
उत्तर प्रदेशातील भदोही येथे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथे भाजप नेत्याची 45 वर्षीय पत्नी 30 वर्षीय पोलिसासोबत घरातून पळून गेली आहे. ती आपल्या मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. तसेच घरातून कोट्यवधींची रोकड आणि दागिने घेऊन पळाली आहे. तिचा प्रियकर एक पोलिस कर्मचारी असून तो याच घरात भाड्याने राहत होता.
उत्तर प्रदेशातील भदोहीत भाजप नेत्याची पत्नी, जी दोन मुलांची आई आहे, ती आपल्या प्रियकरासोबत पळाली आहे. विशेष म्हणजे ती स्वतःही भाजप मध्ये कार्यरत होती आणि चेयरमॅनच्या निवडणुकीसाठी लढली होती. तिचा प्रियकर उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे आणि तो तिच्या घरात भाड्याने राहात होता. महिला 45 वर्षांची आहे आणि कॉन्स्टेबल तिला 15 वर्षांनी लहान म्हणजे 30 वर्षांचा आहे. तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांची शोधाशोध सुरू केली आहे.
भाजप नेत्याचा आरोप,केवळ पैशांसाठी त्याच्यासोबत पळाली
भाजप नेत्याचा आरोप आहे की त्याच्या पत्नीने 2.5 कोटींचे दागिने आणि रोकड घेऊन कॉन्स्टेबलसोबत पळ काढला आहे.
पतीने असा आरोप केला की कॉन्स्टेबलने त्याच्या पत्नीला फसवले आणि ती केवळ पैशांसाठी त्याच्यासोबत पळाली आहे.
तो तिची हत्या करू शकतो, अशी भीती पतीने व्यक्त केली आहे.
हे प्रकरण गोपीगंज नगरचे आहे. येथे राहणाऱ्या भाजप नेत्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, सुमारे एक वर्षापूर्वी गोंडा जिल्ह्याचा रहिवासी असलेला पोलिस शिपाई विनय तिवारी उर्फ राज तिवारी त्यांच्या घरी भाड्याने राहायला आला होता. पण त्याच्या पत्नी आणि पोलिस शिपाई मध्ये प्रेमसंबंध कसे जुळले याची त्याला काहीच कल्पना नव्हती. पोलिस शिपायाने फार चलाखीने त्याच्या पत्नीला फसवले आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिचे काही फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले आणि जर तिने काही सांगितले तर सगळ्यांना फसवण्याची धमकी दिली.
भाजप नेते काय म्हणाले?
भाजप नेत्याने सांगितले की, जेव्हा त्याला याबद्दल कळले, तेव्हा त्याने त्या पोलिस शिपाई विनय तिवारीला आपल्या घरातून बाहेर काढले. त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. विनय तिवारीला घरातून बाहेर काढल्यानंतर, तो राग धरू लागला आणि षडयंत्र रचू लागला. त्या रागातच 28 ऑगस्टला त्याने त्याच्या पत्नीला फसवले आणि ती त्याच्यासोबत निघून गेली. त्या वेळी घरात कोणी नव्हते. या संधीचा फायदा घेत पत्नीने घरातून 2 कोटींचे दागिने आणि 4 लाख रुपये रोख घेऊन गेली. एवढेच नाही, तर तिने आपल्या 7 वर्षांच्या मुलालाही सोबत नेले.
पतीने सांगितले की, त्याने दोघांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा कुठेही मागमूस लागला नाही.
भाजप नेत्याने असा आरोपही केला की, या प्रकरणात काही स्थानिक लोकही गुंतलेले आहेत.
याआधी, पोलिस शिपाई विनय तिवारी भाड्याने राहत असताना त्याला काही वेळा चुकीच्या कामांत पकडले होते.
याबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांच्या मदतीने त्याला घरातून बाहेर काढले होते.
पतीने प्रियकरावर आरोप केले
महिलेच्या पतीने असा आरोप केला की प्रियकराने त्याच्या पत्नीला फसवले. त्याची पत्नी 45 वर्षांची आहे आणि हा पोलिस शिपाई 30 वर्षांचा आहे. त्यांच्यात कोणताही साम्य नाही. तो केवळ पैशांसाठी तिच्यासोबत गेला आहे. त्याने असा संशय व्यक्त केला की पोलिस शिपाई त्याच्या पत्नीची हत्या करू शकतो. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केस दाखल केली आहे आणि आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 26,2024 | 08:35 AM
WebTitle – BJP leader’s wife ran away with her boyfriend