नवी दिल्ली : संसद परिसरातील डॉ. भीमराव आंबेडकर आणि महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटवल्याबद्दल दिल्लीत जोरदार निदर्शने करण्यात आली.संसद परिसरातील डॉ. आंबेडकर,गांधी ,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल आंबेडकरी जनतेत आक्रोश निर्माण झाला असून राज्यातील विविध भागातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी आज दिल्लीत आंदोलन करत भाजपा सरकारवर टीका केली.तसेच सर्व मूर्ती आहे त्याठिकाणी पुन्हा प्रस्थापित करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी केली आहे.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

जंतरमंतर येथे आंदोलन
काँग्रेस नेते उदित राज यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर शेकडो लोक जमले होते.सरकारचे पुतळे हटविण्याचे हे पाऊल म्हणजे त्यांचा प्रभाव कमी करण्याचा सरकारचा डाव असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. हे पुतळे पुन्हा त्यांच्या जागेवर बसवावेत, अशी मागणी उदित राज यांनी सरकारकडे केली आहे.
देशव्यापी आक्रोश
या कारवाईचा संताप मुझफ्फरनगरमध्येही दिसून आला. पुतळे हटवणे हा स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचा अपमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
स्थानिक पातळीवरही आंदोलने केली जात असून, आंदोलकांनी सरकारकडे पुतळे पुन्हा बसवण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाने देशभरात चर्चेला उधाण आले असून, विकास आणि सुशोभिकरणाच्या दृष्टिकोनातून सरकार आपल्या निर्णयाचे समर्थन करत आहे,
तर आंबेडकरी समाज हा आपल्या महापुरुषांचा अपमान मानून निषेध करत आहे.
लोकसभा सचिवालयाने एक निवेदन जारी केले
लोकसभा सचिवालय कडून करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे प्रेरणास्थान अशा प्रकारे विकसित केले जात आहे की
संसद संकुलात येणारे पर्यटक या महान नेत्यांचे पुतळे सहज पाहू शकतील आणि त्यांच्या जीवनातून आणि तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊ शकतील.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसद संकुलात सुरू असलेल्या बांधकामामुळे हे पुतळे 7 जून रोजी हटवण्यात आले. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली होती. आणि हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या प्रतीकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे आणि राजकीय अतिरेकांसाठी भाजपला दोष दिला होता.
काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता
यासंदर्भात मागे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, “संसदेच्या सभागृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अलीकडेच हटवण्यात आले आहेत, हे अन्यायकारक आहे.” टीका करताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, ” भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी मतदान केले नाही त्यामुळे संसदेतील शिवाजी आणि आंबेडकरांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले.”
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 26,2024 | 21:34 PM
WebTitle – Ambedkar, Gandhi, Shivaji Statues Removal from Parliament Complex Sparks Outrage Among Ambedkarites























































