पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट च्या बिल्डिंग मध्ये आग लागली आहे,ही आग दुसऱ्या माळ्यावर लागल्याचे समजते.
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु.
ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तिथे बीसीजी ची लस बनते.
या आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही,
अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली आहे.अफवांवर विश्वा ठेवू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहेत.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते.
ड्रॅगन फ्रूट चं नाव बदलणार गुजरातचे भाजप सरकार
देशात आणि जगात ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) म्हणून ओळखल्या जाणा या फळाला गुजरातमध्ये आता “कमलम” फळ म्हणून ओळखले जाईल.फळांमध्ये ड्रॅगन या शब्दाचा वापर योग्य वाटत नाही असे गुजरात चे मुख्यमंत्री विजय रूपाणी (vijay rupani) यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, ड्रॅगन फळ कमळाप्रमाणे दिसते, म्हणूनच या फळाला संस्कृत शब्द कमलम असे नाव देण्यात येणार आहे.
चिनी ड्रॅगन फळ आता गुजरातमध्ये कमलम (Dragon Fruit now kamalam) म्हणून ओळखले जाईल.गेल्या काही वर्षात गुजरातमधील कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील नवसारी या परिसरातील शेतकरी ड्रॅगन फळाची मोठ्याप्रमाणावर लागवड करीत आहेत.येथे ड्रॅगन फळही मोठ्याप्रमाणात तयार होत आहे. ड्रॅगन हा शब्द कोणत्याही फळात वापरु नये,असे गुजरातच्या भाजप सरकारला वाटते.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)