अगोदरच्या फौजदारी कायद्यांना देशी रंग देणारं भारतीय न्याय संहिता विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेनं मंजूर केलं. आता काही महिन्यांत आयपीसीचे कायदे नवीन तरतुदींद्वारे बदलले जातील. दरम्यान, त्याच्या एका कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू झाली आहेत. हिट अँड रन यावर नवा कायदा आणून आणखी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.या अंतर्गत रस्त्यावर कोणतीही हिट अँड रन ची घटना घडल्यास वाहन चालकास 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. याशिवाय त्याला दंडही भरावा लागणार आहे. खरंतर,वाहनाच्या धडकेनंतर अपघात स्थळावरून पळून जाणं हे हिट अँड रन समजलं जातं. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता.
आता नव्या नियमानुसार, जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलिस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही होणार आहे. या कायद्याला चुकीचे म्हणत देशभरात आंदोलने होत आहेत.हरियाणा, दिल्ली, यूपी, मध्यप्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी रास्ता रोको केला आहे. या कायद्यातील तरतुदी सौम्य करण्याची मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली जात आहे. या नियमामुळे केवळ ट्रकचालकच नाही तर टॅक्सी आणि ऑटोचालकही हैराण झाले आहेत. हा कायदा खाजगी वाहनधारकांनाही तितकाच लागू होणार आहे.
भारतात दरवर्षी 50 हजार लोक रस्त्यावर मरण पावतात
एका सरकारी आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 50 हजार लोक रस्त्यावर हिट अँड रन प्रकरणांमध्ये मरण पावतात.
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते की,हिट अँड रन चा नवा कायदा लागू केला जाईल.
या नवीन कायद्यात सरकार हिट अँड रन प्रकरणांमध्ये कठोर तरतुदी आणत आहे.
या अंतर्गत, जर एखाद्याची कार रस्त्यात एखाद्याला धडकली आणि पीडित व्यक्तीला मदत करण्याऐवजी
चालकानं पीडित व्यक्तीला तिथेच मृत किंवा मरण्यासाठी सोडले किंवा स्वत:ची कार घेऊन पळ काढला,
तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागणार आहे.तसेच अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातील
किंवा पोलीस प्रशासनाला माहिती देतील त्यांना मात्र दिलासा दिला जाईल. आतापर्यंत आयपीसीमध्ये अशी तरतूद नव्हती.
किंबहुना, हिट अँड रन चा हा नवा कायदा म्हणजे दुधारी तलवार आहे, असा युक्तिवाद वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वाहनचालक करतात. अपघातानंतर वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असतो. अनेकदा अशा वेळी जमाव हिंसक होतो.हल्ल्यातून वाचण्यासाठी तो पळून गेला तर त्याला कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन त्याचं संपूर्ण जीवन प्रभावित होऊ शकतं. याच्या निषेधार्थ बंगाल, बिहार, यूपी, हरियाणा, दिल्ली आणि मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये ट्रक चालक आणि इतर लोक रस्ते अडवत आहेत.
अशा काही स्थितीत वाहनचालकांना दिलासा मिळणार, हिट अँड रन चा नवा कायदा काय सांगतो
नवा कायदा लागू झाल्यानंतर या नव्या कायद्यानुसार, वाहनाला धडक देणारी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वाहनासमोर आली किंवा बेकायदेशीरपणे रस्ता ओलांडत असेल, तर अशा स्थितीत वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. अशा प्रकरणांमध्ये कमाल 5 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे समस्या उद्भवल्यास चालकाला 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या तरतुदीबाबत वाहनचालक चिंता व्यक्त करत आहेत. धुक्यामुळे अपघातही होत असल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितले. जर अशा अपघात प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली तर कोणतीही चूक नसताना वाहनचालकांना एवढी मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे.याचमुळे संतप्त वाहनचालकांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.
भीमा कोरेगाव ची लढाई, महार सैनिक आणि काही प्रवाद
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 01,2024 | 11:59 PM
WebTitle – Know what is the new law of hit and run