मुस्लिम नावाने ID बनवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट तथा योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोट आणि अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवरून बुधवारी दोघांना अटक करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी पीटीआयला ही माहिती दिली.माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने लखनऊमधील गोमती नगरच्या विभूती खांड परिसरातून तहर सिंग आणि ओमप्रकाश मिश्रा यांना अटक केली. मिश्रा आणि तहर दोघांनी खोटे मुस्लिम नाव धारण केले होते,मुस्लिम नावाने ID बनवून ते ईमेल पाठवत होते, ज्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर उडवण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.
मुस्लिम नावाने ID बनवून राम मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक
यूपी एसटीएफच्या माहितीनुसार, या दोघांनी नोव्हेंबरमध्ये ‘@iDevendraOffice’ हँडल वापरून ‘X’ वर एका पोस्टमध्ये आदित्यनाथ, STF प्रमुख अमिताभ यश आणि अयोध्येच्या राम मंदिराला उडवून देण्याची धमकी दिली होती.
धमकीच्या पोस्ट पाठवण्यासाठी ‘almansarikhan608@gmail.com’ आणि ‘zubairkhanisi199@gmail.com’ या ई-मेल आयडीचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ईमेल आयडीचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले की, तहर सिंगने ईमेल खाती तयार केली आणि ओमप्रकाश मिश्रा याने धमकीचे संदेश पाठवले होते.
पत्रकार आणि फॅक्ट चेकर वेबसाइट ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक, झुबेर अहमद यांनी यूपी एसटीएफने अटक केलेल्या लोकांच्या संदर्भात पडताळणी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर अनेक ट्विट करून सविस्तर माहिती दिली आहे.त्याचे काही ट्विट हे प्रकरण समजून घेण्यास मदत करू शकतात.
यूपी एसटीएफच्या निवेदनात देवेंद्र तिवारी नावाच्या व्यक्तीचे नावही आले आहे. पत्रकार जुबेर अहमद यांनी याबद्दल सांगितले आहे-
आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड
पत्रकार झुबेर अहमद यांच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र तिवारी चे हे ट्विट आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड करणारे. ज्यामध्ये ते उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत छायाचित्रात दिसून येत असून,2022 च्या विधानसभा निवडणुकीत समर्थन देण्याचे जाहीर केले होते,यासंदर्भातील एक पत्र भाजपा पक्ष कार्यालयाकडून डॉ.लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्या नावे आभार प्रदर्शन आणि समर्थन स्वीकार करत असल्याचा उल्लेख असल्याचे दिसते. ट्विट काळजीपूर्वक वाचा-
पत्रकार अजित अंजुम यांनी याबाबत फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल काही प्रश्नही उपस्थित केले आहेत,
यासोबतच सदर व्यक्ती देवेंद्र तिवारी हा अशाप्रकारे सतत प्रोपौगंडा करत असल्याचे म्हटले आहे.
यासोबतच तिवारीच्या मागे आणखी कुणी आहेत का याचीही चौकशी करण्याची मागणी केलेली आहे.
मध्ये टिचकी मारून व्हिडिओ सुरू करा
जागल्याभारत च्या माध्यमातून आम्ही आपल्याला आवाहन करू इच्छितो की
आपण सोशल मिडियातील कोणत्याही मॅसेज/पोस्ट/छायाचित्र/व्हिडिओ यांची शहानिशा केल्याशिवाय शेअर करू नका.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य निभावले पाहिजे.
तसेच अशा घटना घडू शकतात याबद्दल लोकांना सावध करा.
यासाठी ही बातमी व्हाटसेपग्रुप आणि फेसबुक ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.लोकांना सतर्क करा.
मेनस्ट्रीम मिडिया अशा बातम्या देत नाही,मराठीत फक्त जागल्याभारत ने ही बातमी दिलीय.चेक करा.
हिट अँड रन चा नवा कायदा काय आहे जाणून घ्या, ज्यामुळे वाहनचालक तणावात; देशभरात चक्का जाम सुरू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 04,2024 | 21:30 PM
WebTitle – Two arrested for making ID in Muslim name and threatening to blow up Ram temple