युक्रेन मधून परतलेल्या (Medical Students Return From Ukraine) वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारताच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. यादरम्यान, केंद्राने न्यायालयाला उत्तर देताना म्हटलं की, या विद्यार्थ्यांना भारतात प्रवेश देणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. केंद्राचे म्हणणे आहे की हे लोक त्यांच्या युक्रेनियन महाविद्यालयाच्या संमतीने इतर कोणत्याही देशाच्या महाविद्यालयात पदवी पूर्ण करू शकतात. शासनाने त्यास मान्यता दिली आहे.
युक्रेनला जे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते त्यांना एकतर NEET मध्ये कमी गुण मिळाल्याचे समोर आले आहे तर काही विद्यार्थी स्वस्त अभ्यासक्रम असल्याने तिकडे गेले असल्याचे कळते.असं केंद्रसरकारने सर्वोच्च न्यायालयाला समोर यावेळी सांगितले. आता या विद्यार्थ्यांना भारतातील मोठमोठ्या विद्यापीठामध्ये प्रवेश दिला तर इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चुकीचं ठरेल. आणि मग असे विद्यार्थी देखील त्यांच्यावतीने खटले दाखल करतील असेही केंद्रसरकारकडून म्हटलं गेलंय
युक्रेन मधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी NMC ने यापूर्वीच आदेश काढला होता
या संदर्भात रशिया युक्रेन युद्धादरम्यान,7 सप्टेंबर रोजी नॅशनल मेडिकल कमिशन ने (NMC) युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अगोदरच आदेश जारी केला होता. NMC ने म्हटलं होतं की युक्रेन ने देऊ केलेल्या एकेडमिक मोबलिटी प्रोग्राम ला मान्यता देण्याची सहमती आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या मूळ विद्यापीठातूनच पदव्या दिल्या जातील. यासोबतच या विद्यार्थ्यांना जगातील कोणत्याही विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी NMC ने दिलेली होती.मात्र, NMC ने या विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन 2002 चे दुसरे निकष पूर्ण करण्याची अटही घातली आहे.
यासोबतच रशियातील अनेक विद्यापीठांनीही भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
यापूर्वी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान भारत सरकारने युक्रेनच्या या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रकरण विचाराधीन असल्याचे सांगितले होते.सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत होते.
भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का जातात?
आजही एमबीबीएस पदवी ही भारतात चांगल्या रोजगाराची हमी आहे. असं भारतात मानलं जातं.
सध्या देशात एमबीबीएसच्या फक्त ८८ हजार जागा उपलब्ध आहेत,
पण २०२१ मध्ये ८ लाखांहून अधिक उमेदवार वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET मध्ये बसले होते.
म्हणजेच दरवर्षी 7 लाखांहून अधिक उमेदवारांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहते.
यामुळेच डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो भारतीय तरुण दरवर्षी युक्रेन आणि इतर देशांमध्ये जातात.
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 16,2022, 10:11 AM
WebTitle – ‘It is not possible to admit medical students who have returned from Ukraine to Indian Medical Colleges’ – Central Govt