जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात, सुतगिरणीजवळ कार आणि बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. खराब रस्ता असल्याने कारचा टायर फुटल्याची प्राथमिक माहिती येत असून या अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये शैलेश श्रीधर वाणी (३४), नीलेश श्रीधर वाणी (३०) आणि जितेंद्र मुरलीधर भोकरे (४७) यांचा समावेश आहे.

रस्त्याच्या खराब स्थितीमुळे कार अपघातग्रस्त
धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब दरवर्षी नवरात्रीत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिरात भंडारा देण्यासाठी जात असतात. मंगळवारी सकाळी शैलेश, नीलेश आणि जितेंद्र हे कारने मंदिराच्या दिशेने निघाले होते. परंतु, मंदिराजवळच असताना त्यांची कार रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अपघातग्रस्त झाली. कारचे टायर फुटल्याने ती समोरून येणाऱ्या बसवर आदळली, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चोपडा-नाशिक शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता निघाली होती,
आणि काही अंतरावर असलेल्या सुतगिरणीजवळ ती समोरून येणाऱ्या कारवर धडकली.
या भयानक अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वाणी कुटुंब मनू देवीच्या दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 08,2024 | 16:38 PM
WebTitle – Car-Bus Collision Due to Bad Road, Two Brothers Killed Jalgaon After Rear and Front Tires Burst