दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुर्ला शाखेतर्फे ‘एक पान आपल्या माय मराठीसाठी’ ह्या वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम धम्मकुटी बुद्ध विहार, कुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचन उपक्रम उत्साहात संपन्न
उपस्थित सहभागी वाचनप्रेमी नागरिकांनी मराठी पुस्तकातील नामवंत साहित्यिकांचे लेख, स्वरचित कविता आणि उतारे वाचून मातृभाषेप्रती आदर व्यक्त केला.

अंधश्रध्दा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणाचे महत्त्व आणि संविधानिक मूल्यांवर वाचनातून विचारमंथन करण्यात आले.
मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असल्याचे अधोरेखित केले.
अशा उपक्रमामुळे तरुणांना वाचनाची आवड लागेल तसेच मराठी भाषेबद्दल अभिमान वाटेल, असा विश्वास सहभागी वाचकांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सहभागी व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जाधव यांनी केले.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 01,2026 | 21:00 PM
WebTitle – Marathi Language Day Reading Initiative Held with Enthusiasm in Kurla























































