छपरा: जिल्ह्यातील एकमा परिसरात दसरा मिरवणुकीदरम्यान एक मोठा गोंधळ उडाला. मिरवणुकीत असलेल्या हत्ती वरचे अचानक नियंत्रण सुटले, ताबा गमावला आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तब्बल एक तास हा हत्ती बाजारात धुमाकूळ घालत होता. या दरम्यान, हत्तीने अनेक गाड्यांचे नुकसान केले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यात हत्ती गाड्यांना खेळण्यासारखे उचलून फेकताना दिसत आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सुमारे एक तासानंतर, मोठ्या प्रयत्नांनी बिथरलेल्या हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
छपरा येथील दसरा मिरवणुकीत हत्ती झाला अनियंत्रित
घटना एकमा परिसरातील आहे. येथे शनिवारी संध्याकाळी एकमा येथील प्रसिद्ध आंखडा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुइली गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत सामील असलेला एक हत्ती अचानक भडकला.सुरुवातीला हत्ती शांतपणे मिरवणुकीत चालत होता, परंतु गर्दीत होणारा आवाज आणि चारचाकी वाहने पाहून हत्ती बिथरला असे म्हटले जातेय. अशाप्रकारे हत्ती मिरवणुकीत अनियंत्रित झाला आणि त्यानंतर त्याने मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उत्पात माजवला. जत्रेत एक तासभर गोंधळाचे वातावरण होते.
व्हिडिओ समोर आला
हत्ती बिथरून उत्पात माजवत असल्याची बातमी मिळताच जत्रेत धावपळ सुरू झाली.लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. या गडबडीत काहींनी हत्तीचा व्हिडिओ बनवला. बिथरलेल्या हत्तीने दोन चारचाकी वाहने, तीन दुचाकी आणि आसपासच्या इतर वस्तूंचे नुकसान केले. या दरम्यान, मेळ्यातील इतर हत्तींच्या माहूतांनी कसेबसे हत्तीला गर्दीमधून बाहेर काढले आणि एका निर्मनुष्य शांत बागेत नेले. तिथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याचा हत्तीने जीव घेतला. शेवटी, मोठ्या प्रयत्नांनी हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 13,2024 | 13:48 PM
WebTitle – Chhapra: In Bihar Dussehra procession elephant became uncontrollable