महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत चार मूलभूत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यापैकी तीन प्रश्नांची उत्तरं आता स्पष्ट झाली आहेत. मात्र चौथा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि तोच पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
पहिला प्रश्न होता उपमुख्यमंत्री कोण होणार. त्याचं उत्तर स्पष्ट झालं. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.
दुसरा प्रश्न होता खातेवाटप कसं असेल. तेही स्पष्ट झालं. अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राहील.
एक्साईज, वक्फ बोर्ड आणि क्रीडा ही महत्त्वाची खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली.
तिसरा प्रश्न होता विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व कोण करणार. त्याचंही उत्तर मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार करतील यावर अधिकृत ठराव झाला.
पण चौथा प्रश्न अजूनही उघडाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच पॉलिटिकल पार्टी नेमकी कोण लीड करणार.
शरद पवारांची स्पष्ट भूमिका आणि सुनेत्रा पवार यांची गोविंदबागेतील न झालेली भेट
या सगळ्या घडामोडींवर शरद पवारांनी एक गोष्ट स्पष्ट करून टाकली होती. या संपूर्ण प्रक्रियेत, या घडामोडी घडत असताना, माझं आणि सुनेत्रा पवार यांचं कोणतंही बोलणं झालेलं नाही.
याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.
परवा संध्याकाळी गोविंदबाग येथे शरद पवारांच्या घरी एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ती बैठक राजकीय नव्हती. तो एक फॅमिली गेट टुगेदर करण्याचा प्रयत्न होता. गेल्या दोन तीन दिवसांत संपूर्ण कुटुंब दुःखात होतं. कुणाची झोप झालेली नव्हती, कुणी वेळेवर जेवण केलं नव्हतं. अशा परिस्थितीत सगळे एकत्र बसावेत, थोडं बोलावं आणि भविष्यात काही गोष्टी असतील तर त्या कुटुंबाच्या पातळीवर समजून घ्याव्यात, हा उद्देश होता.
पण सुनेत्रा पवार या त्या गेट टुगेदरला उपस्थित राहिल्या नाहीत. त्या सहयोगवरच थांबल्या. त्या त्यांच्या घरीच होत्या. आणि त्या वेळी त्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू होती.
त्या बैठकीत उपस्थित असलेली व्यक्ती म्हणजे नरेश अरोरा. नरेश अरोरा हे अजित पवारांचे संपूर्ण पॉलिटिकल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी, कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया हाताळणारे मुख्य व्यक्ती आहेत.
यामुळेच शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात या संपूर्ण घडामोडींवर कोणतंही थेट बोलणं झालेलं नव्हतं, हे शरद पवारांनी ठामपणे सांगितलं.
पार्थ पवार शपथविधीपासून दूर का राहिले
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवेळी पार्थ पवार उपस्थित का नव्हते, हा प्रश्न अनेकांना पडला.
यामागचं कारण राजकीय होतं आणि अत्यंत जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता.
भाजपकडून स्पष्ट संदेश देण्यात आला होता की शपथविधीवेळी पार्थ पवार दिसू नयेत.
कारण पार्थ पवार यांच्या नावाशी जोडलेले जमीन व्यवहारांचे आरोप आणि त्यावर सुरू असलेली चौकशी.
शपथविधीच्या मंचावर त्यांची उपस्थिती चुकीचा संदेश देऊ शकली असती.
भाजप हा पक्ष इमेज, नॅरेटिव्ह आणि टायमिंग याबाबत अत्यंत सजग असतो.
त्यामुळे कोणतीही नवी कॉन्ट्रोव्हर्सी टाळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून पार्थ पवार बारामतीतच थांबले.
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात नेमकं काय बोलणं झालं
गोविंदबाग येथे पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली.
या भेटीचे व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत. त्या भेटीबाबत शरद पवारांनी स्वतः स्पष्ट केलं की या चर्चेत राजकारण नव्हतं.
चर्चेचा विषय होता दादांचं स्मारक.
बारामतीत दादांचं भव्य आणि योग्य स्मारक उभारावं. त्यामध्ये त्यांच्या आठवणी,
छायाचित्रं, सार्वजनिक जीवनाचा प्रवास आणि एक संग्रहालय असावं, याबाबत चर्चा झाली.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. सध्या पार्थ पवार हे भावनिक आणि कुटुंबीय पातळीवर सक्रिय आहेत, थेट राजकीय निर्णय प्रक्रियेत नाहीत.
नंबर गेम, मर्जर आणि भाजपचा खरा हितसंबंध
जर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहिली असती तर लोकसभेत आठ ते नऊ खासदार आणि विधानसभा मिळून पन्नासपेक्षा अधिक आमदारांचा आकडा तयार झाला असता.
हा आकडा राज्यातपेक्षा केंद्रात भाजपसाठी अधिक महत्त्वाचा ठरला असता. कारण सध्याच्या लोकसभेत प्रत्येक खासदार निर्णायक ठरतो.
म्हणूनच अजित पवारांचा निर्णय, सुनेत्रा पवारांची भूमिका आणि भाजपचा मोठा भाऊ म्हणून असलेला प्रभाव या सगळ्या गोष्टी एकाच स्ट्रॅटेजिक फ्रेममध्ये पाहाव्या लागतील.
अखेरचा आणि खरा प्रश्न
विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व ठरलं आहे. प्रशासनात कोण सक्रिय असेल हेही ठरलं आहे.
पण पक्षाचं संघटन, केडर, जिल्हा पातळीवरील ताकद, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि इकोसिस्टीम कोणाच्या हातात जाणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
इथेच खरी बार्गेनिंग सुरू होईल. इथेच खरी सत्ता-समीकरणं ठरतील.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 01,2026 | 20:45 PM
WebTitle – sharad-pawar-sunetra-pawar-ncp-politics























































