प्रत्येक व्यक्ती ही धार्मिक असू शकते किंवा ती नास्तिक म्हणजे धर्म अजिबात न मानणारी ही असू शकते. जगात अनेक धर्म आहेत प्रत्येकाची उपासनेची पद्धत वेगवेगळी आहे.कुणी देव मानतो कुणी देव नाही मानत. देव न मानणाऱ्याचाही एक धर्म निर्माण झाल्याचं दिसतं. धार्मिक असणं काही गुन्हा नाही आणि धार्मिक नसणं हा ही कुठला गुन्हा नाही. ज्याला जे भावत ते तो करतो.धर्म ही अफूची गोळी आहे हे म्हटलं गेलं परंतु धर्म नाकारण्यात आग्रही असणाऱ्या नास्तिकांचाही धर्म होऊन बसल्याच आणि त्या धर्मात जाऊन धर्मापेक्षाही कट्टर झाल्याचं आपल्याला दिसतं.
धर्मातही तेवढीच कट्टरता
जर कुणी धर्म मानत नसेल तर तो मूर्ख कसा काय ठरतो आणि जो धर्म मानतो तोही मूर्ख कसा काय ठरतो. पण ही सापेक्षतः आपल्यात आहे आणि ती नाकारून चालणार नाही. ज्याचा जो विचार आहे त्याचा सन्मान करणं याला आपण सहिष्णुता म्हणतो. ही सहिष्णुता समाजामध्ये आता आढळतांना दिसत नाही नव्हे ती कधीच नव्हती.समाज नेहमीच दुभंगलेला होता आधी तो वेगवेगळ्या धर्मात विभागला होता आता त्यात तेवढाच कट्टर पणा असलेला नवीन धर्म जन्माला आला तो म्हणजे धर्मच नाकारणारा एक नवीनच धर्म. त्या नवीन धर्मातही तेवढीच कट्टरता असल्याचं आपल्या लक्षात येतं.
धर्माच्या मध्यभागी जर देव असेल तर तिथं अंधश्रध्दा वाढण्याची शक्यता जास्त असते.देव कुणी पाहिला असण्याची शक्यता कधीच नसते परंतु त्याच्या आख्यायिका आपण ऐकत असतो. त्यातूनच अंधश्रध्दा जन्म घेते.पुन्हा श्रध्दा आणि अंधश्रध्दा यावरून वाद होताना दिसत. धर्माच्या मध्यभागी जर माणूस आणि नैतिकता असेल तर ही बाब नक्कीच माणुसकीला पोषक असू शकते. Morality and ethics should always be the center of religion. पण अस होतांना आपल्याला दिसत नाही.
त्यामुळे मानव कल्याण वगैरे गोष्टींचा अभाव असल्याचा आपल्याला धर्म पाळताना असणाऱ्या रीतिरिवाज किंवा चालीरीती मध्ये आढळतो. खरंतर धर्माची उपयुक्तता नक्कीच आहे. समाजाची पुनर्बांधणी करून एक चांगला समाज घडवणं आणि त्यातूनच आदर्श माणूस घडवणं हे साधारण धर्माच उद्धिष्ट असलं पाहिजे नव्हे असच असावा हे अभिप्रेत आहे. कदाचित हे घडू ही शकेल. अनेक ठिकाणी घडत ही असेल.
धर्म हे एक साधन
धर्म हे खरंतर एक साधन आहे परंतु त्यालाच आपण साध्य ही केलं आणि सर्वस्व ही केलं. त्यालाच आपण एक हत्यार ही केलं. धर्माच्या भोवतीच एक भावनांचं जाळ विणल गेलं. त्याचे दुष्परिणाम दिसू लागताच धर्माला विरोध ही वाढू लागला, शेवटी धर्माला अफूची गोळी ही म्हटलं.सध्यातर जगभर धर्म हे दुधारी हत्यार बनलंय, तेवढंच निधर्मी असणं ही दूधारी हत्यार होतांना दिसतं.
बराच काळ धार्मिक आणि निधर्मी यात जग दुभंगलेल आपण पाहिलं ते इतकं की जगाच्या इतिहासात सर्वात भयानक अस शितयुद्ध होतं ते. परिस्थिती अत्यंत बिकट आणि प्रक्षोभक होती, कोणत्या क्षणी काय होईल याचा नेम नव्हता. अर्थात जगात काही शहाणी डोकी होती त्यांच्या मुळे सगळं निभावून नेलं.धर्मा धर्मातली तेढ, धार्मिक आणि निधर्मीय यांच्यातली तेढ प्रचंड प्रमाणात वाढलेली असतांना एक अत्यंत प्रक्षोभक वातावरण सध्या जगातल्या प्रत्येक देशात आपल्याला दिसेल. देशांतर्गत असलेलं हे वातावरण इतर विशेषतः शेजारी देशांच्या चिथावणी मुळे ही गढूळ होतांना दिसतं.
धार्मिक माणूस सांप्रदायिक असतोच अस नाही
धार्मिकता आणि सांप्रदायिकता यात नेहमी गल्लत केली जाते. वास्तविक धार्मिक असणं यात वाईट काहीच असू नये.
धर्म ही वैयक्तिक बाब आहे. ती व्यक्तिगत शिवाय सामाजिक पातळी वर ही सामूहिकरित्या प्रॅक्टिस केली जाते
परंतु धार्मिकतेचा वापर जेव्हा सत्ते साठी केला जातो मग ती राजकीय सत्ता असेल
किंवा सामाजिक सत्ता असेल तेव्हा त्याला एक अमानवी स्वरूप येतांना दिसतं.
धर्म धर्मात तेढ निर्माण करून लोकांना चिथावण आणि त्यातून समूहाचा
किंवा व्यक्तिगत स्वार्थी फायदा करून घेण्यातून जे निर्माण होत ती सांप्रदायिकता.
धार्मिक माणूस सांप्रदायिक असतोच अस नाही आणि सांप्रदायिक माणूस धार्मिक असेलच असही नाही.
अनेक उदाहरणं देऊ शकतो याची. इतिहासात अजिबात धर्म न मानणारे आहेत
ज्यांनी सांप्रदायिकता पसरवून सत्तेचा राजकारण केलं आणि अत्यंत धार्मिक असणारेही कधी सांप्रदायिकतेचा म्हणजे धर्मा धर्मात,
जाती जातीत तेढ निर्माण करून स्वार्थ साधला नाही, जे सहज त्यांना शक्य होतं.
धार्मिक विरुद्ध निधर्मी
धार्मिक असणारे आणि निधर्मी असणारे ही सांप्रदायिक strategy वापरतांना दिसतात.
अनेक ठिकाणी निधर्मीयांनी धर्माला केलेला टोकाचं विरोध ही मोठ्या प्रमाणात घातक ठरल्याच दिसतं.
धर्मा धर्मात, जाती जातीत तेढ निर्माण करणं अत्यंत सोपं आहे.कारण त्याला अस्मितेच आवरण सहज घालता येतं.
अस्मिता म्हटलं की सर्वसाधारण माणूस पेटून उठतो, त्याला motivate करणारा factor म्हणजे त्याची अस्मिता.
परंतु अस्मिता नेमकी कशात असते याचा सारासार विचार करण्या इतपत कदाचित प्रगल्भता नसेल म्हणून तो आशा जाळ्यात अडकून जातो. अर्थात गेल्या काही वर्षात हीच अस्मिता निधर्मीयांच्या मध्ये ही तेवढीच ठासून भरली आहे असं निरीक्षण मांडता येईल.
Rational thinker म्हणता म्हणता तेही अस्मितेला हात घातल्या सारखं चवताळून उठताना दिसतात.
धर्मा विरुध्द बोलून न कळत स्वतः त्यांच्या नवीन धर्माच्या अस्मितेत जाऊन अडकतात.
धार्मिक विरुद्ध निधर्मी हा सुध्दा एक सांप्रदायिकतेचा प्रकार होऊन बसलाय,दुर्दैवी आहे हे.
निधर्मी असण्यात काहीच वाईट नाही
सहिष्णुता (tolerance ), दुसऱ्याच्या मताचा आदर, सन्मान किंवा किमान खिल्ली न उडवण्याची मानसिकता येणं गरजेचं आहे. संविधानाच्या preamble मध्ये हीच गोष्ट अधोरेखित केली आहे परंतु तीच सहजपणे दुर्लक्षित केली जाते. तुम्ही धार्मिक असाल तर निधर्मीयांशी वैर धरण कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे. किंवा तुम्ही निधर्मी असाल तर धर्मांची खिल्ली उडवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे.
होय अंधश्रध्दा असेल तर नक्की योग्य शब्दात, भाषेत तुम्ही प्रबोधन करू शकता, हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो बाजावलाच पाहिजे. धर्मातल्या वाईट चालीरीती, रितिरिवाजवर भाष्य करू शकता परंतु ते टीकात्मक न करता प्रबोधनात्मक असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही कट्टरते कडे वाटचाल करण्याची भीती आहे. माणूस धार्मिक असण्यात जसं वाईट नाही तसंच तो निधर्मी असण्यात काहीच वाईट नाही. परंतु याचा वापर तुम्ही सत्ता स्पर्धे साठी करत असाल आणि त्यातून जाती जातीत, धर्मा धर्मात तेढ निर्माण करत असाल तर ती सांप्रदायिकता आहे जी सामाजिक आरोग्याला अत्यंत घातक आहे. एक सशक्त समाज निर्माण होण अवघड असेल.
by – Sunil kadam
लेखक सामाजिक चळवळींचे अभ्यासक,विश्लेषक आहेत.
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)