मुंबई | 01-02-2026 विशेष प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या नावावर सुरू असलेल्या कथित राजकीय विलीनीकरण चर्चांवर तीव्र शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे. “आताच्या स्थितीत आम्हाला राजकारण करायचं नाही. पण जर आम्ही बोलायला सुरुवात केली, तर अनेक गोष्टी सांगू शकतो,” असे सांगत फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावरून तयार होत असलेल्या संभ्रमावर थेट प्रश्न उपस्थित केले.
फडणवीस म्हणाले की, “काय घडलं आहे आणि काय घडतंय, हे मला पूर्णपणे माहीत आहे. मी या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार आहे. अजितदादा आणि माझे संबंध असे होते की ते अनेक गोष्टी माझ्याशी खुलेपणाने शेअर करायचे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या आदल्या दिवशी जवळपास एक तास आम्ही एकत्र बसून गप्पा मारत होतो. त्यामुळे अशा संवेदनशील विषयावर खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही.”
अजित पवार यांच्या कथित विलीनीकरण चर्चांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला.
“अजित पवार जर कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करत असते,
तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय अशी कोणतीही चर्चा करतील का?” असा सवाल त्यांनी केला.
त्यांच्या मते, अजित पवारांची कार्यपद्धती आणि राजकीय शिस्त पाहता,
भाजपला विश्वासात न घेता ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतील, हे विश्वासार्ह वाटत नाही.
ते पुढे म्हणाले की, “विलीनीकरण करायचं की नाही, हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. मात्र, आमची अपेक्षा इतकीच आहे की, असा कोणताही निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंतही आमच्याशी चर्चा केली आहे आणि यापुढेही करेल, अशी आमची अपेक्षा आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भातील दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले.
“जर अजित पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत विलीनीकरणाबाबत चर्चा करत होते, असा दावा केला जात असेल,
तर प्रश्न असा आहे की ते एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी अशी चर्चा करत होते का?”
असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “ते सरकारमध्ये पूर्णपणे स्थिर होते.
त्यामुळे अशा प्रकारचे रोज नवे संभ्रम निर्माण करणे आणि एका ठरावीक ‘एकोसिस्टम’च्या माध्यमातून तो संभ्रम पसरवणे,
ही पद्धत पूर्णपणे अयोग्य आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे
अजित पवारांच्या निधनानंतर सुरू असलेल्या चर्चांवर विराम लागेल की वाद अधिक चिघळेल, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 01,2026 | 18:36 PM
WebTitle – devendra-fadnavis-ajit-pawar-merger-speculation-statement























































