‘कॉकरोच जनता पार्टी’ चा (CJP) संस्थापक अभिजीत दिपके सध्या राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.अभिजीत मूळचा औरंगबादचा आहे,सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.तो आंबेडकरी विचारांचा तरुण आहे.तो यापूर्वी ‘आम आदमी पार्टी’चे (AAP) सोशल मीडिया कॅम्पेन हाताळत होता, आणि ही बाब त्याने स्वतःच्या मुलाखतींमध्ये उघडपणे मान्य केली आहे. “मी आपशी जोडलो गेलो होतो आणि माझे जुने ट्विट्स मी डिलीट करणार नाही. मी राघव चढ्ढा नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे,” असा रोखठोक पवित्रा त्याने घेतला आहे. सध्या त्याची प्रमुख मागणी ही केवळ धर्मेंद्र कुमार यांच्या राजीनाम्यापुरती मर्यादित आहे.
कॉकरोच जनता पार्टी हा अचानक झालेला स्फोट की राजकीय ‘गेम’?
हे सगळं अचानक घडलंय की यामागे काही राजकीय खेळी आहे? वस्तुस्थिती पाहता, हा केवळ एक ‘ट्रिगर पॉईंट’ होता. ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर अरविंद केजरीवालांनी ‘जेन-झी’ (Gen Z) पिढीला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे यामागे ‘आप’चं छुपे पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र, अभिजीतनं स्वतःला कोणाचंही पाठबळ नसल्याचा दावा केला आहे.
कोणत्याही मोठ्या उद्रेकासाठी एका ठिणगीची गरज असते. दडपून ठेवलेल्या असंतोषाच्या गंजीवर सूर्यकांतने ती ठिणगी टाकली…
आणि खदखदणारा ‘जेन-झी’ तरुण रस्त्यावर उतरला. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ने अवघ्या एका दिवसात भाजपच्या ‘आयटी सेल’ची अक्षरशः धूळधाण उडवली. केवळ चार दिवसांत तब्बल १ कोटी २० लाख तरुण या मोहिमेत जोडले जाणे, ही सामान्य बाब नाही.
सत्ताविरोधी लाट आणि अनुत्तरित प्रश्न
कॉकरोच जनता पार्टी ला मिळालेले समर्थन,याचा स्पष्ट अर्थ असा की, समाजात, सोशल मीडियावर आणि घराघरांत एक प्रबळ सत्ताविरोधी वातावरण आहे. अभिजीत दिपके चर्चेत जे मुद्दे मांडत आहे, तेच आपलेही मुद्दे आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपविरोधी स्पष्ट जनमत असताना, अवघ्या पाच-सहा महिन्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला असं अभूतपूर्व यश कसं मिळालं? हा प्रश्न त्यानेही उपस्थित केला आहे. या संशयास्पद निकालांवर मी स्वतः सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवले आहेत. शिवाय, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनीही याच मुद्द्यांवर मोठ्या स्क्रीनवर प्रेझेंटेशन देऊन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे सर्व मुद्दे एकाच साखळीचा भाग आहेत.
अभिजीतच्या मते, त्याने ‘CJP’ ची सुरुवात केवळ एका गंमतीतून केली होती,पण जनतेच्या असंतोषाला ती बरोबर भिडली आणि एक मोठा ‘ट्रिगर’ ठरली.
माशाचा डोळा कोण फोडणार ?
आता खरा प्रश्न हा आहे की, जनतेसाठी आणि देशासाठी रस्त्यावर उतरून नेतृत्व कोण करणार? काँग्रेस क्रांती करणार आहे?
‘आप’ क्रांती करणार आहे की आंबेडकरी पक्ष पुढाकार घेणार? की हे सर्व जण आपापसात समन्वय साधून एक मोठी राजकीय क्रांती घडवणार?
अर्जुनाप्रमाणे ‘माशाचा डोळा’ अचूक कोण फोडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या सर्व घडामोडींत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अचानक सुरू झालेल्या ‘जगबुडी’सारख्या विरोधाचं मात्र मला हसू आलं.
हुशार आणि चाणाक्ष राजकारण्यांनी या उत्स्फूर्त जनक्षोभाच्या संधीचा योग्य तो राजकीय फायदा उचलायला हवा होता,
जो प्रस्थापित विरोधकांना अद्याप साधता आलेला नाही.
दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव टीएमसीच्या महूआ मोईत्रा
आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे स्वागत केले आहे,उघडपणे समर्थन दिलेले आहे.
जो सरकार चुटकुला नहीं सह पा रही,
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) May 21, 2026
इसका मतलब वो खुद एक चुटकुला है।#CockroachJantaParty #CJP #Youth@abhijeet_dipke @Cockroachisback pic.twitter.com/wK7lF9IovO
समर्थकांच्या मते, ही चळवळ म्हणजे सध्याच्या ‘अति-व्यवस्थापित’ (overly managed)
आणि ‘असंतोषाचा आवाज दडपणाऱ्या’ राजकीय संस्कृतीत ‘ताजी हवेची झुळूक’ (a breath of fresh air) ठरली आहे.
या चळवळीला कीर्ती आझाद यांसारख्या विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांसह ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचेही समर्थन मिळाले आहे.
तरुणांमधील नैराश्य
दुसरीकडे, टीकाकारांनी या चळवळीला विरोधी पक्षांशी जोडलेले ‘ऑनलाइन राजकीय नाटक’ (online political theatre) म्हणून फेटाळून लावले आहे. यासाठी ते अभिजीत दिपकेच्या ‘आप’सोबतच्या (AAP) जुन्या संबंधांचा दाखला देत आहेत. त्यांच्या मते, हा कोणताही उत्स्फूर्त उद्रेक नसून अत्यंत चाणाक्षपणे पॅकेज केलेले ‘डिजिटल राजकारण’ आहे.खरंतर जे पब्लिक डोमेनमध्ये आहे ते ‘शोधून’ काढण्याची गरजच नसते.परंतु सत्ताधारी पराचा कावळा करण्यात हुशार आहेत.
तरुणांमधील नैराश्य (Generational Fatigue) या तात्कालिक प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर, ही चळवळ भारतीय तरुणांमधील एका विशिष्ट ‘पिढीगत नैराश्याचे’ लक्षण मानली जात आहे. हे तरुण सोशल मीडियावर सतत राजकीय घडामोडींच्या संपर्कात असतात, पण मुख्य प्रवाहातील राजकारणात आपल्याला कुठेच स्थान किंवा योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, अशी त्यांची भावना आहे.
भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश आहे;
देशाच्या साधारण १४० कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्धी लोकसंख्या ही ३० वर्षांखालील आहे.
तरीही, या तरुण पिढीचा प्रत्यक्ष आणि औपचारिक राजकारणातील सहभाग मात्र अत्यंत मर्यादित राहिला आहे.
एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे की, २९% भारतीय तरुण राजकीय घडामोडींपासून पूर्णपणे दूर राहणे पसंत करतात,
तर केवळ ११% तरुण एखाद्या राजकीय पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत.
यावर बोलताना दिपके म्हणतो,“लोकांमध्ये तीव्र नैराश्य आहे, कारण त्यांचा आवाज ऐकला जात नाही आणि त्यांना कुठेही प्रतिनिधित्व दिले जात नाही.”
विरोधी पक्षांना धसका
उद्धव ठाकरे गटाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले की,सोशल मीडियावर तयार झालेल्या “CJP” या काल्पनिक कल्पनेने
जेन-झी पिढीच्या मनावर एवढा प्रभाव टाकणे, ही आजच्या बहुतांश विरोधी पक्षांबद्दल तरुणांच्या मनात निर्माण झालेल्या निराशेची गंभीर आणि दुःखद बाब आहे.
भाजपविरोधात राग आणि असंतोष स्पष्टपणे दिसत असतानाही, मतदारांना स्थापन झालेल्या विरोधी पक्षांपेक्षा
सोशल मीडियातून जन्मलेल्या एका काल्पनिक पक्षावर अधिक विश्वास वाटत असेल, तर ते विरोधकांसाठी मोठे आत्मपरीक्षणाचे कारण आहे.
तरुण मतदार काय विचार करतो, त्याच्या अपेक्षा काय आहेत, त्याचा राग, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता काय आहे
हे नव्याने समजून घेण्याची आणि राजकारणाची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. कारण हे फक्त निवडणुकांचे राजकारण नाही, तर भारताच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे.
That a social media created idea of CJP has taken the GenZ imagination by storm is a sad reflection of them losing hope in most of the current opposition parties. Clearly there is anger against BJP but voters would rather bet on a new figment of imagination created party than…
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) May 21, 2026
दक्षिण आशियाई देशांमधील धग आणि भारत संपूर्ण दक्षिण आशियाचा विचार केला, तर गेल्या काही वर्षांत श्रीलंका,
नेपाळ आणि बांगलादेशमध्ये तरुणांच्या नेतृत्वाखालील अशा अनेक आंदोलनांच्या लाटा आल्या,ज्यांनी थेट तिथली प्रस्थापित सरकारं उलथवून लावली.
रोजगार, वाढती महागाई आणि अंधःकारमय भविष्य यांवरील असंतोष ही या आंदोलनांमागची प्रमुख कारणे होती.
भारताने आतापर्यंत अशा प्रकारचा कोणताही तीव्र देशव्यापी उद्रेक टाळला असला,
तरी येथील तरुणांच्या मनातील अंतस्थ दबाव आणि खदखद ही शेजारील देशांपेक्षा वेगळी नाही.
देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचे दावे केले जात असले, तरी त्यामुळे रोजगार,
आर्थिक असमानता आणि दैनंदिन जगण्याचा वाढता खर्च यांमुळे निर्माण झालेली तरुणांची चिंता आणि अस्वस्थता अजिबात कमी झालेली नाही.
तुम्हाला अरबस्प्रिंग मध्ये क्रांती का झाली माहित आहे? तिथली सत्ता घालवली होती एका सामान्य फळविक्रेत्याने

Milind Dhumale
Editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 21,2026 | 17:15 PM
WebTitle – The Rise of the ‘Cockroach Janata Party’, Gen Z’s Discontent, and the Opposition’s Directionlessness























































