बिहार:बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. फलाटावर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग लागली. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतू दिलासा देणारी बाब म्हणजे ट्रेन रिकामीच होती. म्हणजेच कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या फ्रीडम फायटर एक्स्प्रेसमध्ये ही आग लागली. ही ट्रेन जयनगर ते दिल्ली दरम्यान धावते.
ट्रेनला आग लागल्याने आगीच्या ज्वाळा वरपर्यंत जाताना दिसत आहेत. आगीमुळे आकाशात सर्वत्र धुराचे लोट दिसत असून या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
ट्रेनला भीषण आग लागल्याचा हा 10 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला हादरवु शकतो. आजूबाजूला धुराचे लोट दिसत असून आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. रेल्वे स्थानकावर उपस्थित काही लोक ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आतापर्यंत दोन डबे जळाल्याचे बोलले जात आहे. तर तिसरी बोगीही आगीच्या भक्ष्यस्थानी आहे.
मुधाबनी स्टेशनचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. आग आटोक्यात आणण्यात आल्याचे पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ यांनी सांगितले. “मधुबनी रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या (स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट एक्स्प्रेस) (Swatantra Senani Superfast Express) रिकाम्या गाड्यांमध्ये लागलेली आग सकाळी ९.५० वाजता आटोक्यात आणण्यात आली,” असे ते म्हणाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अगोदरही काही ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
इतर वाचनीय लेख
ऑनलाईन गेम ने घेतला मुलाचा जीव,पालकांनो लक्ष द्या
Hijab Issue : कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू, वकिलांचा युक्तिवाद
हिजाब प्रकरण म्हणजे शिक्षणाच्या भगवीकरणाचे रक्षण
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
पहिल्या स्कूटरपासून ‘हमारा बजाज’ पर्यंतचा प्रवास
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 19, 2022 13 :08 PM
WebTitle – Fire breaks out in an empty train at Madhubani railway station in Bihar