पनवेल, 28 जून : करणी सेना प्रमुख अजय सेंगर याला काल भीम सैनिकांनी चोप दिला.पनवेलच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून अजय सेंगर ला यथेच्छ धुलाई करत मारहाण करण्यात आलीय.संविधानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे ajay sengar अजय सेंगर ला भीम सैनिकांनी भीम टोला दिला आहे.पनवेल अग्निशामक दलाच्या इमारती मध्ये ही माराहण झाली असून मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे.
करणी सेना च्या अजय सेंगर ला का झाली मारहाण?
‘करणी सेना अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या अजय सेंगर ला पनवेलच्या भीम सैनिकांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता, अजय सेंगर प्रसिद्धीसाठी सातत्याने आंबेडकरी समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत असायचा,मागे त्याने थेट भीमा कोरेगाव चा स्तंभच पाडून टाकण्याची बालिश मागणी करत समस्त आंबेडकरी बहुजन समाजाचा रोष ओढवून घेतला होता,अजय सेंगर सातत्याने आक्षेपार्ह भाषा वापरत असायचा. अजय सेंगर संविधान देखील मानत नसून ते बदलण्याची भाषा बोलत असायचा,या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या विरोधात पनवेल मधिल आंबेडकरी समाजाने एक नव्हे दोनदा मोर्चा काढत कारवाई करण्याची मागणी केली होती,मात्र पोलिस प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही,आणि कोणतीही कारवाई केली नाही.
या सर्व प्रकाराने आंबेडकरी समाजात संतापाची लाट होती.त्यामुळे शेवटी त्याला पॅंथर स्टाईल धडा शिकवण्याची जबाबदारी भीम सैनिकांनी पार पाडली. अशा देशद्रोही व्यक्तीच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आजन्म कारावास द्यावा तसेच तो भारताचे संविधान मानत नसेल तर त्याला पाकिस्तान ला पाठवून द्या,अशी भावना यावेळी माध्यमांशी बोलताना भीम सैनिकांनी व्यक्त केली.अजय सेंगर ने जर पुन्हा असे केले तर त्याला पुन्हा चोपून काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.
बहुजन समाजातील महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती शाहूमहाराज,महात्मा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्याविरोधात जे जे आक्षेपार्ह वक्तव्य करतील त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,
भले आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील. अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आलीय.
दरम्यान अजय सेंगर याने त्याच्यावर झालेल्या मारहाणीचा निषेध केल्याचे समजते.
video : एकतर्फी प्रेमातून हल्ला;पुणे करांनी पकडला हल्लेखोर
अमेरिकेतील रस्त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 28 JUN 2023, 09:14 AM
WebTitle – live video: Karni Sena ajay sengar beaten up