१)’चाल’ आणि ‘रूढी’ हे शब्द जो सतत आणि समानतेने पुष्कळ काळासाठी पाळला गेला आहे.आणि रूढी मध्ये स्थानिक प्रदेश जात-जमात , समूह अगर कुटुंब यांच्यामध्ये हिंदू कायद्याचा अंमल मिळवलेला आहे .तो नियम निश्चित आहे अयोग्य किंवा सार्वजनिक धोरणास विरोध करणार नाही अशा पद्धतीला चाल किंवा रूढी असं म्हणतात.आणि यानुसार हिंदू कोड बिलामध्ये चाल आणि रुढी याद्वारे हिंदू कोड बिलाची व्याख्या ठरवली गेली आहे.
२)हिंदू कोड बिलाच्या सर्व प्रकारच्या दाव्यांचा निपटारा डिस्ट्रिक्ट कोर्ट मुख्य न्यायालय तसेच अवल दिवानी हुकूमत चालवणारे हायकोर्ट यांच्याद्वारे केला जाईल.
३) सख्खे नाते आणि सावत्र नाते :- दोन व्यक्ती जेव्हा त्यांच्या आई-वडिलांपासून झाले असतील अशा नात्यांना सख्खे नाते असे संबोधले जाईल. तसेच आई-वडिलांच्या पती अथवा पत्नी पासून झालेले असतील त्यांना सावत्र नाते असे संबोधण्यात येईल. हा नियम त्या दोन व्यक्तींच्या मूळ पूर्वजांपासून लागू असेल.
४) दूध नाते:- जेव्हा दोन व्यक्ती एकाच मूळ बाई पासून परंतु तिच्या दोन वेगवेगळ्या पतीपासून झालेले आहेत तेव्हा ते दूध भाऊ अथवा दूध बहीण असे एकमेकांचे संबंध असतील तेव्हा ते दूध नाते असेल.
५) नाते होते याचा अर्थ असा की जी औरस संतती आहे त्यांना नाते होते असे संबोधले जाईल. आणि जे अनौरस आहेत त्यांचे आईशी एकमेकांच्या नात्याने जोडले आहेत असे समजण्यात येईल.
६) पुत्र याबाबत हा कायदा सुरू होण्यापूर्वी आणि नंतर केव्हाही दत्तक घेतलेला मुलगा याचा समावेश होतो. परंतु अनौरस मुलगा याचा समावेश होत नाही.
विवाह विषयक तरतुदी
१)प्रथम विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास जिवंत नवरा अथवा बायको असत नाही.
२) कोणताही पक्ष लग्नाच्या वेळी वेडा किंवा जन्माचा मूर्ख खुळा असत नाही. या ठिकाणी लग्नाच्या वेळेस वधू अथवा वर जन्मताच वेडा किंवा मूर्ख असल्यास तो विवाह कायदेशीर रित्या मान्य होत नाही.
३) वधू अथवा वर प्रतिबंध केलेल्या ना त्यांच्या पायऱ्या मधील नसावेत.याचा अर्थ असा की हिंदू धर्मांमध्ये हे नातेसंबंध आहेत त्या नात्यांमध्ये प्रतिबंधित नाती आहेत. ती प्रतिबंधित नाती म्हणजे ढोबळ मानाने ज्या नात्यामुळे हिंदू संस्कृतीस बाधा येत नाही आणी अनैतिक प्रकारचे नाते संबंधात विवाह करणे त्याज्य आहे.
४) चाली आणि रूढीनुसार संस्कार युक्त विवाहास परवानगी असेल.त्याशिवाय वर आणि वधू हे एकमेकांचे सपिंड नसावेत. याचा अर्थ असा की वर आणि वधू चे नातेसंबंध हे हिंदू संस्कृतीच्या तसेच चालीरीती च्या विरोधात नसावेत.
५) वधूचे वय सोळा वर्षे पूर्ण असावे आणि तसे नसेल तर वधु पित्याची अथवा पालकांची पूर्वपरवानगी असायला हवी. याचा अर्थ असा की तत्कालीन काळामध्ये वधूचे वय हे सोळा वर्षे असावे असा दंडक होता. तत्कालीन काळामध्ये जर वधू 16 वर्ष पूर्ण नसणारी असेल तर त्या लग्नास त्या वधूच्या पित्याची अथवा पालकांची सहमती आवश्यक होती. आताच्या काळामध्ये वधूचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असायला हवे .आहे आताच्या काळामध्ये 18 वर्षे पूर्ण असलेल्या कोणत्याही मुलीचे लग्न करणे कायदेशीर गुन्हा आहे.
प्रक्रिया
६) वर आणि वधू यांचे संस्कार युक्त लग्न पूर्ण होणार नाही असे लग्न कोणत्याही पक्षास बंधनकारक असणार नाही
म्हणजेच लग्न संस्कार हा आवश्यक समारंभानुसारच व्हायला हवा असा याचा अर्थ आहे
यामध्ये हिंदूधर्म मान्यतेनुसार सप्तपदी याचा अंतर्भाव होतो जोपर्यंत असे संस्कार युक्त लग्न होत नाही
तोपर्यंत ते लग्न कायदेशीर रित्या मान्य होत नाही.
यामध्ये बौद्ध जैन शीख इत्यादी धर्माच्या बाबतीत त्यांच्या चालीरीती नुसार लग्न समारंभपूर्वक करण्याची मुभा आहे.
७) संस्कार युक्त विवाहाची नोंद राज्य सरकारने नियमांची तरतूद केलेल्या ठिकाणी करण्यात यावी
विवाह रजिस्टर राज्य सरकार विवाह नोंदणी अधिकारी म्हणून उल्लेख केलेल्या अधिकाऱ्याकडे नोंद करू शकतात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
2 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
3 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
4 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
5 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
6 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
7 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
8 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
9 हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिल भाग 10
First Published on APRIL 10 , 2021 07 : 00 AM
WebTitle – hindu code bill law dr b r ambedkar 2021-04-10