गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चित्तोडगाव येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तीन निष्पाप बालकांचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेत तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
गणपती विसर्जन दरम्यान मद्यधुंद चालकाने अचानक ट्रॅक्टर सुरू केला, तीन चिमुकल्यांचा चिरडून मृत्यू
धुळे शहरालगतच्या चित्तोड गावात ही दुर्दैवी घटना घडली. मिरवणुकीदरम्यान कार्यकर्ते एका ठिकाणी थांबून नाचत असताना, मद्यधुंद चालकाने अचानक ट्रॅक्टर सुरू केले, ज्यामुळे तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीनं धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या आनंदात असताना धुळ्यातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. दरम्यान,सदर घटनेचा तपास धुळे तालुका पोलिसांकडून केला जात आहेत.
मृतांमध्ये परी शांताराम बागुल (वय १३), शेरा बापू सोनवणे (वय ६), आणि लड्डू पावरा (वय ३) या निष्पाप बालकांचा समावेश आहे.
याघटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी हृदय पिळवटणारा आक्रोश केला.
दुसरीकडे, गंभीर जखमी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हिरे रुग्णालयात मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
मृत आणि जखमींची नावे
सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये परी शांताराम बागुल (वय 13 वर्षे), शेरा बापू सोनवणे ( वय 6 वर्षे)
आणि लड्डू पावरा ( वय 3 वर्षे) या तीन चिमुकल्यांचा समावेश असून,
गायत्री निकम पवार ( वय 25), विद्या भगवान जाधव ( वय 27), अजय रमेश सोमवंशी (वय 23),
उज्वला चंदू मालचे (वय 23), ललिता पिंटू मोरे ( वय 16) आणि रिया दुर्गेश सोनवणे (वय 17)
हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 17,2024 | 19:10 PM
WebTitle – Drunken driver suddenly starts tractor during Ganapati immersion, crushing three toddlers to death