मुंबई 16-06-2026 : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात राज्यातील आंबेडकरी, बौद्ध आणि विविध अनुसूचित जातींच्या संघटनांनी एकत्र येत ३० जून रोजी मुंबईतील विधानभवनावर संयुक्त महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून २६ जून, ३० जून आणि २ जुलै या विविध तारखांवरून निर्माण झालेला संभ्रम अखेर संपुष्टात आला असून, सर्व संघटनांनी एकमुखाने ३० जून रोजीच एकत्रित शक्तिप्रदर्शन करण्याचे निश्चित केले आहे.
उपवर्गीकरण विरोधात सर्व आंदोलने एकत्रित करून एकच ऐतिहासिक संयुक्त महामोर्चा
दादर येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख Anandraj Ambedkar यांनी जाहीर केले की, हे आंदोलन ‘उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती’च्या बॅनरखाली आयोजित करण्यात येणार आहे.
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हा घटनादत्त अधिकारांवर घाला असल्याचा आरोप करत राज्यभरातील विविध आंबेडकरवादी संघटना, बौद्ध संघटना आणि अनुसूचित जातींच्या ५९ समाजघटकांनी या आंदोलनासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विविध संघटनांनी स्वतंत्रपणे मोर्चे आणि आंदोलनांची घोषणा केली होती. मात्र आता सर्व आंदोलने एकत्रित करून एकच ऐतिहासिक संयुक्त महामोर्चा काढण्यात येणार आहे.
यापूर्वी बीड येथून सुरू झालेल्या लॉंगमार्च आंदोलनाने आणि रिपब्लिकन सेनेकडून २६ जून रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. तर उपवर्गीकरण विरोधी समितीकडून ३० जून रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, २६ जून रोजी मोहरमनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने प्रशासनिक आणि नियोजनात्मक अडचणी निर्माण होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर सर्व संघटनांनी एकमताने ३० जूनची तारीख निश्चित केली.
उपवर्गीकरणाचा प्रस्ताव हा अनुसूचित जाती समाजात फूट पाडणारा आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बाधा आणणारा
बैठकीस रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर,
दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार, माजी आमदार बाबुराव माने, उपवर्गीकरण विरोधी समितीचे राहुल डंबाळे,
प्रतीक कांबळे, संजय भालेराव, लॉंगमार्च आंदोलनाचे नेते सागर संसारे, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे,
ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिवाकर शेजवळ, ओबीसी-आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, रिपब्लिकन नेते दिलीप जगताप,
रवी गरुड, दलित पँथरचे नेते सुखदेव सोनावणे, आंबेडकरवादी भारत मिशनचे सचिव सतीश डोंगरे,
बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्यासह राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित नेत्यांनी उपवर्गीकरणाचा प्रस्ताव हा अनुसूचित जाती समाजात फूट पाडणारा
आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बाधा आणणारा असल्याचा आरोप केला.
या प्रस्तावाविरोधात सर्व ५९ जातींचे नागरिक, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील विविध घटक पूर्ण ताकदीने एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३० जून रोजी विधानभवनावर धडकणारा संयुक्त महामोर्चा हा राज्यातील अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा ठरेल,
असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. सरकारने उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा,
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 16,2026 | 19:00 PM
WebTitle – United March Against SC Sub Categorisation To Be Held At Vidhan Bhavan On June 30























































