HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण:एचडीएफसी बँक 1 जुलैपासून, HDFC बँकेत गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC लिमिटेडचे विलीनीकरण कार्यान्वित झाले आहे. गेल्या शुक्रवारी दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने विलीनीकरणाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर HDFC लिमिटेडचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं.
विलीनीकरणानंतर काय बदलले:
एचडीएफसी आता जेपी मॉर्गन, आयसीबीसी आणि बँक ऑफ अमेरिका नंतर बाजार मूल्यानुसार जगातील चौथी सर्वात मोठी बँक आहे. हे विलीनीकरण देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठा करार आहे. त्याचा आकार 40 अब्ज डॉलर्स आहे. विलीनीकरणानंतर अस्तित्वात आलेली नवीन कंपनी देशातील सर्वात मोठी वित्तीय सेवा फर्म बनली आहे. कंपनीची एकूण मालमत्ता 18 लाख कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त झाली आहे.
शेअर बाजारात काय बदल होईल:
बीएसईच्या निर्देशांकात नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे वेटेज रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा जास्त असेल. सध्या रिलायन्सचे वेटेज 10.4 टक्के आहे, परंतु विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे वेटेज 14 टक्क्यांच्या जवळपास असेल. या मर्जरनंतर HDFC च्या शेअरहोल्डरला प्रत्येकी 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळणार आहेत, एचडीएफसी बँकेच्या समभागांची सूची समाप्त करण्याचे काम 13 जुलैपासून कार्यान्वित होईल. वाचकांच्या माहितीसाठी, 4 एप्रिल 2022 रोजी, HDFC बँकेने देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC लिमिटेड स्वतःमध्ये विलीन करण्यास सहमती दर्शवली होती.
अध्यक्षांनी पद सोडले:
विलीनीकरणापूर्वी दीपक पारेख यांनी एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले. शेअरहोल्डर्सना शेवटच्या संदेशात ते म्हणाले – भविष्यात काय होईल, फक्त वेळच सांगेल. परंतु आज सर्वात मोठी जोखीम संस्थांना आहे ती स्थिती कायम राखणे.त्याचबरोबर भूतकाळात केलेले चांगले काम भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही कायम ठेवावा लागेल.
1 जुलै रोजी, HDFC लिमिटेड आणि तिच्या उपकंपनी HDFC बँकेने त्यांचे रिव्हर्स विलीनीकरण पूर्ण केले, परिणामी ₹41 लाख कोटी पेक्षा जास्त किमतीचा एकत्रित व्यवसाय झाला, ज्यामुळे बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बरोबरीने आली आहे, जे देशातील सर्वात मोठे कर्जपुरवठादार आहे. 31 मार्च 2023 पर्यंत, SBI चा एकूण व्यवसाय ₹70.30 लाख कोटी होता. तथापि, वित्तीय वर्ष 23 मध्ये विलीन झालेल्या घटकाचा एकत्रित नफा SBI च्या ₹50,232 कोटींच्या तुलनेत ₹60,000 कोटी इतका जास्त होता.
एच डी एफ सी बँक माहिती
HDFC “हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन” असं कंपनी चं पुर्ण नाव आहे. भारतातील मुंबई, महाराष्ट्र हे भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदाता HDFC बँक लिमिटेडचं मुख्यालय आहे.
एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक बँक आहे.
एचडीएफसी बँकेत खाते उघडताना किमान शिल्लक रक्कम
hdfc बँक मध्ये सेव्हिंग खाते उघडताना किमान शिल्लक रुपये 7500 आवश्यक आहे.
एचडीएफसी बँकच्या सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये काही खात्यांच्या नियमानुसार एटीएममधून अमर्याद रोख रक्कम काढता येते
तसेच झिरो-बॅलन्स मेन्टेनन्स अशा प्रकारच्या सुविधा देखील आहेत,झिरो बॅलन्स अकाऊंट सुविधा ही केवळ कॉर्पोरेट सेक्टरसाठी (कर्मचारी) आहे.
- सेव्हिंग्ज अकाउंट म्हणजे काय ?
ज्यांना आपल्या उत्पन्नातील काही भाग बचत करून ठेवावयाचा आहे अशांसाठी पैसे जमा करण्याचे सेव्हिंग्ज अकाउंट हे एक खाते आहे. सेव्हिंग्ज अकाउंट या बँक खात्यामध्ये तुम्ही तुमच्याकडील रक्कम ठेवू शकता,तसेच त्यावर व्याज देखील मिळवू शकता याशिवाय कोणत्याही वेळी त्यातून रक्कम काढता येऊ शकते.सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये रोख रक्कम सहज ठेवण्याची सोय देण्यात आली आहे.
- ऑनलाइन पद्धतीने सेव्हिंग्ज अकाउंट कोणाला कसे सुरू करता येईल
तुम्हाला जर ऑनलाइन सेव्हिंग्ज अकाउंट सुरू करायचं असेल तर ती प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही घरबसल्या देखील ऑनलाइन पध्दतीनं बँक अकाउंट प्रक्रिया सुरू करू शकता.तसेच वैयक्तिकरित्या बँकेच्या शाखेत येणे टाळण्यासाठी एचडीएफसी बँकेत तुम्ही व्हिडिओ KYC (Know Your Customer) सुविधेचा पर्याय देखील निवडू शकता.
3.सेव्हिंग्ज अकाउंट कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची आहेत ?
एचडीएफसी बँकत वेगवेगळ्या प्रकारची सेव्हिंग्ज अकाउंट आहेत – सेव्हिंग्ज मॅक्स अकाउंट, डिजीसेव्ह युथ अकाउंट, विमेन्स सेव्हिंग्ज अकाउंट, सिनिअर सिटीझन सेव्हिंग्ज अकाउंट ही त्यापैकी काही नावे आहेत. वेगवेगळ्या गटातील ग्राहकांची गरज ओळखून ही अशी वेगवेगळ्या प्रकारची सेव्हिंग्ज अकाउंट तयार करण्यात आली आहेत.
4.सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये कमीत कमी किती शिलकीची आवश्यकता असते ?
कमीत कमी आवश्यक असलेली शिल्लक किंवा मासिक सरासरी शिल्लक (Average monthly balance – AMB) हे खातेदाराने कोणत्या प्रकारचं खातं निवडलं आहे तसेच खातेदाराचं ठिकाण यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँक रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये नविन खातं उघडण्यासाठी सुरुवातीला मेट्रो / शहरी शाखांत कमीत कमी ₹ 7500 डिपॉझिट, निमशहरी शाखांत ₹ 5,000 आणि ग्रामीण भागातील शाखांत ₹ 2,500 एवढी रक्कम मेंटेन करणं आवश्यक असतं.
- सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याजदर किती आहे ?
सामान्यतः भारतातील बँक्स सेव्हिंग्ज अकाउंटवर 3.5% ते 7% दरम्यान व्याजदर दिले जाते. एचडीएफसी बँक सेव्हिंग्ज अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजदराच्या माहितीसाठी पुढील गोष्टीकडे लक्ष द्या.
सेव्हिंग्ज बँक बॅलन्स
· ₹ 50 लाख आणि त्यापुढे
· ₹ 50 लाखांपेक्षा कमी
11 जून 2020 पासून बदलण्यात आलेले दर
· 3.50 %
· 3.00%
नोंद घ्या :
सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज हे आपल्या खात्यात कायम ठेवल्या जाणाऱ्या दैनंदिन शिलकीवर आकारलं जातं.
सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज तिमाही पद्धतीने दिले जाते.
- सेव्हिंग्ज अकाउंट मधून रक्कम हस्तांतर कशी करता येईल ?
तुमच्या बचत खाते अर्थात सेव्हिंग्ज अकाउंट मधून रक्कम हस्तांतर करण्याचे काही पर्याय आहेत. प्रथम, तुमचे बचत खाते/सेव्हिंग्ज अकाउंटमधून अन्य कोणाच्या खात्यात अगदी तातडीनं पैसे हस्तांतर करण्यासाठी आपण एचडीएफसी बँकिंगचं मोबाइल अॅप्लिकेशन hdfc mobile app वापरू शकता. डिजिटल पद्धतीनं अन तातडीनं आणि सोप्या पद्धतीनं पैसे हस्तांतर करण्यासाठी नेटबॅंकिंग हा देखील एक पर्याय आहे. आपण वैयक्तिकरित्या बँकेच्या शाखेत देखील भेट देऊ शकता आणि तुमच्या बँक खात्यातून रक्कम हस्तांतर/ट्रान्सफर करू शकता.
- एखाद्याने उत्तम सेव्हिंग्ज बँक अकाउंट कसे निवडावे ?
आपली वैयक्तिक गरज लक्षात घेऊन आपण सेव्हिंग्ज अकाउंट निवडणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. एचडीएफसी बँक मध्ये, आपण आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेव्हिंग्ज अकाउंटची तुलना करू शकता आणि आपल्या गरजेनुसार जे सर्वोत्तम वाटेल त्याची निवड करू शकता.लक्षात घेण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे उपलब्ध असलेले व्याजदर, आवश्यक असलेली कमीत कमी मासिक शिल्लक आणि रोख पैसे काढण्यासंबंधी असलेल्या विविध आवश्यकता.
- ऑनलाइन पद्धतीने सेव्हिंग्ज अकाउंट सुरू करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?
एचडीएफसी बँक सेव्हिंग्ज अकाउंटसाठी अर्ज करताना पुढीस कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे :
- ओळखपत्र (वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट इत्यादी.)
- रहिवासाचा दाखला (वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट इत्यादी.)
- पॅन कार्ड
· फॉर्म 16, हे अर्जदाराच्या कंपनीद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये तुमच्या पगारातून टीडीएस वजा करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केलेले असते. अर्जदाराकडे पॅन कार्ड नसल्यास हे आवश्यक आहे.
- दोन अलिकडे काढलेले पासपोर्ट साइजचे फोटो
स्वीकारल्या जाणाऱ्या ओळख / रहिवासाचा पुरवा संबंधी कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे.
- वैध पासपोर्ट
- भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र
- वैध कायम वाहन चालविण्याचा परवाना
- आधारकार्ड
- NREGA द्वारे जारी करण्यात आलेलं आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले रोजगार प्रमाणपत्र
- नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरकडून मिळालेलं पत्र ज्यामध्ये नाव आणि पत्त्याचा उल्लेख असला पाहिजे.
आधार, पॅन कार्ड आणि वापरात असलेला मोबाइल क्रमांक याद्वारे ऑनलाइन पद्धतीने खाते सुरू करणे अतिशय सोपे आहे.
FAQ
HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण केव्हा झाले ?
1 जुलै 2023 पासून HDFC LIMITED चे HDFC Bank merger बँक मध्ये विलीनीकरण झाले.
सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये कमीत कमी किती (minimum balance ) शिलकीची आवश्यकता असते ?
मेट्रो / शहरी शाखांत कमीत कमी ₹ 7500 डिपॉझिट, निमशहरी शाखांत ₹ 5,000 आणि ग्रामीण भागातील शाखांत ₹ 2,500 एवढी रक्कम मेंटेन करणं आवश्यक असतं.
बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
तीन पासपोर्ट साइज फोटो
मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
आधार कार्ड
चालक परवाना
वीज बिल
टेलिफोन बिल
Shekhar Nikam
Analyst blogger
मनुस्मृती वाचा, वयाच्या 17 व्या वर्षी मुली मुलांना जन्म द्यायच्या, कोर्टाच्या वक्तव्याने खळबळ
फ्रान्स का जळत आहे? 17 वर्षीय Nahel M नाहेल ला पोलिसांनी का मारलं?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 03 JULY 2023, 19:50 PM
WebTitle – HDFC Bank minimum balance information