सरकारने हा विभाग हिसकावून मंदिर व्यवस्थापन पुन्हा पुजाऱ्यांच्या ताब्यात दिले.
इतर वाचनीय लेख
Hijab Issue : कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू, वकिलांचा युक्तिवाद
हिजाब प्रकरण म्हणजे शिक्षणाच्या भगवीकरणाचे रक्षण
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
पहिल्या स्कूटरपासून ‘हमारा बजाज’ पर्यंतचा प्रवास
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 18, 2022 09 :05 AM
WebTitle – Hindu-Dalit women barred from entering the temple, 20 Brahmin priests charged under SC / ST Act