महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी ‘नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स’ या अमोघ शांती संदेश वाक्यांचे उच्चारण झाले.संघम सरणं गच्छामि…इतिहासाद पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिख्खूना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदान करण्यात आले.

इतिहासाद पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिख्खू

बौद्ध धम्म (धर्म ) हा कर्मावर आधारित आहे. बौद्ध धम्मात हिंसेला, अशांतेला स्थान नाही. भगवान बुद्धांनी जगाला अहिंसा, दया, करुणा असा संदेश दिला आहे. या त्रयीच्या जोरावरच विश्वसेवा घडू शकते. याच भावनेनं अहोरात्र काम आपलं सरकार करत आहे. गोरगरीबांच्या उत्थानासाठी झटत आहे. आपण प्रत्येकानं भगवान बुद्धांचे विचार आत्मसात केले, तर हे जग सुंदर होईल, असं मतही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडले.

जगभरात युध्दे चालू आहेत. देशातही काही असंतुष्ट अशांतता निर्माण करत आहेत.
आपल्या राज्यात सुद्धा शांततेचा भंग होण्यासाठी काही लोक कामाला लागले आहेत.परंतु आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तथागत भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश आणि डॉ.बाबासाहेबांचे संविधान यांना समक्ष ठेवूनच आपलं सरकार जनसामान्यांसाठी रात्रीचा दिवस करत असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उपस्थित भंतेजीना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान

या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित भंतेजीना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज बौध्द भिख्खू यांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ या ठिकाणी बुद्ध धम्म वंदना झाली. इतिहासाद पहिल्यांदाच भिक्खू संघाचा कार्यक्रम पार पडला.

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 23,2024 | 08:20 AM
WebTitle – Buddhist Monks Receive Robes, Dhamma, and Food Donations at CM eknath shinde’s Residence for the First Time in History