नवी मुंबई : करणी सेना च्या अजय सिंग सेंगर याच्यावर पनवेल पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम 295 -अ अंतर्गत काल संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते आणि विधीज्ञ अमित कटारनवरे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.भीमा कोरेगांव येथील स्तंभ पाडून टाकण्याची अतिशय वादग्रस्त व गंभीर स्वरूपाची समाजात असंतोष निर्माण करणारी भाषा करणी सेना च्या अजयसिंग सेंगर याने काल संध्याकाळी साम टीव्हीच्या माध्यमातून वापरली होती.
करणी सेना चा अजय सिंग सेंगर नेमकं काय म्हणाला?
भीमा कोरेगांव शौर्य दिन साजरा करण्यास करणी सेना नामक संघटनेने विरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.या पार्श्वभूमीवर करणी सेनेचा अध्यक्ष अजय सेंगर म्हणाला की, करणी सेनेकडून १ जानेवारी रोजी श्रद्धांजली सभा घेणार आहे. इंग्रजांकडून लढलेल्या गद्दारांचा भारतीयांनी उदो उदो करु नये, असेही तो म्हणाला. यानंतर याला धार्मिक स्वरूप देत हिंदू धर्माचा उल्लेख करत अजयसिंग सेंगर ने या घटनेला अचानक धार्मिक रंग देत,हे हिंदू धर्माविरुद्ध कारस्थान असल्याचा अजब आरोप केला.
तिकडे आलास तर खिमा होईल
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साम टीव्ही वाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं की ” हा सेंगर कोण आहे मला माहित नाही.परंतु तो स्तंभ म्हणजे एक इतिहास आहे. एका इतिहासाची अनुभूती आहे.एका इतिहासाची साक्ष आहे.ज्याला इतिहास माहिती नसतो तो असे वाद विवाद निर्माण करण्यासाठी आणि टीव्हीवर येण्यासाठी अशा गोष्टी करत असतो. असे किती सेंगर की सिंगर आले तरी त्यांचा बाप सुद्धा ते पाडू शकत नाही.असल्या वाद विवादात मला घेऊ नका,असं जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देताना म्हणाले.यासोबतच ‘करनी सेना भीमा कोरेगाव ला एक तारखेला आल्यास त्यांचा खिमा होईल, असा इशारा आव्हाड यांनी साम टीव्ही प्रतिक्रिया देताना दिला आहे.
करणी सेना अध्यक्ष अजयसिंग सेंगर ला रासुका खाली अटक करा
साम टीव्ही च्या कार्यक्रमात आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,
करनी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग यांनी केलेली मागणी अत्यंत निंदनीय आहे.
विनाकारण जाती जातीत धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी मागणी आहे.
इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे,कारण ते स्वत: खैबरखिंडीतून आलेले असल्यामुळे त्यांना इतिहास समजत नाही.
भारताचा इतिहास त्यांना माहित नाही.भारताचा इतिहास त्यांनी व्यवस्थित समजून घेतला पाहिजे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करतो की करणी सेनेच्या या माणसाला तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अटक करावी.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभावर शौर्यदिन सोहळा साजरा केला जातो. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असतात.यंदा या सोहळ्यात १४ ते १५ लाख अनुयायी येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरेगाव भीमा परिसरात २४० सीसीटिव्ही कँमेरे आणि ड्रोन कँमेरातून बारीक नजर ठेवली जाणार आहे. तसेच ४५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 30,2022, 13 :03 PM
WebTitle – Case registered against Ajay Singh Sengar of Karni Sena for bhima koregaon controversial statement