नवाकाळचे संपादक नीळकंठ खाडिलकर यांचं निधन झालं.बातमी समजली अन नकळत हात जोडले गेले.आदरांजली वाहताना बालपणातील एकेक पट डोळ्यासमोर येवू लागला.दलित पँँथरचा झंझावात निर्माण करण्यात नवाकाळ ने निर्भीडपणे साथ दिली.किंबहुना ते दलित पँँथरचे मुखपत्र म्हणून भूमिका निभावताना दिसते.असे म्हणल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
वृतपत्र या शब्दाला समांतर नाव “नवाकाळ”
त्याकाळी तळागाळातील कामगार कष्टकरी दलितांचा मेनस्ट्रीम ‘आवाज’ अन वृतपत्र या शब्दाला समांतर नाव “नवाकाळ” हे होतं.त्याकाळीही वृतपत्रे कात टाकत असताना डीजीटल ग्लॉसी होत असताना,नवाकाळ मात्र कायम काळा-पांढरा राहिला.परंतु त्याचं अढळपद मात्र सामान्य वर्गात कायम राहिलं.(अलिकडे रंगीत आवृत्ती सुरु झालेली पाहण्यात आलं होतं)
घरी नवाकाळ आला की आम्हा भावंडात तो वाचायला भांडणे व्हायची.हे आज आठवलं अन आपण त्यावेळी वाचनासाठी किती डेस्पेरेट होतो याची पुन्हा जाणीव झाली.खासकरून असायचं ते “मुखशुद्धी” “अग्रलेख” “वाचकांचे मनोगत” “नशीब तुमच्यावर खुश आहे” ही चौकट अन रविवारी मराठीत अनुवादित करून छापल्या जाणाऱ्या विदेशी कथा.एकीकडे रटरट मटन शिजत असताना आम्ही भांडणाची मांडवली सोबतच गोष्टी वाचण्यात करत लोळत पडलेलो असायचो.आमचा रविवारचा अर्धा दिवस “नवाकाळ” वाचण्यात जात असे.
नवाकाळ दलित पँँथरचे मुखपत्र
नवाकाळची एक ओळख जी आवर्जून सांगितली पाहिजे ती म्हणजे
दलित पँँथरचा झंझावात निर्माण करण्यात नवाकाळने निर्भीडपणे साथ दिली.
किंबहुना ते दलित पँँथरचे मुखपत्र म्हणून भूमिका निभावताना दिसते.असे म्हणल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
दिवंगत पँँथर पद्मश्री जेष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ अन दिवंगत पँँथर जेष्ठ साहित्यिक तत्वज्ञ राजा ढाले
यांची स्फोटक भाषणे कानामात्रा न बदलता छापून ती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम “नवाकाळ” करत होतो.
अन खऱ्या अर्थाने समाजात नवा-काळ रुजवत होता.
दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरीची तुतारी फुंकली १९ जून १९७२ – नवाकाळ.
अशी पहिली बातमी लावून दलित पँँथर सोबत खांद्यावर हात ठेवून उभा राहणारा “नवाकाळ” होता.
ती शेवटपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे निभावल्याचे दिसते.
नवाकाळ हा आपलाच पेपर आहे
पंधरा ऑगस्टच्या विद्यार्थ्यी युवक संघटनेच्या बॅॅनरखाली सिद्धार्थ हॉस्टेल ते मंत्रालय अशा निघालेल्या दलित अत्याचार विरोधी मोर्च्याची बातमी नवाकाळने लावावी यासाठी नामदेव ढसाळ नवाकाळच्या कचेरीत राजा ढालेंना घेऊन गेले.
“नवाकाळ आपली बातमी छापेल का?” असा प्रश्न राजा ढालेंनी ढसाळांना केला.“का नाही छापणार ? नवाकाळ हा आपलाच पेपर आहे.” असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर त्यावेळी ढसाळांनी दिले होते.
दरम्यान,नामदेव ढसाळांनी राजा ढालेंची ओळख करून दिली.तेव्हा नीळकंठ खाडिलकर म्हणाले होते “दलित तरुणांच्या चळवळीला मी जरूर प्रसिद्धी देईन,तुम्ही तुमच्या मोर्च्याची बातमी मला लिहून द्या”
दुसऱ्या दिवशी नवाकाळमध्ये ही बातमी आणखी विस्तृतपणे छापली गेली.
यानंतर होणारी आंदोलने,ठराव,बैठका,पँँथरची भूमिका इत्यादी गोष्टींची माहिती पँँथर्सना नवाकाळ मधूनच समजायला लागली होती.
केवळ दलित कष्टकरी कामगारांची चळवळच नाही तर सरकारला धारेवर धरण्याचे काम नवाकाळ आपल्या अग्रलेखातून करत आल्याचे दिसते. नवाकाळ मधिल अग्रलेखांचे एक वजन होते.एक जनमत होते.अन त्यावर राजकीय वातावरण देखिल ठरत होते.
कष्टकरी कामगार गिरणीकामगार वर्ग हा प्रामुख्याने दलित वर्ग असल्याने त्यांच्या प्रश्नांवर नवाकाळने कायम आवाज उठल्याचे दिसते. नामांतर, रिडल्स काळातही नवाकाळची भूमिका अतिशय जबाबदारीची अन महत्वाची राहिली आहे.
पत्रकारितेचे मापदंड काळाच्या कसोटीवर धृढ करत सामान्यांच्या हितासाठी झगडणाऱ्या
अग्रलेखांचा बादशहा निळकंठ खाडीलकर यांना टीम जागल्याकडून विनम्र आदरांजली
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)