मुंबई : ऑनलाईन मोबाईल गेम चा अतिरेक एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला.पाचवीतील एका मुलाचा जीव ऑनलाईन गेमच्या अतिरेकाने गेल्याची माहिती समोर येत आहे.पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणे फारच गरजेचं झालं आहे.आपली मुलं दिवसभर मोबाईल हातात घेऊन असतात का? मोबाईलवर ती नेमकं काय करतात? याकडे पालकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.अन्यथा या बेसावधगिरीमुळे एखाद्या अप्रिय घटनेला सामोरे जावं लागू शकतं.
दादर मधील फक्त १३ वर्षे वय असणाऱ्या मुलानं आत्महत्या केल्याची बातमी सर्वांसाठी धक्कादायक आहे.या बातमीमुळे पालकवर्गात चिंतेचे वातवरण निर्माण होणे स्वाभाविक आहे.याच चिंतेतून आत्महत्या केलेल्या मुलाच्या पालकांनी आवाहन केले आहे.मी माझ्या मुलाला गेम्स मुळे गमावलं आहे.तुम्ही तरी तुमच्या मुलांना असे गेम्स खेळायला देऊच नका.असं मुलाच्या वडिलांनी म्हटलंय.याबाबतचे वृत्त मिडडे नं दिलंय.
दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावरील सोसायटी मध्ये या विद्यार्थ्यांचे पालक राहतात.हा विद्यार्थी अभ्यासात हुशार होता.
तसेच तो क्रिकेट सुद्धा छान खेळत होता.असं त्याचे बाबा सांगतात.
विद्यार्थ्यांचे पालक एका खाजगी बांधकाम कंपनीत डिझायनर म्हणून काम पाहतात.
लॉकडाऊन मुळे मुलांच्या शाळा ऑनलाईन सुरु झाल्या.त्यामुळे या विद्यार्थ्याला सुद्धा त्याच्या वडिलांनी मोबाईल घेऊन दिला.
हातात मोबाईल आल्यामुळे या विद्यार्थ्यांचे गेम खेळण्याचे व्यसन वाढले.
तो सतत मोबाईलवर गेम खेळू लागला.(Addicted To Mobile Games)
ऑनलाईन गेम मुळे मुलाचा जीव गेला
Free Fire हा गेम तो सतत खेळत असायचा,हा गेम सध्या भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहे.मात्र या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतरच्या दुसऱ्या दिवशीच या गेमवर भारतात बंदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.( Free Fire game ban in india ) घटनेच्या दिवशी या विद्यार्थ्याला अभ्यास करता यावा म्हणून त्याच्या पालकांनी त्याला एकट्याला घरी ठेवून ते नातेवाईकांकडे गेले,या दरम्यान हा विद्यार्थी सतत गेम खेळत होता.काहीवेळाने त्याने आपल्या पालकांना फोन करण्याचा प्रयत्न केला.संध्याकाळी 7.22 वाजता त्याने आपल्या पालकांना फोन केला.परंतु त्यावेळी त्याचे पालक बाईकवर असल्याने त्याना त्याचा फोन घेता आला नाही.त्यानंतर 7.30 वाजता त्याच्या वडिलांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याने फोन उचलला नाही.ते सतत त्याला फोन करत राहिले.मात्र तो फोनला प्रतिसाद देत नव्हता.अखेर घरी जाऊन त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.अनेकदा बेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही,दरवाजा आतून लॉक होता.वडिलांनी खिडकीतून आत पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांचा मुलगा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.
कोणत्याही पालकांच्या काळजाचा थरकाप उडवणारे हे दृश्य आहे.हे दृश्य पाहून या मुलाच्या पालकांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.’माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, याशिवाय त्याच्या शाळेतील आणि टॉप 25 क्रिकेट प्लेअर्सपैकी तो एक खेळाडू होता. त्याच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या फ्री फायर गेमशिवाय त्याच्या आत्महत्येमागे मला तरी दुसरं कोणतंही कारण दिसत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो त्याच्या सहा मित्रांबरोबर Free Fire हा गेम खेळत होता. आम्हाला फक्त आमच्या मुलासाठी न्याय हवा आहे’, असं त्याचे वडील हताशपणे म्हणतात.
‘लॉकडाउनमध्ये प्रत्यक्ष शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाईन क्लासेससाठी मी त्याला मोबाईल घेऊन दिला होता. त्याला सतत मोबाईल गेम खेळण्याची सवय लागली होती यावरून मी त्याला अनेकदा बोललोही होतो. पण अचानक हे घडलं. माझ्या मुलाला मी मोबाइल गेम्समुळे गमावलं आहे. आता तुमच्या मुलांना मोबाइल गेम खेळण्याची परवानगीच देऊ नका, असं आवाहन मी सगळ्या पालकांना करतो,’ असं आवाहनही त्याच्या वडिलांनी केलं आहे.
भोईवाडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा Free Fire गेमशी खूप जवळचा संबंध आहे.
सध्या त्याचा फोन अधिक तपासासाठी सायबर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे.
दुसरीकडे त्याच्यासोबत Free Fire खेळणाऱ्या इतर मित्रांचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे.
Free Fire हा रॉयल स्टाईल मोबाईल गेम आहे ज्यामध्ये 50 खेळाडू डेथ मॅचमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतात.
या गेमचं स्वरुप मुलांना या गेमचं व्यसन लावतं. त्यामुळे मुलांना हा गेम सतत खेळण्याचा मोह होतो.
या गेममध्ये 14 प्रकारचे सिक्युरीटी इश्युज असल्याचं सांगत केंद्रानं त्यावर बंदी घातली आहे.
Free Fire गेम मुळे य अगोदरही अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे पोलीस सांगतात.
या विद्यार्थ्याने गळफास घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यावर कापडी पट्टी बांधलेली होती.
हे आमच्यासाठी एक मोठम गूढ असल्याचं पोलीस म्हणतात.
आम्ही सायबर तज्ज्ञ आणि गेमिंग क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची याकामी मदत घेत असल्याचे पोलिसांनी म्हटलंय.
अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर लक्ष देणे,त्यांच्याशी सतत संवाद साधने आवश्यक आहे.
आपला मुलगा गेमच्या आहारी तर गेला नाही ना याची सतत दक्षता घेणे गरजेचे आहे.
इतर वाचनीय लेख
Hijab Issue : कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू, वकिलांचा युक्तिवाद
हिजाब प्रकरण म्हणजे शिक्षणाच्या भगवीकरणाचे रक्षण
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
पहिल्या स्कूटरपासून ‘हमारा बजाज’ पर्यंतचा प्रवास
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 18, 2022 20 :30 PM
WebTitle – addicted to online game free fire 5th class student suicide