काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये एका पाळीव कुत्र्याने एका व्यक्तीवर हल्ला केला होता. कुत्र्याने पीडित व्यक्तीच्या कमरेच्या खालच्या भागात जोरदार चावा घेत तिला गंभीर जखमी केले होते. यानंतर लखनऊ पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली, तसेच कुत्र्याला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. आता दोघांचीही सुटका करण्यात आली आहे. कुत्र्याचे मालक राजेंद्र पांडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, आमचा कुत्रा थोडा खोडकर आहे, त्यामुळे तो चावला.
कुत्र्याचा मालक राजेंद्र पांडे सांगतात की, कुत्र्याने चावा घेतलेली व्यक्ती आपल्या लहान भावाला बोलावण्यासाठी घरी आली होती. ती व्यक्ती घरात शिरू लागली तेव्हा कुत्र्याने तीच्या कमरेखालील भागाचा जोरदार चावा घेतला.
आमचा कुत्राही धार्मिक आहे
कुत्र्याचे मालक राजेंद्र प्रसाद पांडे यांचे म्हणने आहे की हा कुत्रा त्यांच्या घरातील महत्त्वाचा सदस्य आहे.त्याच्याशिवाय आपण क्षणभरही जगू शकत नाही. राजेंद्र पुढे म्हणतात की, आम्ही धार्मिक पद्धतीचे आहोत आणि म्हणून आमचा कुत्राही धार्मिक आहे, आम्ही पांडे आहोत म्हणून कुत्राही पांडे आहे.त्याला कुत्रा म्हणू नका प्लीज,डॉगी म्हणा,कुत्र्याचं नाव रॉनी पांडे असं आहे.या नावानेच आम्ही रॉनी ला हाक मारतो. तिला मिठाई खूप आवडते. पूजेच्या वेळी आम्ही त्याला टिळा लावतो.
कुत्रा थोडा खोडकर आहे
कुत्र्याचे मालक राजेंद्र पांडे म्हणतात की कोणी घरात घुसले तर कुत्रा त्याला कोणत्याही परिस्थितीत आत येऊ देणार नाही, तो त्याचा चावा घेईल,पण आत घुसू देणार नाही. ज्या दिवशी वस्तीतील व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतला, त्यादिवशी वस्तीत एक कार्यक्रम होता, त्यासाठी पीडित तरुण लहान भावाला बोलवायला घरी आला होता, तो घरात शिरू लागला तेव्हा कुत्र्याने त्याला चावा घेतला. कुत्रा थोडा खोडकर आहे. जर त्या व्यक्तीने कुत्र्याला आवाजाने हाक मारली असती तर हे घडले नसते. राजेंद्र म्हणाले की, आम्हाला कुत्रा खूप आवडतो. आम्ही त्याच्यासोबतच एकत्र झोपतो. फिरायलाही जातो. त्याचं सर्व आवश्यक लसीकरण करण्यात आलं आहे.
मच्छर आपल्यालाच जास्त का चावतो? ही चार कारणे असू शकतात
गांजा तस्करीत तरुणाला फसवून लाच घेणाऱ्या पोलिसांवर पोलिस आयुक्तांची कारवाई
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 19,2022, 10:30 AM
WebTitle – We are Pandey, our dog is also Pandey, bit naughty, so he bites