मोहन बाण – विजयी भव:
गोष्ट मोहन अरुण बाण ह्या तरुणाची, मोहन ची पार्श्वभूमी अशी की, घरातील कोणीही वडीलधारी व्यक्ती राजकारणात नाही, घरी जेमतेम 4 एकर शेत घरातील सर्व माणसे घरची शेती व शेतमजुरी करून स्वतःचा गाडा हाकतात, तब्बल 4 वर्षा पूर्वी मोहन ने स्वतःचा हॉटेल चा व्यवसाय चालू केला, त्याही ठिकाणी कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, तरीही त्याने व्यवसायात यश मिळवलं व आज आष्टी येथील सर्वात प्रसिद्ध हॉटेल अशी ,त्याच्या हॉटेल ची ओळख आहे.
तसा तो त्याच्या धंद्यात आणि कौटुंबिक कारभारात खुश होता,
पण ज्या वेळेस तो गावातील परिस्थिती पाहायचा त्या वेळेस ,गावातील विविध प्रश्न पाहून त्याच मन चलबिचल व्ह्यायच.
ज्या वेळेस गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र बसून गावातील समस्यावर चर्चा करायचे ,
त्या वेळेस असं जाणवायचं की समस्या ह्या छोट्या आहेत ,
परंतु गावातील पुढारी मंडळींना राजकीय शक्ती असतानाही त्या समस्या सोडवण्याची त्यांची इच्छा शक्ती दिसून येत नाही.
मोहन चा पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात सहभाग होता,
गावातील स्वच्छ्ता चा प्रश्न असेल किंवा छोटे मोठ्ठे उत्त्सव असतील त्याच्या पुढाकाराने सर्व उत्त्सव जोमात साजरे होतात,
ह्या वर्षीचे मतदान होण्याचा 2 महिन्यापूर्वी गावातील बहुतांश वृध्द व तरुणांना मोहन ने राजकीय क्षेत्रात यावे
व गावातील खूप दिवसापासून असलेल्या समस्या मार्गी लावावेत अस बहुतांश गावकऱ्यांची इच्छा होती.
खरं तर आम्ही तरुणांनी ह्या वर्षी बदल घडवायचा हे मनात ठाण करून ठेवलं होत.
ह्याची तयारी आम्ही गेल्या दोन वर्षा पासून करत होतो.
तयारी करत असताना “विरुद्ध बाजूने असलेला प्रचंड अनुभव आणि आमच्या बाजूने नुकतीच ओठावर मिष्या भुटलेली तरुणी बांड पोर”!
पण ह्या तरण्या पोरांसोबत गावातील सामान्य माणूस उभा होता,
कारण त्यालाही बदल हवा होता. तयारीचा भाग म्हणून आम्ही इलेक्शन यादीची चाळणी ,
उमेदवाराची निवड , इलेक्शन अजेंडा या सर्व गोष्टी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित मांडल्या व सर्वाने मते त्या गोष्टीला होकार ही मिळाला…
खरी लढाई
इलेक्शन च बिगुल वाजलं, तारखा घोषित झाल्या, आता मात्र खरी कसरत होती ,
अनुभवाची कमतरता असल्यामुळे नेहमी मनामध्ये भिती असायची ,
पण जेव्हा सामान्य माणसाने दिलेला साथीचा हात आठवायचा तेव्हा मनात वाटायचं नाही, यंदा मात्र बदल होणार!
इलेक्शन फॉर्म भरण्यासाठी कागदाची जमवा -जमव करताना मात्र नाकेनव झाले,
ही पायरी पार केल्यानंतर आता खरा प्रचार करायचा होता.
सर्वांची साथ व विश्वास
आज पर्यंत फक्त थियरी बेस अभ्यास होता, मात्र आता प्रॅक्टिकल मैदानात उतरून प्रचार करून ,
लोकांना आमची उद्दिष्टे ,अजेंडा कसा चांगला वाटेल हे पटवून सांगायचं होत,
आम्ही प्रचार हा व्यक्ती नुसार , गटा नुसार केला म्हणजे,
ज्या वेळेस महिलांना मत मागण्यासाठी गेलो तेव्हा महिलांचे प्रश्न काय आहेत ,ते मांडले,
तरुणा सोबत तरुणाईचे प्रश्न मांडले. व याचा फायदा असा झाला की सर्वांची साथ व विश्वास मिळू लागला.
गावातील इतिहासात कधी प्रचारसभा नाही घेतली गेली, ती आम्ही छोटिखाणी का होईना पण घेतली , लोकांना विश्वासात घेतले… हे सर्व चालू असताना आम्ही आडवा -आडवी व जिरवा- जिरवी च राजकारण केलं नाही, प्रचार करतानाही शब्द हा मोजून मापून च मांडला!
अश्या प्रकारे प्रचार संपला व मतदानाचा दिवस उजाडला तस तर आदल्या दिवशी एकही कार्यकर्ता नीट झोपला नव्हता, सकाळी – सकाळी सर्व कार्यकर्ते बूथ पाशी जमा झाले , प्रमुख कार्यकर्त्यांनी अगोदर मतदान करून घेतले व बूथवर येऊन बसले, येणाऱ्या प्रत्येक मतदाराला पोल चिट्टी देऊन चिन्हं परत एकदा समजावून सांगण्याचे काम चालू होते.
खरतर बूथ म्हणजे एक प्रकारचे हॉटस्पॉट ठरले होते, सकाळपासून एकाही कार्यकर्त्यांचे पोटात अन्नाचा एकही कण नव्हता , हे सर्व शर्तीचे प्रयत्न कश्यासाठी तर फक्त बदल पाहिजे ,विकास पाहिजे ,आणि मोहन सारखा तरुण चेहराच गावाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतो.ह्या सर्व गोष्टींसाठी कार्यकर्ते शर्तीला पेठले होते.अशा वातावरणात मतदान पार पडलं.
सगळे कार्यकर्ते घरी गेले व गेल्या आठ दिवसांपासून जी झोप मिळाली नव्हती जो, आराम मिळाला नव्हता तो घेण्यासाठी सर्व जण आतुर झाले होते. गावात सर्व शांत वातावरण !एरवी गेल्या पंधरा दिवसांत ज्या चर्चा पारावर व्ह्याच्या त्या आता दिसत नव्हत्या, एरवी दोन माणसं एकत्र बसून जर बोलायला लागली तर, त्यांच्याकडे doubtful नजरेने पाहिले जायचे..
निकालाची आतुरता
मतदानानंतर तिसऱ्या दिवशी निकाल होता, दोन दिवसापासून चालले गेलेले तर्क वितर्क आज संपणार होते. पहिल्यापासूनच मोहन ची बाजू भरभक्कम दिसत होती, पण तरीही शेवटचा निकाल लागे पर्यंत काहीच सांगता येत नाही ,कारण लोकांनी मतदानयंत्रात कोणत बटण दाबलय हे फक्त त्यांनाच माहीत होत. सकाळी 10 वाजल्या पासूनच आमच्या सर्व कार्यकर्त्यांची फौज मतदान मोजणी केंद्रा बाहेर येऊन उभा टाकली होती, इत्तर गावातील लोकही तिथे त्यांचा निकाल पाहण्यासाठी थांबले होते.
मतमोजणी केंद्राला जत्रेचे रूप मिळाले होते. आमचा नंबर सातव्या फेरीत होता, जशी जशी फेरी जवळ येत होती, तशी तशी आमच्या सर्वांचेच heart beat वाढतं होते, सर्व हितचिंतक , गावातील मंडळी, मित्र या सर्वांचे फोन चालूच होते. अश्यातच मतमोजणी अधिकाऱ्याने आमच्या गावाचे नाव पुकारले, फक्त उमेदवारांना आत मध्ये एंट्री होती.
दोन्ही बाजूचे उमेदवार आता गेले व कार्यकर्ते बाहेर वाट बघत बसले , प्रत्येक सेकंद एक तासासारखा वाटतं होता, फोनही चालूच होते, तेवढ्यात अचानक मोहन बाहेर आला ,सगळ्याच्या नजरा त्याच्या कडेच लागून होत्या तेवढ्यात वाघान हात वरी केला, आणि सगळ्यांना मेसेज पास झाला!!!शेवटी विजय झाला आणि प्रत्येक कार्यकर्ता हा जोमाने नाचू लागला, सगळ्यांना फोन करून सांगू लागेल.आणि फोन उचल्यावर एकच वाक्य असायचं ते म्हणजे ‘9 पैकी 9’ , म्हणजे सर्वच्या सर्व आमचे उमेदवार निवडून आले होते, गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा विजय एका तरण्या बांड पोरांन खेचून आणला होता…
विजयी जल्लोष
सर्व कार्यकर्ते आनंदाने नाचत होते ,बघता बघता ही बातमी गावात व अख्या तालुक्यात पसरली, बातमीचा शीर्षक असा की… “मोहन बाण याने नऊ पैकी नऊ निवडून आणले”.. मोहन ने हा विजय माझा नसून माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे हे घोषित केलं! विजयी भाषणात कसल्या ही प्रकारचा गर्विष्टपणा न बाळगता , विजयी व पराभूत उमेदवार आपलेच आहेत , इलेक्शन ला इलेक्शन पुरतं मर्यादित ठेऊ व गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून हातभार लावू , हा ग्रंथ ह्या पठ्ठ्याने तिथे वाचला.
“व एका नवीन पर्वाला सुरुवात झाली”
पर्व नवे मोहन बाण.….!
लेखन – विठ्ठल देशमुख
महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)