नवादा: नवादा ( बिहार ) दलित वस्तीवर हल्ला : जातीयवाद्यांचा थरार, फायरिंगनंतर दलितांची 80 घरं जाळली, मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात : बिहारमध्ये सुशासन असल्याचे बोलले जाते.परंतु काही घटना अशा आहेत ज्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, बिहारमधील जातीयवाद्यांना पोलिस आणि प्रशासनाची भीती आहे का? देशातील जातीयवादी जात दांडग्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या नंतरही दलितांवरील अन्याय अत्याचार थांबवलेले नाहीत. अशाच प्रकारची एक घटना बिहारच्या नवादा जिल्ह्यात घडली आहे. जिथे एका महादलित वस्तीवर जातीयवादी जात दांडग्यांनी थैमान घातले आहे. जातीयवाद्यांनी पहिल्यांदा फायरिंग करून दहशत निर्माण केली आणि त्यानंतर वस्तीतील 80 घरं जाळून टाकली. ही घटना मुफस्सिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
जातीयवाद्यांचा थरार
घटनेनंतर पोलिसांनी तिथे तळ ठोकला आहे. प्रशासन सतर्क झाले आहे आणि कारवाईची तयारी करत आहे. माध्यमांच्या अहवालानुसार आणि मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादामुळे हा संघर्ष झाला. त्यानंतर जातीयवादी जात दांडग्यांनी दलितांची वस्ती जाळली. या दरम्यान मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत.दोन गटांमध्ये जोरदार संघर्षाची माहिती मिळत आहे. ग्रामस्थ दलितांनी जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र जात दांडगे मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी वस्तीला आग लावून पळ काढला आहे.ननौरा जवळील कृष्णा नगर दलित वस्तीत ही घटना घडली आहे.
प्राथमिक माहिती नुसार, जमिनीच्या वादामुळे हा संघर्ष उफाळला आणि दलित वस्तीत आग लावली गेली. जमिनीच्या वादावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला आणि याच वेळी मारहाण आणि आग लावण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर अनेक घरे जाळून टाकण्यात आली. ही घटना नवादा जिल्ह्यातील मुफस्सिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ननौरा जवळील कृष्णा नगर दलित वस्तीत घडली आहे, जिथे संघर्ष झाला आहे.
घटना गंभीर व दु:खद – मायावती
बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले: “बिहारच्या नवादा येथे दबंगांनी गरीब दलितांचे अनेक घरे जाळून त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे.ही घटना अत्यंत दु:खद आणि गंभीर आहे. सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी आणि पीडितांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.”
तेजस्वी यादव यांनी नितीश सरकारवर निशाणा साधला
नवादा येथील घटनेवर जेडीयू नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले, “महा जंगलराज! महा दानवराज! महा राक्षसराज! नवादामध्ये दलितांच्या 100 पेक्षा जास्त घरांना आग लावली गेली. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या राजवटीत बिहारमध्ये आगच आग आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार निष्काळजी, एनडीएचे सहयोगी पक्ष अनभिज्ञ! गरीब जळो, मरो – यांना काय फरक पडतो? दलितांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही.”
नवादा ( बिहार ) दलित वस्तीवर हल्ला : जातीयवाद्यांचा थरार, फायरिंगनंतर दलितांची 80 घरं जाळली, मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात
घटनेवर नवादा एसडीपीओ सुनील कुमार यांनी सांगितले की, सध्या कुठल्याही जीवितहानीचा अहवाल प्राप्त झाला नाही.
प्राथमिक माहितीनुसार ही जमीनीच्या वादाची घटना वाटत आहे.
अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि काही लोकांना ताब्यात घेतले गेले आहे.
अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल.
It's deeply troubling that caste-based violence continues to persist in India, where marginalized communities like Dalits still face severe atrocities. Such incidents reflect a harsh reality of systemic discrimination, showing that in many places, casteism remains a cruel and dehumanizing force. Despite legal protections, the social divide often fuels these brutal acts, and many perpetrators act with impunity. Still, they oppose the reservation policy, which is also a form of caste-based violence. Addressing this issue demands not only legal action but also a profound shift in societal attitudes, where human dignity and equality take precedence over ancient prejudices.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 19,2024 | 08:30 AM
WebTitle – Dalit Homes Set on Fire Amid Land Dispute in Nawada, Bihar