हसण्यावारी नेऊ नका : गोगलगायीवर बसलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू चाबूक उगारतायंत, असं दाखवणारं शंकर यांचं १९४९ सालचं व्यंगचित्र एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होतं, त्यावरून २०१२ साली बराच गदारोळ उडाला, दलितांनी या विरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सवर्णांनी या निषेधाचा प्रतिकार केला.
हसण्यावारी नेऊ नका
त्यानंतर अभ्यासक व व्यंगचित्रकार उन्नमती श्याम सुंदर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रांमधील आंबेडकरांवरच्या व्यंगचित्रांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली. या प्रयत्नातून भारतातील आघाडीच्या प्रकाशनांमधल्या शंभरहून अधिक व्यंगचित्रांचं एक संकलन तयार झालं. शंकर, अन्वर अहमद व आर. के. लक्ष्मण इत्यादी व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रं आहेत.
आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.
……..
भारतीय राजकीय व्यंगचित्रकलेचं दयामाया न दाखवणारं कठोर पुनर्मूल्यमापन या पुस्तकात केलं आहे.
– सुरज येंगडे, प्रस्तावनेमधून
‘कलात्मक स्वातंत्र्या’चं सोंग घेणाऱ्या उच्चजातीय बहुसंख्याकवादाचा मुखवटा श्याम सुंदर फाडतात
– राज्यश्री गूडी, दृश्य कलाकार
हसण्यावारी नेऊ नका मधून घाणेरडी सवर्ण दृष्टी आपल्या समोर येते आणि आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं
– वरुण ग्रोव्हर, विनोदकार व पटकथालेखक
#हसण्यावारीनेऊनका
#NoLaughingMatter
#MadhushreePublication
सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा नाकारला पुरस्कार
तरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे.विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. यशवंत मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. मात्र कार्यक्रमात सरस्वीतीची प्रतिमा ठेवू नये अशी मागणी साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केली होती. मागणी केल्यानंतरदेखील परंपरेप्रमाणे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली, यामुळे नाराज डॉ. यशवंत मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.नकार देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ती भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आणि डोळस आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)